सॅक्रेड गेम्सचा दूसरा सिझन पहिल्या सिझन एवढा लोकांना पसंत पडला नसला ती चांगलाच लोकप्रिय झाला. या वेबसीरिजच्या या सिझनमधील पात्र आणि त्यांचे संवादसुध्दा लोकांच्या पसंतीस पडले आहेत. गेल्या सिझनमधील काटेकरच्या भूमिकेप्रमाणे सेकंड सिझनमधलेही संवाद आणि मीम्स प्रेक्षकांना आवडत आहेत. परिणामी #sartajsingh आणि #ganeshgaitonde या दोन भूमिकांसोबतच #sacredgames च्या पहिल्या आणि दुस-या पर्वातल्या इतरही भूमिकांना आणि त्या निभावणा-या कलाकारांना चांगलीच प्रसिध्दी मिळाली.
सेकंड सिझन सूरू होताच प्रसिद्धीत वाढ
अमेरिका स्थित मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाने सॅक्रेड गेम्सच्या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेची एक लिस्ट नुकतीच काढली आहे. त्यानुसार, सरताजच्या भूमिकेत दिसलेल्या #saifalikhan च्या लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्सचे दूसरे पर्व रिलीज झाल्यानंतरच्या आठवड्यात (15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट) 78 गुणांवरून 100 गुणांपर्यंत वाढ झालेली दिसलीयं. ज्यामुळे सैफ अली खान लोकप्रियतेत प्रथम क्रमांकावर आहे. गणेश गायतोंडे बनलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचीही लोकप्रियता 55 गुणांवरून 59 गुणांपर्यंत पोहोचलीय. ज्यामुळे नवाज लोकप्रियतेत दुस-या क्रमांकावर पोहोचलाय.
बात्या एबेलमॅन बनलेली कल्कि कोचलिन लोकप्रियतेत तिस-या स्थानावर आहे. सुरूवातीला 39 गुणांवर असलेली कल्कि लोकप्रियतेत 47 गुणांवर पोहोचली आहे. पूर्व आयएसआय प्रमुख शाहिद खानच्या खतरनाक भूमिकेत होता अभिनेता रणवीर शौरी. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाल्याने तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सेक्रेड गेम्सच्या गुरूजींनाही पसंती
Season 2 मधल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या गुरुजींच्या भूमिकेतील प्रतिभावान अभिनेता पंकज त्रिपाठी पाचव्या स्थानावर आहे. तर पहिल्या season मध्ये दिसलेली अभिनेत्री राधिका आपटे सहाव्या स्थानावर आहे. पहिल्या सिझननंतर दूस-या पर्वातही राधिका असेल का, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळेच सॅक्रेड गेम्स रिलीज होण्याच्या आठवड्यात आणि त्या आठवड्यानंतर राधिकाच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून आलीय.
सुरवीन चावला उर्फ जोजो, अमृता सुभाष उर्फ केडी यादव मॅडम, एलनाज नौरोजीउर्फ जोया मिर्जा आणि ल्यूक केनी उर्फ माल्कम या कलाकारांनांही #sacredgames च्या रिलीजनंतर चांगलीच प्रसिध्दी मिळाली.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “पहिल्या सहा अभिनेत्यांच्या लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्सच्या रिलीजच्या सुमारास चांगलीच वाढ झालेली दिसून आलीय. सॅक्रेड गेम्सच्या पहल्या सिझननंतर दुस-या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळेच ऑगस्ट महिन्यात या कलाकारांच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून आलीय. सोशल, व्हायरल न्यूज, डिजीटल न्यूज आणि न्यूजपेपर्समध्ये या कलाकारांची चांगलीच फॅन फॉलोइंग दिसून आलीय.”
कसं काढलं जातं हे रेटिंग –
अश्वनी कौल पुढे सांगतात की, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”
हेही वाचा –
वेबसीरिजमध्ये सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापूरच सर्वाधिक लोकप्रिय
Sacred Games 2 :धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने अनुराग कश्यपविरोधात पोलीस तक्रार