दरवर्षी येणारा ‘खतरों के खिलाडी’ हा खतरनाक शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावर्षीदेखील या शो चं निवेदन बॉलीवूडचा ‘सिंघम’ दिग्दर्शक रोहित शेट्टी करत आहे. शो च्या संकल्पनेनुसार या शो मध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना अनेक भीतीदायक स्टंटचा सामना करावा लागतो. आपली भीती मागे सोडून परफॉर्म करतो तो प्रत्येक टास्कमध्ये जिंकतो नाहीतर त्या स्पर्धकाला घरी जावं लागतं अर्थात एलिमिनेशन स्टंटमध्ये परफॉर्म न करू शकलेल्या स्पर्धकाला घरी जावं लागतं. मागच्या वर्षी सीझन 8 तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता आणि यावेळीदेखील यातील अप्रतिम स्टंट्स आणि रोहित शेट्टीच्या निवेदनामुळे रंगत वाढत चालली आहे. या नवव्या सीझनमध्ये स्पर्धकांना घेऊन रोहित शेट्टी अर्जेंटिनामध्ये गेला आहे. अतिशय सुरक्षेमध्ये सेलिब्रिटीजना एकापेक्षा एका आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. यावर्षी या शो मध्ये कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा लेखक हर्ष लिंबाचिया, अली गोनी, गायक आणि अभिनेता असलेला आदित्य नारायण, नृत्यदिग्दर्शक पुनीत जे पाठक, जस्मिन भासिन, झैन, विकास गुप्ता, क्रिकेटर श्रीशांत हे सर्व स्पर्धक आहेत. तर पहिल्याच एलिमिनेशनमध्ये ‘बालिका वधू’फेम अविका गोरला घरी परतावं लागलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? हे सर्व स्टंट परफॉर्म करण्यासाठी किती फी मिळते? अर्थात हा पूर्ण सीझन जिंकणाऱ्या स्पर्धकाला एक विशिष्ट रक्कम मिळत असली तरीही यामध्ये परफॉर्म करण्यासाठीही या स्पर्धकांना पैसे मिळतात. पण प्रत्येक स्पर्धक किती फी आकारतो याची कल्पना आम्ही तुम्हाला देणार आहोत. प्रत्येक एका भागासाठी स्पर्धकांना आणि निवेदकालाही किती पैसे मिळतात याची ही खास माहिती.
वाचा – ‘ठाकरें’च्या मागील खरा चेहरा रोहन मापुस्कर
रोहित शेट्टी
स्पर्धकांपूर्वी आपण जाणून घेऊया निवेदकाबद्दल. कारण पूर्ण शो निवेदकाच्या खांद्यावर असं म्हणावं लागेल. या शो चा महत्त्वाचा भाग रोहित शेट्टी आहे. सर्वात जास्त पैसे रोहित शेट्टीला या शो साठी मिळतात. ‘खतरों के खिलाडी’ या हायरेटेड शो साठी रोहित प्रत्येक भागासाठी साधारणतः 30 लाख रूपये घेतो. तुम्हालाही ऐकून धक्का बसला ना? अर्थात बसणारच. पण रोहितने यापूर्वीही बरेच सीझन होस्ट केले असून प्रेक्षकांमध्ये रोहित शेट्टीची क्रेझ आहे. रोहित अतिशय हलकंफुलकं निवेदन तर करतोच. पण त्यापेक्षाही अधिक स्पर्धकांची भीती कमी करण्यासाठी रोहित मदत करतो. शिवाय स्वतः स्टंट दिग्दर्शक असल्यामुळे रोहितला प्रत्येक स्टंटची योग्य कल्पना आणि माहिती असते. त्यामुळे स्टंटच्या वेळी योग्य ते मार्गदर्शन रोहितकडून स्पर्धकांना दिल्याचंही प्रेक्षकांना दिसतं. शिवाय रोहितने आतापर्यंत ‘गोलमाल’ सिरीज, ‘सिंघम’, ‘सिम्बा’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’सारखे अप्रतिम चित्रपट प्रेक्षकांना दिल्यामुळे प्रेक्षकांना नक्की कोणता मालमसाला हवा हेदेखील त्याला योग्य तऱ्हेने माहीत आहे. त्यामुळेच रोहित गेले कितीतरी सीझन हा शो होस्ट करत आहे. म्हणूनच प्रत्येक भागाकरिता त्याची फी सर्वात जास्त आहे.
झैन इमाम
स्टार प्लस च्या “नामकरण” मालिकेतून प्रसिद्ध झालेला चेहरा झैन इमाम या शो मध्ये स्पर्धक म्हणून आला आहे. झैन प्रत्येक भागासाठी 3 लाख रुपये इतकी फी घेत आहे. झैन सध्या चांगला परफॉर्म करत आहे.
वाचा – ‘गली बॉय’ रणवीरच्या ‘मेरे गली मैं’ गाण्याचं ओरिजनल व्हर्जन तुम्हाला माहीत आहे का?
विकास गुप्ता
आधी प्रॉड्युसर आणि मग बिग बॉस सीझन 11 गाजवणारा विकास गुप्ता यावर्षी ‘खतरों के खिलाडी’चा स्पर्धक म्हणून आला आहे. विकासचा फॅन फॉलोईंग चांगला असल्यामुळे विकासलादेखील झैनप्रमाणेच 3 लाख रूपये प्रत्येक भागासाठी देण्यात आले आहेत.
पुनीत पाठक
‘डान्स इंडिया डान्स’मधून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आलेलं पुनीत जे पाठक नाव आता डान्सच्या दुनियेत कोणालाही नवं नाही. पुनीत जे पाठकदेखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे. पुनीत डान्सर म्हणून तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र आता ‘खतरों के खिलाडी’मध्ये तो कसा काय स्टंट्सना सामोरं जाणार याचीही सर्वांना उत्सुकता होती. मात्र गेल्या तीन आठवड्यात पुनीतने जबरदस्त परफॉर्मन्स देत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. पुनीत जे. पाठकला प्रत्येक भागागणिक 2.5 लाख इतकी फी मिळत आहे.
वाचा – ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीकडे पुन्हा एकदा गुड न्यूज
शमिता शेट्टी
‘खतरों के खिलाडी’ सुरु झाल्यापासून शमिता अजून दिसलेली नाही. मात्र तीदेखील या शो चा भाग आहे. बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लहान बहीण शमिता शेट्टी याआधीदेखील ‘झलक दिखला जा’ या रियालिटी शोमध्ये दिसली होती. आता पुन्हा एकदा ती ‘खतरों के खिलाडी’मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. शमिताला प्रत्येक भागासाठी दोन लाख रूपये फी देण्यात आली आहे.
भारती सिंग- हर्ष लिंबाचिया
दरवर्षी ‘खतरों के खिलाडी’मध्ये एक कपल असतं. यावर्षी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा लेखक हर्ष लिंबाचिया सहभागी झाले आहेत. कपल असलं तरीही दोघांना वेगवेगळी फी देण्यात येत आहे. हर्ष इतका प्रसिद्ध नाही. त्यामुळे हर्ष लिंबाचियाची फी 80 हजार असून भारती सिंगला प्रत्येक भागासाठी 2 लाख रूपये देण्यात येत आहेत. वास्तविक प्रत्येक भागात भारती सिंग आपल्या जोक्सनेही सर्वांचं मनोरंजन करताना दिसत आहे. तर हर्षही पहिल्या दोन आठवड्यात घाबरलेला होता. पण आता हळूहळू हर्ष चांगलं परफॉर्म करत आहे.
आदित्य नारायण
यावर्षीचा सर्वात आश्चर्यकारक स्पर्धक म्हणजे आदित्य नारायण. आदित्यने पहिल्या भागापासूनच चांगला परफॉर्मन्स दिला आहे. शिवाय आदित्यही एका शो चा निवेदक असल्यामुळे त्याचा सेन्स ऑफ ह्युमरदेखील कमाल आहे. आपल्या परफॉर्मन्सने तो प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. या शो साठी आदित्य नारायणला साधारणतः एक लाख ते दीड लाख दरम्यान फी देण्यात येत आहे.
याशिवाय अली गोनी, जस्मिन भासिन, रिद्धिमा पंडीत, अविका गोर, श्रीशांत हेदेखील स्पर्धक या ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी झाले आहेत आणि या स्पर्धकांनाही एक ते दीड लाखादरम्यान प्रत्येक भागासाठी फी देण्यात येत आहे. त्यामुळे आता या स्पर्धकांमधून कोण चांगला परफॉर्मन्स देऊन मोठी रक्कम जिंकणार आणि कोणते कोणते स्पर्धक घाबरून बाहेर जाणार हे हळूहळू कळेलच.
फोटो सौजन्य – Instagram