ADVERTISEMENT
home / मनोरंजन
दिग्पाल लांजेकरचा ‘फत्तेशिकस्त’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्पाल लांजेकरचा ‘फत्तेशिकस्त’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जंद’ चित्रपटाला चांगली पसंती मिळाली होती. आता दिगपाल लवकरच आणि एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटातून शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनितीचे पुन्हा एकदा दर्शन घडणार आहे. चाणाक्ष बुद्धीमत्ता आणि कुशल नेतृत्व यामुळे शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या होता. गनिमी कावा हा त्यांच्या युद्धकौशल्यातील एक महत्त्वाचा भाग होता. ‘फत्तेशिकस्त’ चित्रपट या गनिमी कावा या युद्धकौशल्यावर आधारित असणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवाय या निमित्ताने पन्हाळगडावर मुहूर्त करत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्यात आली. या चित्रपटाच्या पोस्टरवर भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक असं लिहण्यात आलं आहे.

‘फत्तेशिकस्त’ मध्ये ‘फर्जंद’च्या कलाकारांची मांदियाळी

फत्तेशिकस्त चित्रपटात अनेक मराठी कलाकार काम करणार आहेत. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर,मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, अजय पुरकर, हरीश दुधाडे, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेसी, नक्षत्रा मेढेकर असे अनेक कलाकार पुन्हा एकदा पाहता येणार आहेत. यातील अनेक कलाकारांनी या आधी फर्जंदमध्ये काम केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयकौशल्याचं कसब पाहता येणार आहे. फर्जंद चित्रपटातील अनेक पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. अनेक लहान मुलांनादेखील फर्जंद चित्रपटातील संवाद तोंडपाठ आहेत.  फर्जंद चित्रपटातून दिग्पालने कोंडाजी फर्जंद या मावळ्याची कथा जगासमोर आणली होती. त्यामुळे आता फत्तेशिकस्त मधून इतिहासातील कोणत्या पानाचा उलगडा होणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. या चित्रपटाला देखील फर्जंदप्रमाणे नक्कीच चांगला प्रसिसाद मिळण्याची शक्यता आहे.

दिग्पालचा ऐतिहासिक प्रवास

शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. यातील ‘फर्जंद’ हा एक अप्रतिम चित्रपट दिग्दर्शित करण्यात दिग्पालला यश आलेलं आहे. उत्तम दिग्दर्शन कौशल्याने त्याने फर्जंदमधून शिवाजी महाराज  आणि त्यांच्या मावळ्यांचं कतृत्व जगासमोर आणलं होतं. आता पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या आणखी एका युद्धमोहिमेची उकल तो ‘फत्तेशिकस्त’ मधून करणार आहे. दिग्पाल एक उत्तम लेखक आणि अभिनेतादेखील आहे. सख्या रे, तु माझा सांगाती अशा टेलिव्हिजन मालिकांमध्ये त्याने काम केलं होतं. चॅलेंज, मृत्युंजय, अॉपरेशन जटायू या नाटकांचं दिग्दर्शनदेखील त्याने केलं आहे. 

आणखी वाचा

ADVERTISEMENT

शॉर्ट स्कर्ट घालणाऱ्या मुलींवर बलात्कार करा, असे म्हणणारी आंटी ट्रोल

विकी कौशल आणि कतरिना करणार लव्ह ड्रामा

नेहा पेंडसेचा झाला का गुपचूप साखरपुडा

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT
02 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT