सई ताम्हणकरच्या ‘पाँडीचेरी’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर झालं प्रदर्शित

सई ताम्हणकरच्या ‘पाँडीचेरी’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर झालं प्रदर्शित

 


ग्लॅमगर्ल सई ताम्हणकरच्या आगामी ‘पाँडीचेरी’चं चित्रीकरण 1 फेब्रुवारीपासून पाँडीचेरीमध्ये सुरू झालं आहे. या  चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी सईच्या चित्रपटाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.पाँडीचेरीच्या पोस्टरमुळे उत्कंठा

या पोस्टरमध्ये सईचा ब्लॅक अँड व्हाइट नो मेकअप लूक उठून दिसतोय.  या पोस्टरवरची टॅगलाईन आहे दूरवर राहणाऱ्या कुटुंबाची गोष्ट. तसंच पोस्टरमध्ये सई आणि वैभव दोघंही भेदरलेले दिसत आहेत.आता यावरून हा सिनेमा गंभीर विषयावर असण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीचं सईने या चित्रपटाच्या स्टारकास्टसोबतचा फोटो इन्स्टा अकाउंटवर शेअर केला होता. या चित्रपटात पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि वैभव तत्त्ववादीची जोडी पहिल्यांदाच आपल्याला पडद्यावर पाहता येणार आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभवसोबतच नीना कुलकर्णी, महेश मांजरेकर, अमृता खानविलकर, तन्मय कुलकर्णी आणि गौरव घाटणेकर हे कलाकारही दिसणार आहेत.


आयफोनवर शूट होणार पाँडेचरी


पाँडीचेरी हा पहिला चित्रपट आहे, ज्याचं आयफोनवर शूट करण्यात येणार आहे. या फिल्मबाबत सई म्हणाली की, ‘संपूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण हे पाँडीचेरीत होणार आहे. या चित्रपटातील माझ्या भूमिकेचा लूक खूप नॅचरल आहे. नो-मेकअप, नो-हेअरस्टाइल लूकमध्ये मी यात दिसणार आहे.या सिनेमाची प्रोसेस मी एवढी एन्जॉय करतेय की, पहिल्यांदाच एखाद्या कार्यशाळेला जात असल्यासारखी छान भावना आहे. प्रत्येक अभिनेत्रीच्या आयुष्यात अशी फिल्म यायला हवी, जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्टझोनमधून बाहेर निघून काहीतरी वेगळं करता. त्यामुळे सध्या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मी खूप उत्सुक आहे.”  


सई आणि सचिन कुंडलकर पुन्हा एकत्र
 

 

 


View this post on Instagram


 

 

Candyfloss. Happy Birthday. I Love you. #birthday #birthdayboy #besttravelpartner #amore #meamore #peace #love #luck #to #you #myfriend


A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on
दिग्दर्शक सचिन कुंडलकर आणि सई ताम्हणकर यांचा एकमेकांबरोबर दुसरा चित्रपट आहे. या आधी 2016 मध्ये सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘वजनदार’ चित्रपटांमध्ये सई ताम्हणकरने काम केलं होतं. या सिनेमातली भूमिकेसाठी सईने तब्बल 10 ते 15 किलो एवढं वजनही वाढवलं होतं. आता तब्बल तीन वर्षांनी हे दोघं एकत्र काम करत आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

🌺 #saietamhankar #candid #moments #caughtinaction PC. @jubindesai & it was your phone @sanchitatrivedi.


A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on
या चित्रपटातील सईच्या नो-मेकअप रिअलिस्टिक लूकमुळे सईच्या या नव्या भूमिकेविषयी अजूनच उत्कंठा वाढणार आहे. त्यामुळे पाँडीचेरीविषयी सध्या सईच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.


हेही वाचा -


फोटोग्राफर तेजस नेरुरकरच्या संकल्पनेतील कॅलेंडर ‘वंदे मातरम् 2019’


मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘10’ हॉट (Hot) आणि बोल्ड अभिनेत्री


सई ताम्हणकरचा स्वॅगलुक 'लकी'च्या टायटलमध्ये