मराठीतल्या काही प्रसिद्ध अभिनेत्री ज्या झाल्या आहेत गायब

मराठीतल्या काही प्रसिद्ध अभिनेत्री ज्या झाल्या आहेत गायब

अनेक मालिका येतात आणि जातात पण काही चेहरे हे कायमचे लक्षात राहतात ते त्यांच्या अभिनयामुळे. मराठीमध्येही अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपली छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली पण आता या अभिनेत्री गायब झाल्या आहेत. या अभिनेत्री नेमकं आता काय करत आहेत याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता नक्कीच असते. मराठीमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांना मालिकांमधून तुफान यश मिळालं पण या अभिनेत्री आता मात्र कुठेही दिसत नाहीत. चित्रपट, नाटक, मालिका या कोणत्याही ठिकाणी या अभिनेत्री दिसत नाहीत. पाहूया या अभिनेत्री नक्की कोणत्या आहेत. 

1. नीलम शिर्के

‘असंभव’ मालिकेमुळे नीलम शिर्केने एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. कॉमेडी, ड्रामा, नाटक, चित्रपट या सर्व क्षेत्रांमध्ये नीलम शिर्केचा दबदबा होता. ‘वादळवाट’ मालिकेमधूनही नीलमने आपल्या अभिनयाची एक वेगळी चुणूक दाखवली होती. नीलम शिर्के काही वर्षांपासून कुठेही दिसत नाहीत. नीलम शिर्केने अभिनेता आशिष कुलकर्णीशी लग्न केलं आहे. या दोघांना एक मुलगी असून तिचं वास्तव्य रत्नागिरी शहरात असल्याचं म्हटलं जात आहे. तिने सध्या अभिनयापासून फारकत घेतली असून नीलम शिर्के सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह नाही. 

2. पल्लवी सुभाष

View this post on Instagram

you are so beautiful even more so today

A post shared by PS (@pallavi.subhash) on

‘चार दिवस सासूचे’, ‘गुंतता हृदय हे’ अशा विविध मालिकांमधून प्रेक्षकांची आवडती झालेली अभिनेत्री पल्लवी सुभाष. पल्लवीने फारच अल्पावधीत आपला प्रेक्षकवर्ग निर्माण  केला. गेले कित्येक वर्ष मात्र पल्लवी सुभाष टीव्ही मालिका, चित्रपट या सगळ्यापासूनच दूर आहे. पल्लवीचा फॅन फॉलोईंग खरं तर खूपच आहे. पण तरीही पल्लवी सध्या मालिकांमध्ये दिसत नाही. पल्लवीने केवळ मराठी मालिकाच नाही तर हिंदी मालिकांमध्येही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय तिने अनेक जाहिरातींमधूनही काम केलं आहे. पण आता ती कुठेच दिसत नाही. तिने अभिनय सोडला असून ती दूर गेल्याची चर्चाही होत आहे. पण पल्लवीच्या चाहत्यांना तिला पुन्हा टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहण्याची इच्छा आहे. 

मिसेस मुख्यमंत्री मालिकेच्या चाहत्यांसाठी 'गोड बातमी'

3. नेहा गद्रे

‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून फारच कमी वेळात प्रसिद्ध मिळालेली अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. प्रेक्षकांच्या कौतुकाला नेहा नेहमीच पात्र ठरली. ‘अजूनही चांद रात आहे’ सारखी मालिका तिला त्यानंतर मिळाली. काही चित्रपटांमध्ये काम करून नेहाने या इंडस्ट्रीला रामराम ठोकला. नेहा आता गेले कित्येक वर्ष मालिका अथवा चित्रपटांमधून दिसत नाही. मागच्या वर्षी इशान बापटसह नेहाने लग्न केलं. तिने मराठी चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला आहे असं म्हटलं जात आहे. पण नेहा गद्रे सोशल मीडियावर मात्र अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे मालिकांंमध्ये अथवा चित्रपटांमध्ये जरी नेहा दिसली नाही तरी तिच्या चाहत्यांना तिला सोशल मीडियावर पाहता येते. ती आपले फोटो नेहमी पोस्ट करत असते.  

डान्सर मेलविन लुईससोबत सना खानने या कारणामुळे केलं ब्रेकअप

4. केतकी थत्ते

‘आभाळमाया’ या गाजलेल्या मालिकेमधून केतकी थत्तेला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली. कोटकोन त्रिकोण, बंधमुक्त यासारख्या प्रसिद्ध नाटकांमधूनही केतकी थत्ते दिसली होती. त्याशिवाय केतकी ही अप्रतिम डान्सरही आहे. ती कथ्थक डान्सर असून  अनेक ठिकाणी शो देखील करते. पण केतकी गेली कित्येक वर्ष कोणत्याही मालिका, नाटक अथवा चित्रपटातून दिसली नाही. ‘गलगले निघाले’ या चित्रपटातून केतकी भरत जाधवबरोबर दिसली होती. त्यानंतर तिच्या चाहत्यांना केतकी दिसली नाही. हसतमुख चेहऱ्याच्या केतकीची नक्कीच चाहते वाट पाहत असतील. केतकीने तिच्या अभिनयाने काही वर्षांपूर्वी सर्वांंच्याच मनात राज्य केलं होतं. आता तर मालिकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे केतकीनेही पुन्हा मालिकांमध्ये पदार्पण करावं असं नक्कीच तिच्या चाहत्यांना वाटत असणार. 

मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘10’ हॉट (Hot) आणि बोल्ड अभिनेत्री

5. रेश्मा नाईक

Instagram

दिग्दर्शक केदार शिंदे याची अतिशय अल्पावधीत प्रसिद्ध झालेली मालिका ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मुळात गाजली ती त्यातील अप्रतिम कलाकार आणि पात्रांमुळे. यामध्ये शलाका हे पात्र साकारणारी अभिनेत्री रेश्मा नाईक ही रातोरात स्टार बनली होती. घराघरात शलाका प्रसिद्ध झाली. पण केवळ ही एक मालिका करून रेश्मा नाईक या इंडस्ट्रीपासून दूर गेली. रेश्माने त्यानंतर संसार थाटला आणि तिने संसाराला प्राधान्य देत या झगमगाटापासून दूर राहणं पसंत केलं. मात्र आजही या मालिकेचं नाव आल्यानंतर शलाका या पात्राला विसरणं प्रेक्षकांना शक्य नाही. या मालिकेतील हे पात्र रेश्मा नाईकने अक्षरशः अजरामर केलं आहे. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.