दीपिकाला मिळाला ‘आई’ होण्याचा आशीर्वाद, नीतू कपूरने दिला खास ‘तावीज’

दीपिकाला मिळाला ‘आई’ होण्याचा आशीर्वाद, नीतू कपूरने दिला खास ‘तावीज’

काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की, नीतू कपूरला दीपिका अजिबात आवडत नाही अशा बातम्या पसरल्या होत्या. त्यावेळी दीपिका आणि रणवीर एकमेकांना डेट करत होते. पण आता नीतू कपूर आणि दीपिका पदुकोण एकमेकींच्या खूपच जवळ आहेत. नुकतीच दीपिका ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांना न्यूयॉर्क मध्ये भेटून आली. ऋषी कपूरची तब्बेत ठीक नसल्यामुळे बरेच सेलिब्रिटी भेटायला जात असून यामध्ये दीपिकाही होती. तिने आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत या दोघांना भेट दिली होती. दीपिका आणि रणवीरच्या लग्नामध्ये ऋषीच्या आजारपणामुळे दोघांनाही जाता आलं नव्हतं.


नीतू कपूरने दिलं दीपिकाला हम्सा तावीज ब्रेसलेट


deepika bracelet


दीपिका जेव्हा ऋषी आणि नीतूला भेटायला गेली तेव्हा तिला तिच्या लग्नासाठी एक सुंदर गिफ्ट नीतूने दिलं आहे. नीतू आणि ऋषीची मुलगी रिद्धीमा साहनीने डिझाईन केलेलं हम्सा (हाताचा शेप असलेलं) ब्रेसलेट गिफ्ट दिलं आहे. हे ब्रेसलेट खास यासाठी आहे कारण, हम्सा तावीज म्हणजे फातिमाचा हात अर्थात ‘देवाचा हात’ असं म्हटलं जातं. हे सोन्याचं ब्रेसलेट असून RKS ज्वेलरी ब्रँडकडून खास तयार करण्यात आलं आहे.


हम्सा तावीज देवाच्या आशीर्वादाचं प्रतीक


हम्सा तावीज हे देवाच्या आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं. हम्सा हात हा प्राचीन मध्य पूर्वीचा तावीज असून एक सुरक्षेचा संकेत आहे. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद, भाग्य, आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होतं. शिवाय असं म्हटलं जातं की, एखाद्या स्त्री ला आई होण्याचा आशीर्वाद या तावीजमार्फत दिला जातो. हे विशेषस्वरूपात बनवलं जातं. दीपिकाने नीतू आणि ऋषी कपूर यांना आपण भेटायला येत असल्याचं आधीच कळवलं होतं. त्यामुळे तिच्यासाठी खास लग्नाचं गिफ्ट आशीर्वाद स्वरूपात त्यांनी बनवून ठेवलं. सध्या दीपिका मेघना गुलजारच्या ‘छपाक’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पण त्यानंतर तिने कोणताही चित्रपट स्वीकारलेला नाही. कारण तिला आई व्हायचंय अशीही सध्या चर्चा आहे. पण तिच्या जवळच्या लोकांनी या गोष्टीचं खंडन केलं आहे. पण आता नीतू कपूरने दिलेल्या गिफ्टनंतर पुन्हा या चर्चेला उधाण आलं आहे.


deepika


हम्सा आहे आई होण्याचा आशीर्वाद


हम्सा तावीज हे सर्वशक्तीमान असल्याचं मानलं जातं. तसंच या तावीजमुळे कायम तुम्हाला संरक्षण मिळतं असंही म्हटलं जातं. हम्सा अर्थात या हाताचा अर्थ दृढता, धैर्य आणि विश्वास आहे. अध्यात्मिक लाभासाठीदेखील हे तावीज वापरण्यात येतं. याशिवाय तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भाग्य या तावीजमुळे येतं अशी आस्था आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई होण्याचा आशीर्वाद या तावीजद्वारे देण्यात येतो. त्यामुळे दीपिकाला नीतूने आई होण्याच आशीर्वाद दिला आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे. दीपिका नेहमीच आपल्या वागण्याबोलण्याने सर्वांचं मन जिंकून घेत आली आहे. आता पुन्हा एकदा रणबीर बरोबरचं तिचं मैत्रीचं नातं जपत तिने त्याच्या आईवडिलांनाही भेट दिली. त्यामुळे नीतू आणि ऋषीनेही तिला अगदी मनापासून आशीर्वाद दिले आहेत असं म्हणायला हवं. इतकंच नाही रणबीरची बहीण रिद्धीमानेही दीपिकाला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


रणवीरच्या शब्दांनी दीपिका झाली भावूक


प्रेग्नन्सीबाबत दीपिका पदुकोणने केला ‘हा’ खुलासा


दीपिका- रणवीरच्या लग्नाच्या कपड्यांची गोष्ट…