इंटरनेट सर्चमध्ये 'हे' प्रश्न होत आहेत ट्रेंड

इंटरनेट सर्चमध्ये 'हे' प्रश्न होत आहेत ट्रेंड

आजच्या तारखेला इंटरनेट हे असं माध्यम आहे ज्यावर काहीही प्रश्न पडला रे पडला की, लगेच गुगलवर सर्च केलं जातं. मग ते ब्युटी असो कोणतं ठिकाणं शोधणं असो वा रेसिपीज असो. प्रत्येक गोष्टीसाठी लोक नेट आणि गुगलच्या मदतीला घेतात. अशा वेळी प्रेमाचा विषय कसा बरं मागे राहील. या भावनेबाबतही अनेकांच्या मनात प्रश्न हे असतातच आणि सध्या तर लोकांकडे वेळच वेळ असल्याने प्रेमालाही उधाण आलं आहे. समोरासमोर भेटता येत नसलं तरी व्हर्च्यअल लव्हलाईफ सुधारण्याचा प्रयत्न लोकं नक्कीच करत आहेत. मग ते प्रेमात पडणं असो वा ब्रेकअप असो.

Giphy

  • ब्रेकअप कसा करावे?

एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे ब्रेकअप हेच सत्य आहे. गुगलवर लोकं सध्या या प्रश्नाबाबत जोरदार सर्च करत आहेत. ज्यावरून दिसत आहे की, सोशल मीडियावर आनंदी दिसणारी कपल्स एकमेकांबाबत खास आनंदी नाहीत. कारण किती दिवस दुरावा सहन करायचा. दुरावा सहन झाला नाही की, मग असे प्रश्न पडणं साहजिक आहे. 

  • मी प्रेमात पडले आहे का?

कोणाला नातं तोडायचं आहे तर कोणी प्रेमाच्या शोधात आहे. मी प्रेमात तर पडले नाही ना, मला खरंच प्रेम झालंय का? याची लक्षणंसुद्धा लोकं शोधत आहेत. जे वाटतंय त्यावरून कळतंय की, प्रेमात तर तुम्ही पडला आहातच. 

  • किस कसं करावं?

आता याच्या टिप्ससुद्धा लोकं इंटरनेटवर शोधतात म्हणजे काय म्हणावं राव. काही लोकं किस कसं करावं हे विचारत आहेत तर काहीजण किसची नावं टाकून सर्च करत आहेत. कमाल आहे ना. आता दिवसभर घरातच आहे म्हटल्यावर सेक्सलाईफमध्ये स्पाईस आणण्यासाठी असं थोडंफार सर्च करावं लागतंच म्हणा. 

  • तो मला खरंच पसंत करतो का?

अनेकवेळा एखादी व्यक्ती आपल्याला खूप स्पेशल असल्याचं ट्रीटमेंट देते आणि अशी स्पेशल ट्रीटमेंट कोणाला आवडणार नाही. पण ही फक्त मैत्री आहे की अजून काही? अशाप्रकारचे प्रश्न लोकं सर्च करत आहेत. खासकरून मुलींद्वारे हे प्रश्न जास्त सर्च होत असल्याचं कळतंय. 

  • डेट कसं करावं?

डेटवर आता जाता येणार नसलं तरी एकदा लॉकडाऊन संपलं की, पहिलं काम तेच करणार आहे, असं बऱ्याच जाण्याचं प्लॅनिंग नक्कीच झालं असेल. मग ही डेट खास कशी होईल, असे प्रश्न लोकं सर्च करत आहेत. या प्रश्नांवरूनच कळतंय की, लोकांना आपल्या नात्याची सुरूवात छान करायची असून ती योग्य मार्गावर राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

  • रिप्लाय कधी करावा?

तुम्ही कोणामध्ये इंटरेस्टेड आहात का आणि त्या व्यक्तीने मेसेज केल्यास त्याला रिप्लाय द्यावा की नाही याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. हा प्रश्नही लोक इंटरनेटवर सर्च करत आहेत.

Giphy

एकीकडे संकट असलं तरी आयुष्य तर सुरू राहणारच ना. त्यानुसार नवीन जोड्या बनणार आणि प्रेमाची साखळी सुरूच राहणार. कारण प्रेम हेच तर आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा मुख्य पाया आहे. नाही का?

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.