कसौटी जिंदगी की : प्रेरणा आणि अनुराग एकमेकांना करत आहेत का डेट

कसौटी जिंदगी की : प्रेरणा आणि अनुराग एकमेकांना  करत आहेत का  डेट

एकीकडे एकता कपूरची 'कसौटी जिंदगी की 2' ही सिरीअल ऑफ एअर होणार आहे, अशी चर्चा सुरू आहे तर आमच्या कानावर अजून एक बातमी आली आहे. या सिरीअलमध्ये मुख्य भूमिका आहेत त्या म्हणजे प्रेरणा शर्मा (Prerna)आणि अनुराग बासू (Anurag). या भूमिका करणाऱ्या पार्थ समथान आणि एरिका फर्नांडिस या दोघांचं सध्या एकमेकांना रिअल लाईफमध्ये डेट करत असल्याचं सूत्रांकडून कळतंय. ते सिरीअलच्या सेट्सवर एकमेंकासोबत जास्त वेळ घालवत असल्याच त्यांच्या इन्स्टा अकाउंट्सवरून दिसतंय.   

नुकतीच पार्थने त्याच्या वाढदिवसाची पार्टी दिली होती. पण या पार्टीला त्याने कोमोलिका (Komolika)ची भूमिका साकाराणऱ्या हीना खानला मात्र बोलवलं नव्हतं. कारण एरिका आणि हीना यांचं कसौटीच्या सेट्सवर जास्त पटत नसल्याचं चित्र आहे. याबाबत पार्थला विचारलं असता तो म्हणाला की, माझा वाढदिवस मला माझ्या जवळच्या लोकांबरोबरच साजरा करायचा होता आणि मी खूपच घाईघाईत ही पार्टी दिली. त्यामुळे सगळ्यांना बोलवलं नाही. फक्त जवळच्या लोकांनाच बोलवलं होतं.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

Déjà vu for #anupre #policestation #bts #kasautiizindagiikay


A post shared by Parth Samthaan (@the_parthsamthaan) on
पण याच पार्टीला एरिका मात्र आली होती. याबाबत पार्थ म्हणाला की, मी एरिका या शोच्या पहिल्या दिवसापासून ओळखतो. आम्ही खूपच चांगले मित्र आहोत. त्यामुळे मी तिला बोलावलं. तर हीनाबाबत बोलायचं झाल्यास आमच्या दोघांचं रिलेशन फारचं  प्रोफेशनल आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना खास ओळखत नाही. आमच्याकडे एकमेकांचे नंबरही नाहीत. आम्ही फक्त एकमेंकासोबत चांगलं काम करतो.

या आधीही पार्थच नाव स्प्लीट व्हिला 11 फेम रोशनी वाधवानीशी जोडण्यात आलं होतं. तर एरिकाचं नाव हे तिच्या मागच्या शो कुछ रंग प्यार के ऐसे भी चा को-स्टार शाहीर शेखशी जोडण्यात आलं होतं.


 parth samhaan - erica fernandes


ही जोडी रील लाईफमध्ये फारच छान दिसते. त्यामुळे रिअल लाईफमध्येही हे दोघं कपल झाल्यास प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल.


हेही वाचा - 


‘कसौटी जिंदगी’च्या सेटवर जेव्हा प्रेरणाने लावला कोमोलिकाला रंग


'उतरन' सीरियलमधील इच्छा आणि तपस्या पुन्हा एकत्र


‘कुमकुम’ फेम जुही परमार मरणाच्या दारातून आली परत