वयाची चाळिशी उलटूनही फिटनेस चांगल्या ठेवणाऱ्या दोन सेलिब्रिटी एकत्र येत सगळ्यांना फिटनेसचे धडे देणार आहे. या दोन सेलिब्रिटी म्हणजे भारतीय अभिनेत्री मलायका अरोरा आणि दुसरी अमेरिकन सिंगर जेनिफर लोपेझ… या दोघी एका विधायक कामासाठी एकत्र आल्या असून लवकरच त्या त्यांच्या नव्या प्रोजेक्ट अंतर्गत लोकांना फिटनेसचे धडे देणार आहे. त्यामुळे आता अभिनेत्री मलायका अरोरा एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.
जाणून घ्या प्रियांका चोप्राचा फिटनेस मंत्रा आणि डाएट प्लॅन
भारतीय योगा हिट
योगा हा सर्व जगात प्रसिद्ध आहे. या शिवाय भारतीयांची आयुर्वेदिकपद्धती देखील जगभरात प्रसिद्ध आहे. याचा प्रचार होणे आवश्यक आहे. हे भारतीयांनाच नाही तर देशाबाहेरील सेलिब्रिटींनाही कळले आहे. त्यामुळेच एका स्टार्टअप प्रोजेक्टसाठी मलायका आणि जेनिफर एकत्र काम करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मलायका आणि जेनिफर हे या प्रोजेक्टचे बिझनेस पार्टनर असून त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवातही केली आहे.
प्रोजेक्ट ‘SARAVA’ साठी JLO ने दिला हात
आता या स्टार्टअप प्रोजेक्टचे नाव SARVA असून भारतामध्ये या प्रोजेक्ट अंतर्गत भारतीयांना योगा प्रशिक्षण दिले जाते. सध्या भारतात या प्रोजेक्ट अंतर्गत 91 स्टुडिओज आहेत. मुंबई, दिल्ली, बंगळुरु अशा मोठ्या शहरांमध्ये योगा शिकवला जातो. पण त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे काम जेनिफर लोपेझ करणार आहे. अमेरिकन बेसबॉलचा लेजेंड मानला जाणारा अलेक्स रोड्रिग्ज म्हणजेच जेनिफरचा नवरा हा देखील यामध्ये पार्टनर आहे. त्यामुळे आता या प्रोजेक्टला आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकटी मिळाली आहे.
रोज योगा करता मग लक्षात ठेवा या गोष्टी
जेनिफर काय म्हणाली योगाबाबत
जेनिफर एक पॉप सिंगर असल्यामुळे तिला कायम स्टेज शो करावे लागतात. तिच्या गाण्यासोबतच तिला स्वत:ला मेंटेन ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळेच जेव्हा तिला योगा आणि फिटनेसबाबत विचारण्यात आल्यावर ती म्हणाली की, नियमित योगा केल्यामुळे माझ्यात बराच फरक झाला आहे. सुदृढ शरीरासोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यामध्ये योगा अत्यंत फायद्याचे आहे असे ती म्हणाली आहे. तर मलायकानेदेखील तिला योगामुळे मानसिक शांतता मिळाल्याचे सांगितले.
योगाने दिला विश्वास- मलायका
मलायका अरोरा सध्या जिथे जाते तिथे तिला फॉलो केले जाते ते तिच्या आणि तिच्यापेक्षा लहान असलेल्या अर्जुन कपूरमुळे… काही महिन्यांपूर्वी तिने अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतरचा काळ तिच्यासाठी फार कठीण होता. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला योगाने मदत केली. तिला पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास दिला असे तिने सांगितले.
मालदिव्सच्या सुंदर किनाऱ्यावर मलायकाचा हॉट योगा
महिलांना करणार फिट
आता या प्रोजेक्ट बाबत अधिक सांगायचे झाले तर हा सगळा खटाटोप हा केवळ महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी आहे.महिला घर सांभाळताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचे विसरतात म्हणूनच केवळ महिलांसाठी SARAVA हा प्रोजेक्ट असणार आहे. आता या प्रोजेक्टला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्यामुळे लवकरच याची सेंटर्स देशभरात आणि परदेशातही वाढणार आहे. सध्या भारतात 91 स्टुडिओज आहेत. पण कालांतराने ते वाढणार आहेत.जगभरात योगा पोहोचवण्यासाठी त्यांनी 2022 हे वर्ष उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे जर तुम्हालाही फिटनेसची गरज आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देखील या प्रोजेक्टचा एक भाग होऊ शकता.