दीपिका सहभागी होणार जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत

दीपिका सहभागी होणार जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत

अभिनेत्री दीपिका पादूकोण बॉलीवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवाय दीपिकाने मागील वर्षी जवळजवळ 21 निरनिराळ्या उत्पादनांसाठी ब्रॅंड अॅंम्बेसेडरचं काम केलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या ब्रॅंडसाठी काम करणारी ती जगभरात  एकमेव महिला सेलिब्रेटी ठरली आहे. यासोबतच तिच्या वाढत्या ब्रॅंड वॅल्यूप्रमाणेच तिने स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक करण्यासदेखील सुरूवात केली आहे. आता तर दीपिका जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीतही सहभागी होणार आहे. दीपिकासोबत या बैठकीत इतर अनेक सेलिब्रेटी आणि राजकीय नेते सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीमध्ये भारतातील शंभराहून अधिक मोठमोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील सहभाग घेणार आहेत. ज्यामुळे अशा महत्त्वपूर्ण बैठकीत दीपिका सहभागी होणार ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची आहे. 

View this post on Instagram

it’s the time to disco!🎺

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

जागतिक आर्थिक मंचची बैठक

जागतिक आर्थिक मंचची ही 50 वी बैठक आहे.  यावर्षी ही बैठक स्वित्झलॅंडमध्ये होण्याची शक्यता आहे. शिवाय या बैठकीचा हेतू विश्वाला एकत्र आणून आपली ताकद आणखी वाढवणं हा आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं जातं. या वर्षी या बैठकीमध्ये दरवर्षीपेक्षा अधिक श्रीमंत आणि सत्ताधारी लोकांचा समावेश केला जाणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारीत या संम्मेलनाचं आयोजन केलं जाणार आहे. या बैठकीत अंदाजे जगभरातील जवळजवळ 3000 बड्या आसामी सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दीपिका आणि रणवीर जगातील लोकप्रिय ब्रॅंड

दीपिका आजच्या घडीला एक लोकप्रिय ब्रॅंड आहे. दीपिकाने आतापर्यंत जवळजवळ 21 निरनिराळ्या उत्पादनांसाठी ब्रॅंड अॅंम्बेसेडरचं काम केलं आहे. दीपिकाच्या वाढत्या ब्रॅंड वॅल्यूप्रमाणेच तिने स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. फर्निचर आणि ब्युटी प्रॉडक्ट्स सोबतच ती आता योगर्टच्या बिझनेसमध्येदेखील गुंतवणूक करत आहे. व्यावसायिक सूत्रांनूसार दीपिकाच्या ज्या स्टार्ट अप बिझनेसमध्ये गुंतवणूक करते त्या बिझनेसची गुंतवणूक दीर्घ काळासाठी केलेली असते.  BFO 500 म्हणजेच बिझनेस ऑफ फॅशन अॅंड हाईलायट्स 500 च्या यादीत दीपिकाचा समावेश झाला आहे. 2. 4 ट्रिलयन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या या फॅशन इंडस्ट्रीत जगभरातील अनेक सेलिब्रेटीजचा समावेश होत असतो. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाच्या ड्रेस सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे दीपिकाने फॅशन इंडस्ट्रीवर स्वतःची एक वेगळीच छाप टाकली होती. ज्यामुळे या यादीत तिचा नावाचा समावेश झाला. शिवाय तिने तिच्या अॅक्टिंग  करिअरमध्येदेखील तिने एक विशिष्ठ उंची गाठली आहे. मागच्या वर्षी 14-15 नोव्हेंबरला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने इटलीमधील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी खाजगी पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नानंतर एका कार्यक्रमात चुकीच्या पोझमुळे तिच्या बेबी बंपच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र दीपिकाने तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या चुकीच्या असल्याचं एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. सध्या तरी दीपिकाने तिच्या करिअरवर फोकस करण्याचा विचार केला आहे. मात्र लवकरच ती आणि रणवीर याबाबत नक्कीच विचार करतील. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

या कारणांमुळे लोक बघतात #BiggBoss सारखे रियालिटी शोज

खारी बिस्कीटच्या गोड जोडीला चांगला प्रतिसाद

या कारणामुळे शिल्पा शेट्टी होती बॉलीवूडपासून दूर