मलायकासारखी फिगर हवीय, पाहा तिच्या फिटनेसचं रहस्य सांगणारा VIDEO

मलायकासारखी फिगर हवीय, पाहा तिच्या फिटनेसचं रहस्य सांगणारा VIDEO

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच चर्चेत असते. मलायका आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच इव्हेंट्स, फिटनेस, योगसंदर्भातील व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच मलायकानं इन्स्टाग्रावर स्वतःच्या फिटनेसचं रहस्य सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तिनं आपल्या डाएटबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. योग्य पद्धतीनं शरीर कसे निरोगी आणि फिट ठेवावे, याचा सल्ला तिनं चाहत्यांना दिला आहे. मलायका अरोराच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 1 लाखाहून अधिक व्ह्युज या व्हिडीओला मिळाले आहेत. यापूर्वी मलायकानं एक हॉट फोटोशूट केलं होतं. शिमरी ब्लॅक स्कर्ट आणि ब्लॅक टॉप परिधान करून केलेल्या फोटोशूटमध्ये मलायका अतिशय हॉट दिसत होती.

(वाचा : अर्जुन कपूरनंच गर्लफ्रेंड मलायका अरोराला केलं ट्रोल, म्हणाला...)

मलायका-अर्जुनचं नातं

दरम्यान, मलायका अरोरा आपल्या हॉट स्टाइल स्टेटमेंट आणि फिटनेसव्यतिरिक्त अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपवरूनही नेहमीच चर्चेत असते किंवा ट्रोल होते. बॉलिवूडमधलं हे एक असं कपल आहे, ज्यांच्या कोणत्या-ना-कोणत्या कारणावरून बातम्या झळकत असतातच. नुकतंच मलायकानं ‘फिल्मफेअर ग्लॅमर आणि स्टाइल अवॉर्ड’ सोहळ्यात असं काही विधान केलं ज्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली. बॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावलेल्या या सोहळ्यात ‘Diva Of The Year’ पुरस्कारानं मलायकाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मलायकानं शिमरी ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणे अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसत होती. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मलायका आभार व्यक्त करण्यासाठी भाषण करत असताना सोफी चौधरीनं तिला मस्करीत म्हटलं की, ‘मलायकाच्या स्पर्शामुळे कोणीही कधीही दिवा होऊ शकतो आणि याचदरम्यान स्टेजवरील स्क्रीनवर अभिनेता अर्जुन कपूरचे फोटो झळकले. ‘छय्या-छय्या’ स्टार मलायकानं सोफीला तातडीनं उत्तर देत म्हटलं, ‘हे तर माझे सर्वात मोठे दिवा आहेत.’ जाहिररित्या मलायकानं केलेल्या या विधानामुळे पुन्हा त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

(वाचा : चर्चा तर होणारच! अर्जुनसंदर्भात सर्वांसमोर मलायकानं केलं मोठं विधान)

View this post on Instagram

Sun,star,light,happiness.......2020✨

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

सध्या लग्नाचा विचार नाही, कारण....

मलायका आणि अर्जुननं त्याचं नातं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. पण लग्नबंधनात अडकण्यासंदर्भात दोघांनीही नकारच दर्शवला आहे. ‘सध्या लग्न करण्याचा कोणताही विचार नाही’, असं काही दिवसांपूर्वी अर्जुनने ठामपणे सांगितलं होते. आपण आता 33 वर्षांचे असून अशी कोणतीही योजना आखलेली नाही. सध्या करिअरवर आपण लक्ष केंद्रीत केल्याचंही त्यानं सांगितलं. जेव्हा लग्नाचा विचार करेन तेव्हा मी स्वतः याबद्दल सांगेन. ही गोष्ट लपवण्याची गोष्ट नक्कीच नाही ,असंही अर्जुन म्हणाला होता. अर्जुनने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ‘मीडिया ज्या बातम्या देते त्याबद्दल मी समजू शकतो. त्यांना त्यांच्या टीआरपी आणि इतर गोष्टींचा विचार करायचा असतो. पण त्याचा अर्थ असा नाही की, माझ्या खासगी आयुष्यातल्या सर्व गोष्टी मी सतत सांगायला हव्यात. सिनेमाच्या गोष्टी सोडून मला खासगी गोष्टी शेअर करायला अजिबात आवडत नाहीत. जेव्हा कधी मी लग्न करणार असेन तेव्हा मी नक्कीच माझ्या चाहत्यांना सांगेन’, असंही अर्जुनने म्हटलं.

(वाचा : पाठ दुखीतून सुटका मिळवण्यासाठी करा ही दहा योगासने)

View this post on Instagram

Channelling my inner #jamesdean ... @reebokindia #shadowplay

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

हे देखील वाचा 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.