अभिनेत्री शिल्पा शिंदे चाहत्यांना बसणार झटका

अभिनेत्री शिल्पा शिंदे चाहत्यांना बसणार झटका

टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागच्या काही दिवसात बिग बॉस - 12 ची विजेती दीपिका कक्कडला मख्खी असं शिल्पाने म्हटलं होतं तेव्हाही ती चर्चेत आली होती. त्यानंतर शिल्पाला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. सर्वात पहिल्यांदा ‘भाभीजी घर पर है’ सोडल्यानंतरत शिल्पाच्या नावाची बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर बिग बॉस - 11 ची विजेती झाल्यानंतर शिल्पा शिंदेच्या फॅन्स फॉलोईंगमध्ये वाढ झाली. पण शिल्पाच्या चाहत्यांना आता पुन्हा एकदा नवा झटका बसणार आहे. कारण शिल्पाने आपलं ट्विटर अकाऊंट डिलीट केलं आहे. इतकंच नाही तर शिल्पाने पुन्हा कधीही ट्विटरवर न येण्याची शपथ घेतली आहे. पण यामागचं नक्की काय कारण आहे हे शिल्पानं स्पष्ट केलं आहे.


‘या’ कारणामुळे शिल्पानं सोडलं ट्विटर


Shilpa-Shinde 3
शिल्पा शिंदेने नक्की ट्विटर सोडण्याचं नक्की कारण काय? असा प्रश्न नक्कीच आता तिच्या चाहत्यांना पडला असणार. तर शिल्पाने यासाठी कारण दिलं आहे. ‘माझ्या विचारानुसार सोशल मीडिया ही अशी एक जागा आहे, जिथे आपण आपला आवाज उठवू शकतो, आपण आपले विचार मांडू शकतो आणि हा अधिकार प्रत्येकाजवळ आहे. मात्र जेव्हा मी असं काही करते, तेव्हा माझे चाहतेच मला समजवायला येतात. रात्री एका चाहत्याने मला टॅग करून एक पोस्ट केली. त्यानंतर मी ते रिट्विट केलं. त्यानंतर मी पाहिल्यानंतर मला दिसलं की, या सगळ्या बाबतीत मी का पडते अशा तऱ्हेने माझे चाहते मलाच समजावत होते. मला वाटतं आता माझ्या चाहत्यांना फक्त आमच्या रोजच्या आयुष्यात काय घडत असतं हे बघण्यातच जास्त रस आहे. असं नसेल तर आम्ही आता पुढे कोणते प्रोजेक्ट करत आहोत याबाबत त्यांना उत्सुकता असते. हे सर्व शेअर करण्यात मला काहीच अडचण नाही. पण जर माझे चाहते मलाच कंट्रोल करायला लागले असतील, तर ते मला अजिबात आवडलं नाहीये.’ अशा स्वरुपाचं स्पष्टीकरण शिल्पानं एका मुलाखतीदरम्यान दिलंय. शिल्पाने केवळ ट्विटर अकाऊंट डिलीट केलं नाही तर पुन्हा कधीही ट्विटरवर आपण परतणार नसल्याची शपथ घेत तसं जाहीरही केलंय. ‘जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी पुन्हा कधीही ट्विटरवर येणार नाही’ अशा स्वरूपाचं वक्तव्यही तिने केलं आहे. शिवाय सोशल मीडिया ही गोष्ट आपल्यासाठी नाही असंही शिल्पाने म्हटलं आहे.


शिल्पाच्या चाहत्यांनी मागितली होती हिना खानची माफी


Shilpa-Shinde 4
शिल्पा शिंदे नेहमीच बोल्ड कमेंट्स करत असते आणि त्यामुळे बराच वाद निर्माण होत असतो. तिने केलेली कमेंट बऱ्याचदा तिच्या चाहत्यांनाही आवडत नाही. त्यामुळे जेव्हा शिल्पा शिंदेने दीपिका कक्कडला मख्खी असं म्हटलं तेव्हाही तिच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केलं होतं. शिल्पाच्या काही चाहत्यांनी शिल्पाला फॉलो केल्याबद्दल हिना खानचीही माफी मागितली. वास्तविक बिग बॉस - 11 मध्ये शिल्पा आणि हिना या दोघांमध्ये विस्तवही जाणार नाही अशा प्रकारचं यांचं नातं होतं. दोघांचा छत्तीस आकडा होता. त्यामुळे हिनाला सोशल मीडियावर शिल्पाच्या बऱ्याच चाहत्यांनी वेडवाकड्या कमेंट्स दिल्या होत्या. पण त्याच चाहत्यांनी नंतर शिल्पाच्या वक्तव्यांमुळे हिना खानची माफी मागितली. त्या चाहत्यांना हिनाने धन्यवाद देत माफ केलं होतं.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


मृणाल कुलकर्णीच्या ‘ती and ती’चे ट्रेलर प्रदर्शित; इंटरेस्टिंग लव्ह ट्रँगल


'मणिकर्णिकाः दी क्वीन ऑफ झांसी' चित्रपट होणार 50 देशांमध्ये प्रदर्शित


आगामी '83' मध्ये रणवीर सिंगचा नवा रेकॉर्ड