सोशल मीडियावर ‘छा गये छोटे नबाव’, पाहा फोटो

सोशल मीडियावर  ‘छा गये छोटे नबाव’, पाहा फोटो

सोशल मीडियाच्या नजरा कायम खिळलेल्या असतात त्या क्युट तैमुर अली खानवर… तैमुर काय करतो कुठे जातो?,त्याचा नवीन हेअरकट कोणता या सगळ्यावर त्यांचे लक्ष असते.  पण थांबा आज आम्ही छोटे नवाब तैमुरबद्दल बोलत नाही तर पतौडी घराणातल्या मोठ्या मुलाबद्दल बोलत आहोत.अर्थातच इब्राहिम अली खानबद्दल बोलत आहोत. चित्रपट पाहण्यासाठी जुहूला गेलेला इब्राहिम थिएटरमधून बाहेर पडला.त्याला पापाराझींच्या कॅमेऱ्याने कैद केले त्याचा लूक पाहून सोशल मीडियावर त्याच्या हँडसम असण्याची चर्चा रंगली आणि हा हा म्हणता सोशल मीडियावर ‘छा गये छोटे नवाब’


अॅमी जॅक्सनकडे आहे गोड बातमी


छोटे नवाब इब्राहिमचा तो लुक


आता स्टार किड असेल तर त्यांची तुलना नक्कीच त्यांच्या पालकांशी होते. सैफ आणि अमृता सिंह यांची सारा आणि इब्राहिम ही मुले. साराने नुकतेच बॉलीवूडमध्ये केदारनाथ चित्रपटातून पदार्पण केले. आता साराचा भाऊ चित्रपटात येईल का? अशी चर्चा देखील होऊ लागली आहे. इब्राहिमकडे पाहिले तर तुम्हाला तरुणपणीचा सैफ आठवल्यावाचून राहणार नाही.  तेच डोळे, तोच चेहरा, तशीच स्टाईल त्यामुळे इब्राहिमला पाहून अरे सैफ अशी गल्लत होते. आता इब्राहिम हा सैफचे लेटेस्ट र्व्हजन आहे म्हटल्यावर त्याचा लुकही तसा अपडेटेट आहे असे म्हणायला हवे. छोटे नवाब इब्राहिमचा ड्रेसिंगसेंसही चांगला आहे. तर साराच्या बाबतीतही ती डिक्टो अमृता सिंह दिसते अशी प्रतिक्रिया उमटते. पण दोन्ही मुले ही अगदी हुबेहूब आई- वडिलांवर गेली आहेत. आता इब्राहिमच्या याच लुकमुळे तो बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे असे म्हटले जात आहे. तो कोणत्या चित्रपटातून दिसेल किंवा त्याने कोणता चित्रपट स्विकारला आहे का? यासाठीच पापाराझी त्याला अनेक ठिकाणी फॉलो करत असतात.


ibrahim ali khan


मृत्यूच्या दाढेतून परतली जुही परमार


खेळ आणि अभिनय दोन्हीचा वारसा


जर तुम्हाला माहीत नसेल तर सैफचे वडील हे क्रिकेटर होते आणि आई शर्मिला टागोर या अभिनेत्री आहेत. त्यामुळेच इब्राहिमवर खेळ आणि अभिनय या दोन्हीचे संस्कार आहे. इब्राहिमला अनेकदा क्रिकेट खेळतानाही पाहिले गेले. तर त्याच्या अभिनयाबाबत अद्यापही कोणालाच काही माहिती नाही. पण आता सारानंतर सैफचा हा हँडसम मुलगा चित्रपटात दिसेल का ? याची देखील चर्चा होऊ लागली आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#saifalikhan son #ibrahimalikhan snapped post movies tonight #instadaily #movies #instalove #manavmanglani @manav.manglani


A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on
इब्राहिमच्या नावे फॅनपेज


तसं पाहायला गेलं तर इब्राहिमने अजून काहीच केलेले नाही. पण तरीदेखील तो कायम चर्चेत असतो. तैमुरच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. सैफच्या या दोन्ही मुलांच्या बाबतीत सोशल मीडियालाच अधिक उत्सुकता आहे. त्यामुळे त्यांच्या नावे सोशल प्लॅटफॉर्मवर फॅन पेज चालवली जातात.


लाडकी दयाबेन पुन्हा करणार हे मा माताजी!


शाहरुखचा मुलगाही चर्चेत 


aryan khan


सैफ आणि शाहरुख एकाच जनरेशनचे... सैफच्या मुलासोबत किंग खानचा मोठा मुलगा आर्यनदेखील शाहरुखसारखा हुबेहुब आहे. त्याचेही अनेक फोटो वायरल झालेले आहेत. त्याच्या या लुकमुळे हा किंग खानचा वारसा चालवणार असे म्हटले जात आहे. तर शाहरुखची लहान मुलगी सुहाना अभिनयात येणार असून सध्या तिने थिएटरकडे आपले लक्ष अधिक केंद्रित केले आहे. त्यामुळे तिच्या पदार्पणाची शक्यता अधिक असल्याचे म्हटले जात आहे.


(सौजन्य- Instagram)