प्रेग्नन्सीबाबत दीपिका पदुकोणने केला ‘हा’ खुलासा

प्रेग्नन्सीबाबत दीपिका पदुकोणने केला ‘हा’ खुलासा

दीपिका पदुकोण ही सध्या बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलीवूडमध्ये आपलं करियर सुरू केल्यापासून दीपिकाच्या अभिनयाचा आणि यशाचा आलेख हा चढताच राहिला आहे. मागच्या वर्षीचं तिने आपल्या जीवनाचा जोडीदार म्हणून रणवीर सिंगची निवड करून थाटामाटात लग्न केलं. रणवीर आणि दीपिकाची जोडी ही रील आणि रिअल लाईफमध्ये पसंत केली जाते. पण लग्न झाल्यापासून दीपिकाच्या लग्नाबद्दल काही ना काही अफवा येत असतात. या अफवांना बाजूला सारत दीपिकाने तिच्या प्रेग्नन्सीच्या दबावाबाबत खुलासा केला आहे.

सध्या दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या आगामी छपाक (Chappak) या चित्रपटांमुळे सतत चर्चेत आहे. या चित्रपटाचं शूटींग सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे. छपाकमध्ये दीपिका एसिड हल्ल्यातील पीडीत लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. या दरम्यानच दीपिकाने आई होण्याबाबत व्यक्त केला एक महत्त्वपूर्ण विचार ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आहे.


नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाने प्रेग्नन्सी प्रेशरबाबत सांगितलं. दीपिकाने तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितलं आणि महत्त्वपूर्ण विचारही मांडला. दीपिका म्हणाली की, ‘मी कधी ना कधी आई होणारच आहे. कोणत्याही विवाहीत महिलेवर किंवा जोडप्यावर आईवडील होण्यासाठी दबाव टाकणं चुकीचं आहे.’ दीपिका पुढे हेही म्हणाली की, ‘ज्या दिवशी महिलांना आई होण्याबाबतचा प्रश्न विचारणं सोडून दिलं जाईल त्या दिवशी आपल्या समाजात नक्कीच चांगला बदल घडून येईल.’
 

 

 


View this post on Instagram


 

 

❤️ @madametussauds


A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on
आपल्याकडे नेहमीच प्रेग्नन्सीबाबत महिलांनाच प्रश्न विचारला जातो. त्यामुळे अनेकदा करिअर करणाऱ्या महिलांनाही यामुळे अपराधीपणा वाटू लागतो. पण पुरूषांना मात्र याबाबत कधीच विचारलं जात नाही. दीपिकाने या विषयावर मांडलेल्या मतामुळे तिने पुन्हा एकदा ती विचारांबाबत धाडसी असल्याचं दाखवून दिलं आहे. तिच्या या मतामुळे तिचे फॅन्स पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतील हे नक्की.
 

 

 


View this post on Instagram


 

 

❤️


A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on
साहजिक आहे दीपिकाचा फोकस सध्या कामावरच राहणार आहे त्यामुळे आई होण्याबाबतच्या प्रश्नावर तिची अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. दीपिकाशिवाय रणवीर सिंगही सिंबा आणि गली बॉयच्या यशानंतर सध्या आगामी चित्रपट  83 च्या कामामध्ये व्यस्त आहे.


1-DeepVeer-Eco-Friendly-Reception-Ranveer-deepika-ceremony


मागच्या वर्षी 14-15 नोव्हेंबरला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने इटलीमधील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी खाजगी पद्धतीने लग्न केलं होतं. त्यांच्या कोंकणी आणि सिंधी पद्धतीने झालेल्या लग्नाचे सुंदर फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या नंतर भारतात येऊन या कपलने आपल्या मित्र परिवारासाठी आणि बी-टाऊनसाठी खास रिसेप्शन्सही दिली होती.