ADVERTISEMENT
home / मनोरंजन
महानायकाच्या आणखी एका चित्रपटाचा रिमेक, आता रणवीर सिंह साकारणार ‘शहेनशाह’

महानायकाच्या आणखी एका चित्रपटाचा रिमेक, आता रणवीर सिंह साकारणार ‘शहेनशाह’

बॉलीवूड चित्रपटांमध्ये सध्या रिमेकचा ट्रेंड आहे. नवीन कथानकांपेक्षा जुन्या काळातील गाजलेल्या चित्रपटांच्या रिमेकला जास्त पसंती मिळत आहे. बॉलीवूडला महानायक अमिताभ बच्चन यांच्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे वरदान मिळालेले आहे. बिग बी यांच्या अॅक्शन आणि डायलॉगमुळे आजही हे जुने चित्रपट लोकांच्या स्मरणात कायम आहेत.या यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्या शोले आणि डॉन या चित्रपटांचे रिमेक झालेले आहेत. आता या चित्रपटांच्या रिमेकच्या यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. 

Instagram

अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशाह’चा होणार रिमेक

“रिश्ते मे हम तुम्हारे बाप लगते है, नाम है शहेनशाह” असं म्हणत ऐंशीच्या दशकात अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या चित्रपटाला त्या काळी इतकी लोकप्रियता मिळाली होती की आजही सिनेसृष्टी अमिताभ बच्चन यांना ‘शहेनशाह’च्या नावाने ओळखते. आता  याच शहेनशाह या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या रिमेकवर सध्या काम सुरू झाले असून या चित्रपटातील आधुनिक शहेनशाह असणार आहे अभिनेता ‘रणविर सिंह’. अभिनेता रणवीर सिंह त्याच्या एक्शन आणि स्टाईलने या भूमिकेला नक्कीच न्याय देईल असं अनेकांना वाटत आहे. सध्या बॉलीवूडमध्ये रणविर सिंहचाच बोलबाला असल्यामुळे त्याला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. मात्र अजूनही याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ADVERTISEMENT

‘शहेनशाह 2’ चं शुटींग कधी होणार सुरू

शहेनशाह चित्रपटाचे दिग्दर्शक टीनू आनंदच हा रिमेक करणार आहेत. टीनू आनंद यांनी एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. मात्र सध्या कोरोना व्हायरसच्या भयंकर संकटामुळे या चित्रपटाची अधिकृत घोषणा करणं ते टाळत आहेत. मात्र कोरोनाचं संकट दूर होताच या चित्रपटाच्या तयारीला उत्साहात सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची शूटिंग नेमकी  कधी सुरू होणार आणि त्यात कोणकोण कलाकार असणार हे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सध्या रणवीरलादेखील त्याच्या आगामी ‘83’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची चिंता सतावत आहे. भारतीय क्रिकेट टीमने 25 जून 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या विषयावर आधारित हा चित्रपट असून रणवीर यात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. वास्तविक हा चित्रपट 10 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार होता मात्र लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन सध्या पुढे ढकलण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे आता बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील आगामी चित्रपटांचं शूटिंग, प्रमोशन आणि कलाकारांच्या पुढील प्रोजेक्टच्या तारखा याचं गणितच विस्कळीत झालं आहे. हे सर्व आता पुन्हा कधी पूर्ववत होणार हे काळाच सांगू शकेल. 

चित्रपटामुळे अमिताभ यांना मिळाली ‘शहेनशाह’ची ओळख

1988 साली अमिताभ बच्चन यांचा ‘शहेनशाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.टीनू आनंद दिग्दर्शित शहेनशाहमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत मिनाक्षी शेषाद्री, प्राण, अमरिश पुरी, सुप्रिया पाठक यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट एका भ्रष्टाचारी पोलिस अधिकारी त्याच्या जीवनात होणारी उलथापालथ यावर आधारित होता. ज्यात अमिताभ बच्चन यांनी दोन प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. कायदा व्यवस्था हातात घेऊन लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाची ही कहाणी होती. या चित्रपटातील गाणी आणि अमिताभ बच्चन यांचा “रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है ‘शेहनशाह’ हा डायलॉग खूपच गाजला होता. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

 

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

फराह खानच्या मुलीने स्केच काढून मिळवले 70 हजार, भटक्या प्राण्यांना करणार मदत

उर्वशी रौतेलाचा नवा ‘बिजली की तार’ डान्स व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री शिवांगी जोशीला लाईफ पार्टनरमध्ये हव्या आहेत या ‘3’ गोष्टी

ADVERTISEMENT
13 Apr 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT