हिंदी मीडियममध्ये इरफान खान आणि करिना कपूरच्या मुलीची भूमिका करणार ‘ही’ अभिनेत्री

हिंदी मीडियममध्ये इरफान खान आणि करिना कपूरच्या मुलीची भूमिका करणार ‘ही’ अभिनेत्री

आजारपणातून बाहेर पडत अभिनेता इरफान खान पुन्हा त्याच्या कामाला सुरूवात करीत आहे. इरफानला न्यूरोएंडोक्राईन कँन्सर झाला होता. या आजारावर उपचार करण्यासाठी इरफान खान लंदनमध्ये गेला होता.अचानक झालेल्या  कॅन्सरसारख्या आजारामुळे इरफानचं आयुष्य गेल्या एक वर्षभर बदलून गेलं होतं.  आता  मात्र या आजारावर मात करत इरफान काही दिवसांपूर्वीच पुन्हा भारतात परतला आहे. एवढंच नाही तर त्यानंतर त्याने त्याच्या कामालादेखील पुन्हा सुरूवात केली आहे. हिंदी मीडियम च्या दुसऱ्या भागात इरफान खान आणि करिना कपूर यांची प्रमूख भूमिका असणार आहे. चित्रपटामध्ये इरफान खान आणि करिना कपूरच्या मुलीची भूमिका राधिका मदान ही अभिनेत्री साकारणार आहे.


काय असणार हिंदी मीडियम 2 चे कथानक


साकेत चौधरीद्वारे दिग्दर्शित 2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट खूपच हिट झाला होता. यामध्ये अशा कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती ज्यांना आपल्या मुलीला सर्वोत्तम शिक्षण द्यायचं होतं, जेणेकरून समाजातील उच्च वर्गाद्वारे त्यांचा स्वीकार करण्यात येईल. या चित्रपटामध्ये इरफानबरोबर पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरचीदेखील मुख्य भूमिका होती. पहिल्या भागात त्यांच्या मुलीच्या शाळेतील अॅडमिशनचा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारी कॉमेडी प्रेक्षकांना आवडली होती. आता दुसऱ्या भागामध्ये ही लहान मुलगी मोठी झाली असून तिच्या कॉलेजच्या अॅडमिशनवर आधारित हा चित्रपट असणार आहे. आता दिनेश विजन प्रॉडक्शन अन्वये बनण्यात येणारा ‘हिंदी मीडियम 2’ हा चित्रपट पुढची कथा घेऊन येत आहे. आता चित्रपटात इरफान, करिना आणि राधिका यांच्या भूमिका आणि चित्रपटाच्या कथानकाबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

हिंदी मीडियम 2 च्या शूटिंगला सरूवात


हिंदी मीडियम 2 च्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. इरफान खान आणि राधिका मदान शूटिंगसाठी राजस्थानला पोहचले आहेत. दोन आठवड्यांचे राजस्थानमधील शूटिंग पूर्ण झाल्यावर चित्रपटाची टीम लंडनमध्ये शुटिंगसाठी रवाना होणार आहे. करिना कपूर तिच्या गुडन्यूज च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ती तिचं या  चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर हिंदी मीडियमच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये जाणार असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी करिना कपूरने मानधनावरून हिंदी मीडियममध्ये काम करण्यास नकार दिल्याची चर्चा होती. त्यामुळे करिना कपूर या चित्रपटात काम करणार का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही.


इरफानने लिहिली होती भावनिक पोस्टआजारपणातून बाहेर पडल्यावर इरफान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपला फोटो पोस्ट करून एक भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यात इरफानने लिहिलं होतं, ‘जिंकण्याच्या शर्यतीत आपण बऱ्याचदा आयुष्यात प्रेम किती महत्त्वाचं आहे विसरून जातो. जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हाच आपल्याला या गोष्टीची जाणीव होते. मी आयुष्यातील हे कठीण क्षण आता मागे ठेऊन आलोय. तुमच्या प्रेम आणि तुम्ही दिलेल्या साथीबद्दल मी तुमचा खूपच आभारी आहे. तुमच्या प्रार्थनांमुळेच मी ठीक होऊ शकलो. मी आता परत आलोय आणि त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानत आहे’


 


 ‘कर ले तू भी मोहब्बत’ वेब सिरीजच्या तिसऱ्या भागात काय आहे नवं


कंगना रनौतला आवरता आला नाही पाणीपुरी खाण्याचा मोह


सोनालीचा स्टनिंग लुक प्रत्येकासाठी ठरतोय नवी प्रेरणा


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम