बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या यशाच्या शिखरावर आहे. कारण बॉक्सऑफिसवर त्याच्या सर्वच चित्रपटांनी धुमधडाका लावला आहे. पद्मावत ,सिम्बा आणि गलीबॉय या तिन्ही चित्रपटांमध्ये त्याला लागोपाठ भरघोस यश मिळालं. रणवीरच्या पद्मावतने बॉक्सऑफिसवर 300 कोटी, सिम्बाने 250 कोटी तर गलीबॉयने अवघ्या काहीच दिवसात 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला. या तिन्ही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी रणवीरला अक्षरशः डोक्यावरच घेतलं. खरंतर या प्रत्येक चित्रपटाच्या यशामागे रणवीरची प्रचंड मेहनत आहे. प्रत्येक चित्रपटात त्याच्या अभिनयाच्या विविध छटा चाहत्यांना पाहायला मिळाल्या. त्याचं हे यश त्यानेच अगदी कष्ट करून मिळवलं आहे. चित्रपटसृष्टीतील प्रत्येकालाच आता त्याच्या या यशाचा प्रवास तोंडपाठ झाला आहे. गली बॉयच्या यशानंतर आता रणवीरने मात्र एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी तो चित्रपटांसाठी ठराविक मानधन घेत होता. आता मात्र त्याने हे मानधन घेण्यास चक्क नकार दिला आहे. याचा अर्थ तो कोणताही मोबदला न घेता चित्रपटात काम करणार असं नाही. तर रणवीर यापुढील प्रत्येक चित्रपटासाठी त्या चित्रपटाच्या कमाईमधील प्रॉफीट स्विकारणार आहे. चित्रपटसृष्टीत एका पाठोपाठ एक यशस्वी चित्रपट देणाऱ्या रणवीर सिंगची ब्रॅंड व्हॅल्यु आता नक्कीच वधारली आहे. त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला असावा. त्याच्या आगामी चित्रपटांचे निर्मातेही त्याला त्या चित्रपटातील कमाईच्या नफ्याचा हिस्सा देण्यास अगदी आनंदाने तयार झाले आहेत. कारण रणवीर म्हणजे ‘भरघोस यश’ असे जणू नवं समीकरणच सिनेसृष्टीत झाले आहे. चित्रपटसृष्टीतील अवघ्या आठ वर्षांच्या कालावधीतच रणवीर यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचला आहे. एवढ्या कमी कालावधीत एवढं भरघोस यश प्राप्त करणं हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्याने त्याच्या यशाचं फळ मागणं यात चुकीचं काहीच नाही. त्याच्या आगामी चित्रपटांचे निर्माते त्याला अगदी राजीखुशीने नफ्याचा हिस्सा देण्यास तयार झाले आहेत.
#GullyBoy dips on Day 7… Metros strong, mass circuits weak… Will touch ₹ 💯 cr on Day 8… Weekend 2 will give an idea of its *lifetime biz*… Thu 19.40 cr, Fri 13.10 cr, Sat 18.65 cr, Sun 21.30 cr, Mon 8.65 cr, Tue 8.05 cr, Wed 6.05 cr. Total: ₹ 95.20 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) February 21, 2019
रणवीर ’83’ च्या शूटिंगसाठी सज्ज
सध्या रणवीर त्याच्या आगामी ’83’ या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. लवकरच रणवीर भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ’83’ मध्ये कपिल देव यांचा जीवनप्रवास उलगला जाणार आहे. भारतीय क्रिकेट टीमने 1983 साली उत्तम कामगिरी करत क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता तो प्रवास या चित्रपटात प्रेेक्षकांना पाहता येणार आहे. रणवीरने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे फोटोज ही सोशल मीडियावर शेअर केले होते. चित्रपटातील आपला लूकसाठी रणवीर कपिल देव यांच्याकडून स्पेशल ट्रेनिंगही घेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. रणवीर या चित्रपटासाठी मानधन स्विकारणार नसून या चित्रपटाच्या कमाईतील नफ्याचा भागिदार असणार आहे.
रणवीर ‘तख्त’मध्ये साकारणार ऐतिहासिक भूमिका
कबीर खान यांच्या ’83’ नंतर लगेचच रणवीर करण जोहरच्या ‘तख्त’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. त्यामुळे रणवीरच्या चाहत्यांना तो पुन्हा एकदा एका ऐतिहासिक भूमिकेत पाहता येणार आहे. या चित्रपटासाठीदेखील रणवीर मानधनाऐवजी प्रॉफीट स्विकारणार आहे. रणवीरचा सिम्बा आणि गलीबॉय आजही चाहत्यांच्या मनात धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांची चाहते अगदी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नाआधीच्या विधींना सुरूवात
भारत चित्रपटामध्ये कतरिना कैफचा ‘सिंपल’ लुक
अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम