छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचे विचार, त्यांच्या जयंतीला पाठवता येतील असे शुभेच्छा संदेश, व्हॉटसअॅप स्टेटस, घोषणा तुमच्यासोबत शेअर करत आहोत. शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही हा दिवस साजरा करा. महाराज आणि शिवरायांची शान म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषा दिन माहिती तर आपल्या सर्वांना आहेच. मराठी भाषा दिन शुभेच्छा संदेशदेखील आजकाल प्रसिद्ध होत आहेत
Table of Contents
शिवाजी महाराज आणि स्वराज्य (Shivaji Maharaj and Swarajya)
स्वराज्यासाठी झटणाऱ्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कास धरुन सगळ्या रयतेला एकत्र केले. मोघलांविरुद्ध लढा देताना त्यांच्या अनेक शौर्यकथा आपण आतापर्यंत शालेय पुस्तकातून वाचल्या आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर इ स.1630 मध्ये झाला. शिवबांच्या आई जिजाबाई ज्यावेळी पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुर्न:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजेंच्या आयुष्याता प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली. शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा लढा हा फार मोठा आहे. त्यांचे आयुष्य कमी होते. पण त्यांनी त्यांच्या पराक्रमाने सगळ्या जगासमोर आदर्श निर्माण केला. शाहिस्तेखान प्रकरण, सुरतची पहिली लूट, औरंगजेब प्रकरण, मोघल साम्राज्याशी संघर्ष, प्रतापगडाची लढाई, कोल्हापूरची लढाई अशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत.
शिवाजी महाराजांचे सुविचार तुम्हाला नक्की देतील प्रेरणा (Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi)
स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.
एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.
कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.
ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.
असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.
जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.
सर्वप्रथम राष्ट्र,नंतर गुरु,मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.
प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा
इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात...350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला… वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला… स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकेडे मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. जय शिवराय
सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन… असेच असावे मावळ्यांचे वर्तन… हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.. जय शिवराय
बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
सह्र्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा… दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या शिवबांचा दरारा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु… धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
शिवाजी महाराजांची उत्तम घोषवाक्ये (Shivaji Maharaj Slogan In Marathi)
जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज...श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!
शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा… गर्जा महाराष्ट्र माझा… जय शिवराय
ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची
झाले बहू .. होतील बहू… पण शिवरायांसारखा कोणीच नाही
सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो… तो म्हणजे छत्रपती
ना शिवशंकर…. ना कैलासपती… ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी .. ज्याने केली स्वराज्य निर्मिती… देव माझा तो राजा छत्रपती
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
वैकुंठ रायगड केला… लोक देवगण बनला… शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला...
शौर्यवान योद्धा… शूरवीर… असा एकच राजा जन्मला …. तो आमुचा शिवबा
निश्चयाचा महामेरु… बहुत जनांसी आधारु...अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.
अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती जय भवानी.. जय शिवाजी!
छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान
औरंगजेबाचा कोथळा निधड्या छातीने काढला… तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय'... शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाचीकाळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा "शिवसुर्य "...!!!!
प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव
महाराजांवरील उत्तम कविता (Poems On Shivaji Maharaj In Marathi)
विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा"होऊन गेला.
ना शिवशंकर… तो कैलाशपती,ना लंबोदर… तो गणपती, नतमस्तक तया चरणी,ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो.. राजा शिवछत्रपती
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत.......
दुर रहा पडु नका आमच्या फंदात..छत्रपति बाप आहे आमचा..सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..
जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा..मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..आरं अजूनही वेळगेली नाही बाळा..सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा…
ताकद हत्तीची...चपळाई चीत्त्याची...भगवे रक्त...शरीराने सक्त...झुकते ईथेच दिल्लीचे तख्त...अन झुकवू शकतात फक्त मराठेच...हर हर महादेव....
माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचेपिता..तो लढला ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य..स्थापनेसाठी ...तो संतापून पेटून उठला..जो किल्ला त्याने चढला..तेथे भगवा नेहमीच.. फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडविला त्याने मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात आहे आजपुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून नाराजी उठा अन् शोधा स्वत:तच...तोच मावळा तोच शिवाजी...शिवजयंतीच्या शुभेच्छा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या लिंकवर क्लिक करा.