रणवीरच्या शब्दांनी दीपिका झाली भावूक

रणवीरच्या शब्दांनी दीपिका झाली भावूक

 


नवविवाहित रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ( #DeepVeer) सध्या एकमेकांच्या सानिध्यातील प्रत्येक क्षण आनंदाने साजरा करत आहेत. आजकाल हे दोघंही एकमेकांचं कौतुक करण्याची एकही संधी वाया घालवत नाहीत. नुकत्याच झालेल्या स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये याचा प्रत्यय आला.रणवीरच्या भावूक स्पीचमुळे दीपिकाच्या डोळ्यात आले आनंदाश्रू


स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये पद्मावत चित्रपटासाठी रणवीरला बेस्ट अॅक्टरचं अवॉर्ड मिळालं आणि या अवॉर्डचं पूर्ण श्रेय त्याने आपली बायको दीपिकाला दिलं. त्यानंतर रणवीरने दिलेल्या इमोशनल स्पीचने दीपिकाच्या डोळयात पाणी आलं. रणवीर म्हणाला की, ‘मला या चित्रपटामध्ये राणी मिळाली नाही पण खऱ्या आयुष्यात मला माझी राणी मिळाली.’ रणवीरने असं म्हणून दीपिकाकडे बोट दाखवलं. दीपवीरच्या लग्नानंतरचं हे पहिलंच अवॉर्ड  फंक्शन असून या फंक्शनच्या निमित्ताने पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली.

माझ्या यशाचं श्रेय दीपिकाला - रणवीर
आपल्या स्पीचमध्ये पुढे रणवीर असंही म्हणाला की, गेल्या काही वर्षात मी जे काही मिळवलं आहे, त्याचं सर्व श्रेय तुला (दीपिका) जातं. कारण तू मला जमिनीवर राहायला शिकवलंस. त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुझे आभार. हे शब्द ऐकताच दीपिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि ती रडू लागली. रणवीरने हे अवॉर्ड आपल्या आजीलाही समर्पित केलं, कारण मागच्याच वर्षी त्याची आजी वारली. तसंच अभिनेता म्हणून आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल रणवीरने निर्माते आणि दिग्दर्शक संजया लीला भन्साली यांचेही आभार मानले.


#Deepveer चा गँगस्टर लूक
 

 

 


View this post on Instagram


 

 

❤️❤️❤️ #ranveersingh #deepikapadukone #starscreenawards2018 @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
या अवॉर्ड फंक्शनसाठी दीपवीरने गँगस्टर लुक परिधान केला होता. या अवॉर्ड शोसाठी हे दोघंही एकत्र आले आणि अगदी हातात हात घेऊन एंट्रीही केली. 


दीपवीरचा हनिमून


सध्या दीपवीर कामात इतके व्यस्त आहेत की, त्यांना हनिमूनला जाण्यासाठी ही वेळ नाही. रणवीर सध्या आगामी सिंबाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यामुळे त्याच्या रिलीजनंतरच हे लव्हबर्डस् हनिमूनला जाण्याची शक्यता आहे. तसंच सध्या दीपिकाही तिच्या पुढच्या चित्रपटाबाबत उत्सुक आहे. हा चित्रपट मेघना गुलजार दिग्दर्शित करणार असून तो अॅसिड पीडितेवर आहे.