ADVERTISEMENT
home / Jewellery
सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह ट्रेंडिंग आहे पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी (Jewellery Trends In Marathi)

सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह ट्रेंडिंग आहे पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी (Jewellery Trends In Marathi)

नव्या वर्षाच्या नव्या ट्रेंंड (Trend) बद्दल बोलायचं झालं तर कपडे आणि फूटवेअर (Footwear) बरोबरच ज्वेलरी

(Jewellery) च्या लेटेस्ट ट्रेंडबद्दलदेखील लोकांना अधिक माहिती हवी असते. दागिन्यांशिवाय कोणत्याही स्त्री चा श्रृंगार अपूर्ण मानला जातो. कोणताही सण असो वा लग्नसराई अथवा कोणतंही गेट टुगेदर असो, दागिन्यांची चर्चा झाल्याशिवाय स्त्रियांच्या गप्पा पूर्ण होतच नाहीत. कोणत्याही स्त्री ला जर गिफ्ट द्यायचं असेल किंवा आहेर द्यायचा असेल तर सर्वात प्रथम डोक्यामध्ये काही सुचत असेल तर कोणता तरी दागिना दिला तर बेस्ट. कारण दागिना अशी गोष्ट आहे जी, महिलांना आवडते आणि दिलेलं गिफ्ट म्हणून कायमस्वरूपी त्या व्यक्तीकडे राहते. केवळ लग्न झालेल्या महिलांच्या बाबतीतच नाही तर कॉलेज अथवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या मुलींच्या हातातही अंगठी आणि ब्रेसलेट अथवा गळ्यात चैन यासारखे दागिने आपण बघतो.

कस्टमाइज्ड ज्वेलरी

सदाबहार टेंपल ज्वेलरी

ADVERTISEMENT

इअररिंग्ज आणि ब्रेसलेट

टॉप ट्रेंड्स

ज्वेलरी ट्रेंड 2019 (Jewellery Trend 2019)

लग्न न झालेल्या मुलींमध्ये आर्टिफिशियल ज्वेलरीची (artificial jewellery) क्रेझ पाहायला मिळते तर लग्न झालेल्या महिलांची आवड असते ती म्हणजे सोनं आणि हिऱ्यांचे दागिने. भारतामध्ये धनत्रयोदशी आणि अक्षय तृतीयासारख्या सणांच्या दिवशी दागिने खरेदी करणं सहसा शुभ मानलं जातं. लग्नाच्या दिवशीदेखील नवरा आणि नववधुला सोन्याची अंगठी अथवा चैन गिफ्ट म्हणून देण्याची जुनी पद्धत आहे. नव्या वर्षात जर सर्वच नवं आहे तर ज्वेलरीचा ट्रेंडही बदलायला हवा ना. सध्याचा नवा ट्रेंड नक्की काय आहे जाणून घेऊया.

जाणून घ्या, 2019 चे हॉट आणि लेटेस्ट ज्वेलरी ट्रेंड्स (Latest Jewellery Brand)

1. फ्लोरल, पर्ल और पेपर ज्वेलरीची क्रेझ (Floral, Pearl And Paper Jewellery)

हळदी आणि मेंदीसारख्या प्री वेडिंग कार्यक्रमामध्ये आणि कॉलेजमध्ये किटी पार्टी कार्यक्रमांमध्ये यावर्षी फ्लोरल (floral) आणि पेपर ज्वेलरी (paper jewellery) चा ट्रेंड राहणार आहे. तरूणाईमध्ये महाग ज्वेलरीऐवजी आर्टिफिशियल ज्वेलरी (accessories) ची जास्त क्रेझ आहे. फंकी इअररिंग्ज (funky earrings) मोत्यांच्या माळेसह चैनसह पेअर करू शकतो.

ADVERTISEMENT

वाचा – लग्नासाठी मोती दागिने 

1. Jewellery Trends In Marathi

2. कस्टमाइज्ड ज्वेलरीदेखील सध्या ट्रेंडमध्ये (Customised Jewellery)

तुम्ही तुमच्या ज्वेलरीला पर्सनलाईज्ड (personalised) टच देणार असाल तर कस्टमाईज्ड ज्वेलरी नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे तुमचे दागिने युनिक (unique) दिसतात आणि तुमचं फॅशन स्टेटमेंट (fashion statement) देखील खुलून दिसतं. यासाठी तुम्ही तुमच्या दागिन्यांवर प्रसिद्ध अथवा तुमचा आवडता कोटदेखील लिहून घेऊ शकता. तुम्हाला जर अतिशय साधे दागिने हवे असतील तर यावर केवळ तुमच्या नावाचं पहिलं अक्षर कोरून घेऊ शकता. अशा प्रकारच्या अंगठ्या या साखरपुड्यासाठी जास्त प्रमाणात घेतल्या जातात. मंगळसूत्रामध्ये तुम्ही अशा तऱ्हेची मंगळसूत्र घेऊ शकता.

3. सदाबहार टेंपल ज्वेलरी ट्रेंड (Temple Jewellery Trend)

टेंपल ज्वेलरी हा एव्हरग्रीन ज्वेलरी ट्रेंड (evergreen jewellery trend) आहे. पारंपरिक (traditional) गेटअप आणि सेटिंगमध्येसुद्धा आता टेंपल ज्वेलरीला प्राधान्य देण्यात येतं. मात्र हे लक्षात घ्यायला हवं की, यावेळी मेटलऐवजी या सीझनमध्ये गोल्ड अर्थात सोन्याची जास्त मागणी आहे. तसंच टेंपल ज्वेलरीच्या मोटिफ्स (motifs) मध्ये देवी – देवता आणि नैसर्गिक गोष्टींना जास्त प्राधान्य देण्यात येतं. साधारणतः नववधू अशा तऱ्हेचे हार, बिंदी, कमरपट्टा आणि कानफूल घालण्यास पसंती देतात.

ADVERTISEMENT

2. Jewellery Trends In Marathi

Also Read Best Designer Earrings Online In Marathi

4. इअररिंग्ज आणि ब्रेसलेट (Earrings & Bracelet)

इअररिंग्ज – यावर्षी मिडीयम साईज आणि बोल्ड स्टेटमेंट (bold statement) असणाऱ्या इअररिंग्ज (earrings) फॅशनमध्ये आहेत. यामध्ये मोठा जेमस्टोन (gemstone) अर्थात खडा लावलेलादेखील आपल्याला दिसतो.

ब्रेसलेट – साधारणतः लोक ब्रेसलेट (bracelet) अथवा घड्याळ यापैकी एकच वस्तू हातामध्ये घालतात. पण यावर्षी तुम्हाला हे दोन्ही कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. बऱ्याच लग्नांमध्येही तुम्हाला या दोन्ही गोष्टींचा वापर करण्यात आलेला दिसून येईल. दरवर्षी याची फॅशन बदलत असते.

ADVERTISEMENT

5. या खड्यांचीही चलती (Stones In Fashion)

दागिन्यांच्या बाबतीत आपण चर्चा करतोय आणि खड्यांबद्दल बोललं जाणार नाही असं शक्यच नाही. यावर्षी रेड रूबी (red ruby) आणि स्पिनेल्स (spinales) चा ट्रेंड आहे. पेरीडोट (peridote) आणि एक्वामरीन (aquamarine) यावर्षी जरा कमी प्रमाणात प्रचलित आहेत. यासर्वांबरोबच महिलांची कायमस्वरूपी आवड अर्थात महिलांचं पहिलं प्रेम हिरा अर्थात क्लासिक डायमंड (classic diamond) विसरून चालणारच नाही.

3. Jewellery Trends In Marathi

तरूण, शहरी आणि नोकरी करणाऱ्या मुलींना रोजच्या वापरासाठी रोझ गोल्ड (rose gold) मधील स्टडेड डायमंड (studded diamond) असलेले अगदी कमी वजनाचे दागिनेदेखील तुम्ही बनवून घेऊ शकता. टैग्नाईट (tangenite) आणि मोती (pearl) यासारखे खडेदेखील लोकप्रिय आहेत.

वाचा – मराठी मध्ये ज्वेलरी ट्रेंड

ADVERTISEMENT

6. सेलिब्रिटीज ही स्टाईल हिट (Celebrity Fashion)

सेलिब्रिटीज आणि चित्रपटांमधील फॅशन सामान्य लोकांच्या आयुष्यात लवकर जागा बनवते. आजही नवरी बनणारी मुलगी जोधा ज्वेलरी (Jodha inspired jewellery) ची फॅशन जास्त फॉलो करत आहे. तसंच आजकाल साध्या आणि एलिगंट दागिन्यांची फॅशन जास्त आहे आणि त्यामुळेच सेलिब्रिटीजच्या लग्नात आणि बाकी विशेष कार्यक्रमांमध्ये साधे आणि एलिगंट दागिने जास्त प्रमाणात तुम्हाला दिसतात. ज्वेलरीच्याऐवजी एखादे स्टेटमेंट पीस देखील तुम्हाला आकर्षक दिसू शकते.

7. गळ्यात उठून दिसतो चोकर (Choker Is Evergreen Hit)

मागच्या काही वर्षांपासून नेकपीस म्हणून चोकर या दागिन्याला खूपच चांगली पसंती आहे. गळ्याशी अगदी चिकटून असलेला हा चोकर दिसायला फारच सुंदर दिसतो. यावेळी डायमंड चोकर (diamond choker) बऱ्याच महिलांची पहिली पसंती आहे. चोकर लेअरिंग (layering) बनवून कोणत्याही आऊटफिटवर घातल्यास, तुमचा लुक अतिशय सुंदर दिसण्यास मदत होते. ट्रेंडबरोबरच अप-टू-डेट राहणाऱ्या दागिन्यांच्या बॉक्समध्ये डायमंडचे ग्लिट्झी चोकर नेकलेस (glitzy choker necklace) असायलाच हवेत.  

4. Jewellery Trends In Marathi

1. यावर्षी ज्वेलरी ट्रेंड्स पाहिले तर, अँटिक ज्वेलरी (antique jewellery) जास्त प्रमाणात महिला पसंत करत आहेत. आजी  आणि आईचे असणारे दागिने आणि हार आजही ट्रेंडनुसार मॉडरेट करून घालण्यात येत आहेत.

ADVERTISEMENT

5. Jewellery Trends In Marathi

2. एमरेल्ड्स (emerald) शिवाय कोणताही दागिना हा अपूर्ण आहे. आपली अंगठी, इअररिंग आणि पेंन्डंट यामध्येदेखील तुम्ही एमरेल्ड लावून घेऊ शकता.

3. आता आपल्या कपड्यांबरोबर मॅचिंग ज्वेलरी घालण्याची फॅशन तशी जुनीच झाली आहे. यावेळी मिसमॅच्ड इअररिंग्ज (mismatched earrings) जास्त ट्रेंड्समध्ये आहेत.

4. स्टायलिश सेल्फ एक्सप्रेशन बनवण्यासाठी मल्टी लेअर्ड इअररिंग्ज (multi layered earrings) आणि नेकलेस (necklace) यांना जास्त महत्त्व देण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

5. कलर स्कीम (color scheme) बद्दल बोलायचं झालं तर ज्वेलरीमध्येदेखील पेस्टल शेड्स (pastel shades) आणि स्प्रिंग कलर स्टोन्स (spring color stones) ची क्रेझ कायम राहणार आहे.

6. बरेच जड आणि भारी दागिन्यांऐवजी सिंपल आणि स्लिक दागिन्यांना जास्त मागणी आहे. नवरी आणि नववधू महिलांना हिरेजडीत दागिन्यांपेक्षा सिंपल आणि एलिगंट दागिन्यांमध्ये सध्या जास्त रूची आहे.

6. Jewellery Trends In Marathi

7. यावर्षी इअर जॅकेट्सचादेखील बोलबाला राहील. ट्रिलियन माउंटेन (trillion mountain), मारकीस लीफी ग्रीन एमरेल्ड (marquise leafy green emerald) आणि डायमंड इअर जॅकेट्स (diamond ear jackets) हे कोणत्याही कपड्यांवर पेअर केल्यास त्याला आधुनिक टच देता येऊ शकतो.

ADVERTISEMENT

8. आजकल मुलींमध्ये इंडो वेस्टर्न लुक खूप लोकप्रिय है। तुम्हालादेखील इंडो वेस्टर्न लुक हवा असेल तर तुमच्यासाठी अँटीक (antique) आणि हँडमेड ज्वेलरी (handmade jewellery) हा चांगला पर्याय असेल.

9. लेअर्ड कपड्यांची फॅशन तर तुम्हाला माहीत असेलच. याबरोबरच तुम्ही यावर्षी ज्वेलरीमध्येही लेअर्डचा पर्याय निवडू शकता. लेअर्ड नेकपीसबरोबर लेअर्ड बिंदी हा फॅशनमधील एक चांगला पर्याय तुम्ही निवडू शकता.

10. तुम्हाला अंगठी घालण्याची आवड असल्यास, स्टॅक्ड रिंग्ज (stacked rings) चा ट्रेंड यावर्षी फॉलो करता येईल. यावर्षी हा ट्रेंड खूपच चांगला चालू आहे. तुम्हाला हवं असल्यास, तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये या ट्रेंडसाठी तुम्ही जागा करू शकता.

गर्दीमध्ये तुम्हाला सर्वात वेगळं दिसायचं असेल अथवा तुमचं स्टाईल स्टेटमेंट बनवायचं असेल, आऊटफिट आणि फुटवेअर या गोष्टींसह तुम्हाला तुमच्या दागिन्यांवरदेखील विशेष लक्ष पुरवायला हवं. तुम्हाला रोजच्यासाठी तर गळ्यात चैन घालण्याची हौस असेल तर ती चैन तुम्ही एखाद्या ट्रेंडी पेंडंटसहदेखील घालू शकता. तुमची अंगठी तुम्ही एखाद्या कलरफुल खड्यासह अधिक आकर्षक बनवू शकता. तुम्हाला कस्टमाईज्ड ज्वेलरीची आवड असल्यास, पेंडंट, रिंग, इअररिंग अथवा ब्रेसलेटवर आपल्या नावाचं पहिलं अक्षर तुम्ही घालून घेऊ शकता.

ADVERTISEMENT

टॉप इंडियन ज्वैलरी ब्रान्ड्स आणि डिझायनर्स (Top Indian Jewellery Brands & Designers)

1. अतुल जैन, ज्वेलरी फॅशन स्टायलिस्ट आणि मालक, अतुल ज्वेलर्स, दिल्ली (Atul Jain, Jewellery Fashion Stylist & Owner, Atul Jewellers, New Delhi)

2. सेलिब्रिटी ज्वेलरी स्टायलिस्ट नीलम कोठारी सोनी (Celebrity Jewellery Stylist Neelam Kothari Soni)

3. प्राक्षी शर्मा, क्रिएटिव्ह हेड अँड डिझाईनर, प्राक्षी फाईन ज्वेलरी (Prakshi Sharma, Creative Head & Designer, Prakshi Fine Jewellery)

4. ज्वेलरी डिझाईनर अर्चना अग्रवाल (Jewellery Designer Archana Aggarwal)

ADVERTISEMENT

5. भरत लश्कारी, संस्थापक, 925 सिल्व्हर जयपुर (Bharat Lashkari, Founder, 925 Silver Jaipur)

6. प्रतीक सिंघवी, प्रतीक ज्वेलर्स, उदयपुर (Prateek Singhvi, Prateek Jewellers, Udaipur)

7. सेलिब्रिटी डिझाईनर सब्यसाची (Sabyasachi)

8. दीपिका सभरवाल तिवारी, असोसिएट व्हाईस प्रेसिडंट, तनिष्क, टायटन कंपनी लिमिटेड (Deepika Sabharwal Tiwari, Associate Vice President, Tanishq, Titan Company Ltd)

ADVERTISEMENT

9. कुंवर साहिब सिंह, क्रिएटिव्ह हेड अँड डिझाईनर, मोतीवाला अँड सन्स (Kunwar Sahib Singh, Creative Head & Designer, Motiwala & Sons)

हेदेखील वाचा – 

नवरीसाठी खास ‘बजेट’मधील ५० भारतीय दागिन्यांचे डिझाईन्स

फॅशन – लग्न आणि रितीरिवाजांसाठी बेस्ट 41 वेडिंग ड्रेसेस (Best Wedding Dresses in Marathi)

ADVERTISEMENT

हे ‘30’ ग्लॅमरस आणि हटके पंजाबी सूट तुम्हाला नक्कीच आवडतील

लग्नासाठी हारांचे सुंदर डिझाईन्स (Varmala Designs In Marathi)

लग्नसराईसाठी खास कानातले डिझाईन – Earring Designs For Wedding

12 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT