ADVERTISEMENT
home / मनोरंजन
या मराठी अभिनेत्यांनी साकारली शिवाजी महाराजांची भूमिका, प्रेक्षकांच्या मनावर सोडली छाप

या मराठी अभिनेत्यांनी साकारली शिवाजी महाराजांची भूमिका, प्रेक्षकांच्या मनावर सोडली छाप

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर जगाचं दैवत आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. त्यांची व्यक्तिरेखा आजपर्यंत अनेक मराठी कलाकारांनी साकारली आहे. या मराठी अभिनेत्यांनी शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा नुसतीच साकारली नाही तर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. तसंच जर शिवाजी महाराज असते तर कदाचित असेच दिसले असते अथवा असेच वावरले असतील अशा स्वरूपात या कलाकारांंनी या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अशाच काही मराठी कलाकारांबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल जाणून घेऊया. अवघ्या काहीच दिवसांवर शिवजयंती येऊन ठेपली आहे. या निमित्ताने आपण एकमेकांना शिवाजी महाराजांचे शेर पाठवत असतो. शिवाजी महाराजांची अनेक पुस्तकं आपण या निमित्ताने वाचतो आणि एकमेकांना भेट देत असतो. त्याच निमित्ताने पाहूया या कलाकारांनी साकारलेल्या भूमिकेबद्दल.

शरद केळकर

शरद केळकर

Instagram

शरद केळकर (Sharad Kelkar) हे नाव चित्रपटसृष्टीला नक्कीच नवं नाही. या मराठमोळ्या अभिनेत्याने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर अशी सोडली आहे की, ज्या भूमिकेत शरद असेल ती भूमिका अजरामर होते. ‘तान्हाजी’ या चित्रपटातून शरद केळकरने केलेली शिवाजी महाराजांची भूमिका लहान असली तरीही शरदचा भारदस्त आवाज आणि संवादफेक यामुळे शरदची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात चपखल रूतून बसली आहे. शरदने साकारलेली ही भूमिका नक्कीच कोणालाही विसरता येणार नाही.

ADVERTISEMENT

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

महेश मांजरेकर

महेश मांजरेकर

Instagram

महेश मांजरेकरने (Mahesh Manjrekar) आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. त्याशिवाय दिग्दर्शनातही महेश मांजरेकर यांचे नाव नक्कीच वर आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातील शिवाजी महाराजांची केलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहे. या चित्रपटाला तब्बल बारा वर्ष झाली आहेत. मात्र तरीही ओहोहो हे गाणं ऐकू आलं की, महेश मांजरेकरांची छवी प्रेक्षकांसमोर उभी राहते.

ADVERTISEMENT

चिन्मय मांडलेकर

चिन्मय मांडलेकर

Instagram

‘फत्तेशिकस्त’ हा मराठी  चित्रपट पाहिला नसणार असा मराठी माणूस विरळाच. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट सर्वांनाच भावला होता. यातील अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) साकारलेली शिवाजी राजांची भूमिका हीदेखील गाजली होती. शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने फत्ते केलेल्या एका थरारक मोहिमेसंदर्भात हा चित्रपट करण्यात आला होता. यातील प्रत्येक कलाकारांच्या भूमिका अप्रतिम होत्या. इतकंच नाही तर प्रत्येक कलाकार यामध्ये उत्तम दिसलाही होता. तर चिन्मयने साकारलेली ही भूमिका नक्कीच भाव खाऊन गेली आहे.

प्रसाद ओक

प्रसाद ओक

ADVERTISEMENT

Instagram

जितका उत्तम अभिनेता तितकाच उत्तम दिग्दर्शक म्हणून मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रसाद ओकची (Prasad Oak) ओळख आहे. नाटक, मालिका, चित्रपट या सगळ्याच बाजू अगदी भक्कमपणे आणि समर्थपणे पेलणारा प्रसाद ओक याने स्वतःच दिग्दर्शित केलेल्या ‘हिरकणी’ चित्रपटात केलेली शिवाजी महाराजांची भूमिका ही गाजली होती. अगदी लहान भूमिका असूनही प्रेक्षकांनी त्याच्या या भूमिकेचे नक्कीच कौतुक केले होते.

निखिल राऊत

निखिल राऊत

Instagram

ADVERTISEMENT

भूमिका कोणतीही असो ती उत्तम वठवायची हा कलाकाराचा अभ्यास असतो. सध्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मालिकेत सर्वांनाच राग आणणारा, मस्तीखोर मोहीत अर्थात निखिल राऊत (Nikhil Raut) याने नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील निखिलला तर ओळखणेही कठीण होते. ‘गर्जा महाराष्ट्र’ मध्ये निखिलने साकारलेली भूमिका इतकी गाजली होती की, या भूमिकेसाठी पुरस्कार नामांकनही निखिलला मिळाले होते.

शांतनू मोघे

शांतनू मोघे

Instagram

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका कोणत्याही मराठी माणसाला माहीत नाही असं होणार नाही आणि त्यातही शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा शांतनू मोघे (Shantanu Moghe) याचीही कलाकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली. शांतनूने याआधीही अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील शांतनू सर्वच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेला आहे.

ADVERTISEMENT

चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे

चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे

Instagram

मराठी चित्रपटांमध्ये सर्वात पहिले शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य पेलले ते या दोन मराठी कलाकारांनी. चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे (Chandrakant Mandhare and Suryakant Mandhare) या दोन्ही कलाकारांना कधीच विसरता येणार नाही. शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे हे दोन्ही कलाकार डोळ्यासमोर आले नाही तर नवलच!

शिवाजी महाराजांच्या भूमिकेप्रमाणेच त्यांचे सुविचारदेखील आपण आपल्या मनात रूजवत असतो. अशा या प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा …!!!

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT