नेहा कक्करने केली हिमांशची पाठराखण, म्हणाली विश्वासघातकी नाही

नेहा कक्करने केली हिमांशची पाठराखण, म्हणाली विश्वासघातकी नाही

नेहा कक्कर आणि हिमांश कोहलीच्या अफेअरची जितकी चर्चा रंगली नाही, त्यापेक्षा जास्त चर्चा होत आहे ती त्यांच्या ब्रेकअपची. एका रियालिटी शो मध्ये आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर काहीच दिवसात दोघेही वेगळे झाले. त्यानंतर नेहाने आपण डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगत वेगळे झाल्याची बातमी दिली. पण तिच्या चाहत्यांनी या सगळ्याचा दोष हिमांश कोहलीवर ढकलत हिमांश विश्वासघातकी असल्याची चर्चा चालू केली. पण आता या सगळ्या चर्चांना नेहानेच पूर्णविराम दिला आहे. नेहा सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते. त्यामुळे तिच्या आयुष्यातील सर्व घडामोडी आतापर्यंत तिने सोशल मीडियाद्वारे सांगितल्या आहेत. आता पुन्हा एकदा नेहाने आपला एक्स बॉयफ्रेंड हिमांशची पाठराखण केली आहे.


nehansh
ब्रेकअपचं कारण हिमांश, पण तो विश्वासघातकी नाही


डिसेंबर 2018 मध्ये नेहा आणि हिमांश वेगळे झाले. त्यांनी सोशल मीडियावरही एकमेकांना अनफॉलो केलं. शिवाय आपल्या ब्रेकअपचं कारणही हिमांश असल्याचं नेहाने स्पष्ट केलं. पण तरीही वेगवेगळ्या चर्चा रंगायला लागल्या. ब्रेकअप झालं असलं तरीही त्यामध्ये कोणताही कडवटपणा नव्हता. पण बऱ्याच ठिकाणी हिमांशबद्दल अतिशय वाईट लिहिलं गेलं. त्यावर आता नेहाने हिमांशची पाठराखण केली आहे.  सोशल मीडियावर नेहाने सांगितलं, ‘मी बरीच ऑनलाईन आर्टिकल्स वाचली जी अतिशय चुकीची माहिती पसरवत आहेत. मी दुखावले गेले आहे, पण माझा विश्वासघात झालेला नाही. जेव्हा गोष्ट प्रामाणिकपणाची आहे, तेव्हा हिमांशसारखा दुसरा कोणीच नाही. त्यामुळे त्याला दोष देणं थांबवा आणि त्याच्यावर चुकीचे आरोप करू नका. कोणतीही माहिती नसताना कोणाचं आयुष्य खराब करण्याचा कोणालाही अधिकार नाही.’


आयुष्यातील सर्वात खराब पॅच, मला एकटं सोडा - नेहा


ब्रेकअपनंतर नेहाने सांगितल्याप्रमाणे हा तिच्या आयुष्यातील सर्वात खराब पॅच आहे. अतिशय कठीण काळातून नेहा जात असून तिला यातून बाहेर पडायचं आहे. सध्या सिंगल असून हा माझ्या आयुष्यातील माझा काळ आहे आणि मी जेव्हा नात्यात होते तेव्हा माझ्या कुटुंबाला आणि मित्रमैत्रीणींना वेळ देऊ शकत नव्हते. पण आता मी खूप मस्त जगत आहे. तो वेळ मी अशा व्यक्तीला दिला होता जी व्यक्ती त्या वेळाची कदरच करत नव्हती. मी माझ्या भावंडांबरोबरचे बरेच क्षण त्यामुळे हरवून बसले होते. पण आता मला या सगळ्यातून बाहेर यायचं असून मला एकटं सोडा, असं नेहा कक्करने सांगितलं आहे. ‘मी माझ्या वाईट नात्यातून बाहेर आले असून आता मला माझा स्वतःचा वेळ हवा आहे. माझ्या आयुष्यात इतर कोणाहीपेक्षा माझ्या कुटुंबाला जास्त वेळ देणं गरजेचं आहे हे आता माझ्या लक्षात आलं आहे. मी पुन्हा एकदा नव्याने जगत आहे’ असंही नेहाने स्पष्ट केलं आहे. शिवाय हिमांशबद्दल चुकीचे गैरसमज पसरवू नका असंही नेहाने सांगत हिमांशची पाठराखण केली आहे.


neha himnash
नेहा आणि हिमांशने बऱ्याच शो मध्ये केलं होतं प्रेम व्यक्त


काही महिन्यांपूर्वीच एका गाण्याच्या शो मध्ये नेहा आणि हिमांशने आपलं एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं होतं. पण आता ब्रेकअप नंतर दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावरील साईट्सवरून अनफॉलो केलं आणि एकमेकांबरोबरील फोटोही डिलीट केले आहेत. नेहा सध्या आपल्या आयुष्यात पुढे निघून आली असली तरीही हिमांशने अजूनही ब्रेकअप झाल्यापासून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही आणि कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करून नेहाला दुखावल्याचं दिसलेलं नाही. हिमांशकडून कोणत्याही सोशल मीडियावर अथवा कोणत्याही वृत्तपत्र वा वेबसाईटला मुलाखतही देण्यात आलेली नाही. हिमांशने प्रेम व्यक्त केलं पण ब्रेकअप झाल्यानंतर हिमांशने कधीही कोणतीही भावना व्यक्त केली नाही. पण हिमांश आणि नेहा गेल्या एक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सर्व जगासमोर प्रेम व्यक्त केलं असताना असं केवळ वेळेच्या कारणावरून वेगळे झाल्याचं अजूनही त्यांच्या चाहत्यांना पटत नाहीये हे मात्र नक्की. त्यामुळे अजूनही या दोघांनी एकत्र यावं असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. कारण यापूर्वी असं अनुष्का विराटच्या बाबतीतही झालं होतं पण त्यांनी पुन्हा एकत्र येऊन लग्न केलं.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा 


गायिका नेहा कक्करने सांगितलं ब्रेकअपमागचं खरं कारण


का होतं ब्रेकअप आणि यातून नक्की कसं बाहेर यायचं, जाणून घ्या


ब्रेकअप झाल्यावर पाहा ‘या’ 45 मूव्हीज