बॉलीवूडमध्ये मराठी कलाकारांचा बराच दबदबा आहे. मराठीतील अनेक कलाकार आज बॉलीवूडमध्ये चांगल नाव कमवत आहेत. या नावांमध्ये आता अजून एक नाव सामील झालं आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘असे हे कन्यादान’ या मालिका, एक महानायक डॉ. बी आर आंबेडकर ही हिंदी मालिका आणि ‘मिस्टर अँन्ड मिसेस सदाचारी’, ‘गुरू’ अशा सिनेमांमधून झळकलेला अभिनेता प्रसाद जवादे या आठवड्यात रिलीज होणा-या आणि मोहित सूरीने दिग्दर्शिन केलेल्या ‘मलंग’ चित्रपटामध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
बॉलीवूडमध्ये स्थिरावतोय प्रसाद
प्रसादचा बॉलीवूडमधला हा पहिलाच सिनेमा नाही. या आधी नितेश तिवारी दिग्दर्शित ‘छिछोरे’ सिनेमामध्ये एका महत्त्वपूर्ण सीनमध्ये प्रसाद दिसला होता. पण ‘मलंग’मध्ये मात्र त्याची महत्वपूर्ण भूमिका आहे. सूत्रांच्या अनुसार, मलंग सिनेमामध्ये साध्या वेशातल्या पोलिसांच्या भूमिकेत प्रसाद दिसणार आहे.
भूमिकेसाठी प्रसादची खास तयारी
मलंग सिनेमात तो गोव्यातला पोलिस असल्याने कोंकणी भाषा बोलताना दिसेल. आपल्या भूमिकेच्या तयारीविषयी अभिनेता प्रसाद जवादे याने सांगितलं की, “सिनेमाचं कथानक वाचल्यावर मला लक्षात आलं की, या भूमिकेसाठी मला अधूनमधून अस्खलित कोंकणी बोलणे गरजेचे आहे. म्हणूनच मग मी माझ्या एका गोव्यातल्या मित्राकडून कोंकणी बोलायचे धडे गिरवले. माझे कोंकणी भाषेमधले संवाद व्यवस्थित बोलले जावेत, म्हणून शुटिंगवेळी आणि सिनेमाच्या डबिंगवेळीही मित्राला उपस्थित राहण्याचा आग्रह धरला आणि मला आनंद आहे की, मोहित सरांनी माझ्या या तयारीचे कौतुक केले.”
तल्लख दिग्दर्शकासोबत काम करण्याची मिळाली संधी
मोहित सूरीविषयी प्रसादने सांगितलं की, “त्यांना मराठी कलाकारांविषयी विशेष आदर आहे. ते खूप तल्लख दिग्दर्शक आहेत. सिनेमा बनवताना ते अतिशय बारकाईने काम करतात. दिशा पाटनी, अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर यांच्याच नाही तर छोट्यातल्या छोट्या अभिनेत्याच्या भूमिकेच्या लकबींचा सुध्दा ते बारकाईने विचार करतात. दिग्दर्शक जर एवढा समर्पित होउन काम करत असेल, तर अभिनेत्यांनाही सिनेमाकडे तेवढ्याच डेडिकेशनने काम करण्याची प्रेरणा मिळते.”
2020 मध्ये मोठ्या पडद्यावर झळकणार फ्रेश जोड्या
आदित्य, दिशा आणि कुणालसोबत मैत्री
आदित्य रॉय कपूर, दिशा पाटनी, कुणाल खेमू या कलाकारांशी मलंगच्या शूटिंगदरम्यान प्रसादची मैत्री झाली. प्रसादने आपल्या कॉ-स्टारसोबतच्या मैत्रीबाबत सांगितलं की, “हे सर्वच मोठे स्टार्स आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना पहिल्यांदा खूप दडपण असायचे. पण जशी मैत्री होत गेली. तसं दडपण आपसूकच कमी होऊ लागले. आदित्यसोबत तर नंतर शुटिंगदरम्यान क्रिकेटही खेळलोय.”
मलंगमध्ये प्रसादसोबतच ही मराठी अभिनेत्री
या चित्रपटात एकीकडे प्रसाद पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे तसंच मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरचीही भूमिका आहे. पण अमृताच्या भूमिकेबाबत अजून काही माहिती समोर आलेली नाही.
टीव्ही, मराठी चित्रपट, हिंदी मालिका आणि आता बॉलीवूड चित्रपट असा प्रसादच्या अभिनयाचा यशस्वी प्रवास सुरू आहे. त्याच्या यशाचा आलेख आणि अभिनयाच्या कक्षा अशाच रूंदावत राहोत हीच शुभेच्छा.
बेस्ट ऑफ लक फोर मलंग #PrasadJawade
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.