KKK10 : करिष्मा तन्ना ठरतेय भारी, फायनलमध्ये तगडी टक्कर

KKK10 : करिष्मा तन्ना ठरतेय भारी, फायनलमध्ये तगडी टक्कर

पहिल्या आठवड्यापासून कायम टॉपवर राहणारा रियालिटी शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी’. कोणताही सीझन असो या शो मध्ये एकमेकांना टक्कर देणारे सेलिब्रिटी आणि त्यांची जिद्द पाहायला नेहमीच प्रेक्षकांना आवडते. मुळात खऱ्या आयुष्यात हे कलाकार कसे आहेत आणि यातील रोहित शेट्टीच्या निवेदनासह दिसणारे स्टंट हा शो चा अप्रतिम भाग आहे. यावर्षी निवड करण्यात आलेल्या दहा कलाकारांमधून आता शेवटच्या टप्प्यात 4 कलाकार राहिले असून यामध्ये करिष्मा तन्ना, धर्मेश येलांडे, करण पटेल आणि बलराज सान्याल या चौघांचा समावेश आहे. पुढच्या काही आठवड्यात या चौघांमध्ये शो जिंकण्यासाठी चुरस बघायला मिळणार आहे.  यापैकी शो मध्ये असणाऱ्या सर्वच मुलींनी तगडी टक्कर दिली होती. तेजस्वी प्रकाशला तिच्या तब्बेतीमुळे हा शो सोडावा लागला अन्यथा या स्पर्धकांमध्ये फायनलसाठी  तिचीही वर्णी नक्कीच लागली असती यात शंका नाही. 

#KKK10 - 'खतरों के खिलाडी'मध्ये यावेळी दिसणार 3 मराठमोळे चेहरे

तीन मुलांवर करिष्मा पडतेय भारी

धर्मेश येलांडे,  करण पटेल आणि बलराज सान्याल या तिघांनाही तगडी टक्कर करिष्मा तन्नाने दिली आहे.  शो च्या  पहिल्या भागापासून धर्मेश आणि करिष्माने अप्रतिम स्टंट्स केले आहे. दोघेही कायम पाण्याच्या स्टंट्समध्ये अव्वल राहिले आहेत. इतकंच नाही तर दोघांपैकी कोणीही कधीही कोणताही स्टंट अबॉट केलेला नाही. त्यामुळे यावेळी गेल्या कितीतरी वर्षांची परंपरा तोडून करिष्मा फायनल जिंकणार का? या चर्चेला आता उधाण आले आहे. ही फायनलची टक्कर नक्कीच तगडी असणार यात वाद नाही. कारण  दाखवण्यात आलेल्या टीझरनुसार पुढेही पाण्याचे स्टंट्स आहेत आणि पुढचे सर्व स्टंट्स हे  अधिकाधिक कठीण झाल्याचे रोहित शेट्टीनेही सांगितले आहे. सेमी फायनलच्या शर्यतीत करिष्मा तन्ना पुढे गेली असून फायनलच्या शर्यतीत सर्वात पहिले आता कोण पोहचणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे. 

KKK10: मराठमोळा धर्मेश ठरला पहिला फायनलिस्ट, तर तेजस्वी करतेय कमाल

किमान सेमी फायनलपर्यंत जाण्याची मानसिक तयारी

करिष्मा तन्नाने मागच्या भागात रोहित शेट्टीला आपण  किमान सेमी फायनलपर्यंत बाजी मारू ही मानसिक तयारी करूनच बल्गेरियामध्ये आल्याचं सांगितलं. तिने आतापर्यंत कधीही कोणत्याही स्टंटमध्ये माघार घेतलेली नाही. क्रिपी क्रॉली असो, आग असो अथवा पाण्यातील स्टंट्स असो करिष्माने सर्व स्टंट्स जीवाची बाजी लाऊन पूर्ण केले आहेत. इतकंच नाही तर संपूर्ण शो मध्ये सर्वात जास्त किटकांशी आणि प्राण्यांशी संबंधित स्टंट हे करिष्माने केलेले दिसून आलं आहे. करिष्माने न घाबरता प्रत्येक स्टंटचा सामना केला आहे.  त्यामुळे आता धर्मेश आणि करिष्मामध्ये शेवटचा सामना होणार की, करण अथवा बलराज यांच्यासह करिष्मा लढणार याचा निष्कर्ष सध्या चाहते काढण्यात गुंतले आहेत. काहीही असलं तरीही यावर्षी स्पर्धक मुलींनी स्पर्धक मुलांना तगडी टक्कर देत यावर्षी मुलगी विजेती होईल अशी अपेक्षा करायला भाग पाडलं आहे. मात्र गेल्या दोन सीझनमध्ये शंतनू महेश्वरी आणि पुनीत पाठक या दोन्ही डान्सर्सने शो जिंकल्यामुळे आणि धर्मेशनेही अत्यंत चांगली कामगिरी केल्यामुळे धर्मेशच्या चाहत्यांनाही धर्मेश जिंकेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावरही कोण जिंकणार याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचा लवकरच निकाल येईल आणि कोण यावर्षीचा सीझन जिंकणार हेदेखील कळेल. मात्र तरीही अदा, तेजस्वी, करिष्मा आणि अमृता खानविलकर यांचा स्टंट परफॉर्मन्स कायमस्वरूपी लक्षात राहील. 

KKK10: खतरों के खिलाडीमध्ये तेजस्वी, धर्मेश आणि करणचा जलवा

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा