दीपिका पदुकोण ही अभिनेत्री ही मोठ्या मनाची आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आपल्या चांगल्या स्वभावाने तिने नेहमीच अनेक फॅन्सचं मन जिकलं आहे. नुकतंच तिने पुन्हा एकदा आपल्या मोठ्या मनाचं दर्शन घडवलं आहे. आपलं मन जरी एखाद्याने तोडलं तरी त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबियांशी वागताना होऊ न देणं इतकं सोपं नाही. रणबीर आणि दीपिकाच्या अफेअरबाबत सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांच्या ब्रेकअपनंतर दीपिकाला डिप्रेशनसारख्या गंभीर आजाराचा सामनाही करावा लागला होता. पण एवढं असूनही तिने कधीही याबाबत वाच्यता केली नाही. उलट प्रत्येक पब्लिक इव्हेंटमध्ये दीपिका अगदी हसत रणबीरबरोबर वावरताना दिसली. जसं आधी काही झालंच नाही. अगदी दीपिकाचा नवरा रणवीरही तिच्याप्रमाणेच वागतो.
एकीकडे रणबीर आणि आलिया लेक कोमोला भेट देण्यासाठी गेले आहेत तर दुसरीकडे दीपिकाने मात्र बिझी असूनही तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या आईबाबांची भेट घेतली. झालं असं की, न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मेट गाला 2019 इव्हेंटमध्ये बॉलीवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणही तिच्या सुंदर अंदाजात दिसली होती. पण या इव्हेंटच्या घाई गडबडीदरम्यान तिने वेळात वेळ काढून दीपिकाने एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरचे आईबाबा ऋषि कपूर आणि नीतू सिंग यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला.
दीपिकाने ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांची भेट घेताच नीतू यांनी लगेच याबाबतची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली. या पोस्टमधल्या फोटोजमध्ये ऋषि आणि नीतू कपूर दोघंही छान हसताना दिसत आहेत. तसंच नीतू यांनी कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, एक सुंदर संध्याकाळ दीपिकासोबत.
View this post on InstagramSuch a fun evening with adorable @deepikapadukone .. gave lot of love n warmth 😍🥰
त्यावर दीपिकानेही त्यांचे सुंदर संध्याकाळ एकत्र घालवल्याबद्दल आभार मानले. रणबीरची बहीण रिधिमानेही या पोस्टवर तीन हार्टस टाकत रिएक्ट केलं आहे.
नीतू कपूर यांनीही पोस्ट शेअर करताच सगळ्यांना उत्सुकता होती ती आलिया भट म्हणजेच रणबीरच्या सध्याच्या गर्लफ्रेंडच्या रिएक्शनची. पण आलियाने सगळे फोटो तर लाईक केले पण त्यावर कमेंट मात्र केली नाही.
हम्म आता आलियाच्या नो रिएक्शनचा अर्थ तुम्हाला कळला असेलच.
तुमच्या माहितीसाठी ऋषि कपूर गेल्या एक वर्षापासून न्यूयॉर्कमध्ये आपल्या आजारावर ट्रीटमेंट घेत आहेत. याबाबतचा खुलासा फिल्ममेकर राहुल रवैल यांनी सोशल मीडियावर केला होता. त्यांच्या पोस्टआधी कोणालाच माहीत नव्हतं की, ऋषि कपूर हे न्यूयॉर्कमध्ये कॅन्सर आजारावर उपचार करून घेत आहेत. पण आता त्यांची प्रकृती नीट असून ते लवकरच भारतात परत येतील. तसंच ते बॉलीवूडमध्ये काम करायलाही सुरूवात करतील, असं कळतंय.
जाहिरात विश्वात बाजीराव-मस्तानीची जोडी सर्वाधिक लोकप्रिय
View this post on Instagram
या इव्हेंटमध्ये दीपिका सुंदर अशा बार्बी डॉल लुकमध्ये दिसली होती. या इव्हेंटमध्ये दीपिकाने पिंक कलरचा स्ट्रॅपलेस गाऊन घातला होता.