सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवशी 'शेरशाह'चा फर्स्ट लुक रिलीज

सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवशी 'शेरशाह'चा फर्स्ट लुक रिलीज

बॉलिवूडचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा आज 35वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सिद्धार्थचा आगामी सिनेमा 'शेरशाह'चा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धाची कहाणी या सिनेमात दिसणार आहे. या युद्धाचे हीरो भारतीय सेनेचे परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. करण जोहर या सिनेमाचा निर्माता आहे. 'शेरशाह' सिनेमाचा फर्स्ट लुक करण जोहरनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलं आहे. करणनं सिनेमाचे एकूण तीन पोस्टर्स शेअर केले आहेत. ज्यामध्ये सिद्धार्थ युद्धाच्या रणभूमीवर दिसत आहे. पाकिस्तानी सैनिकांमध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांची एवढी दहशत होती की त्यांनी बत्रांना ‘शेरशाह’ असं नाव दिलं होतं. या पार्श्वभूमीवरच सिनेमाचं नाव 'शेरशाह' ठेवण्यात आलं आहे. सिद्धार्थ व्यतिरिक्त कियारा अडवाणी आणि जावेद जाफरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विष्णुवर्धन दिग्दर्शित 'शेरशाह' सिनेमा 3 जुलै 2020मध्ये रिलीज होणार आहे.

(वाचा : मुंबईची माफिया क्वीन 'गंगूबाई काठियावाडी', आलिया भटचा फर्स्ट लुक रिलीज)

कियारा आणि सिद्धार्थंचं अफेअर ?

आलिया भटनंतर सिद्धार्थ मल्होत्राच्या आयुष्यात नव्या व्यक्तीनं एंट्री घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. नुकतंच दोघंही मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. या दोघांनीही एकत्र न्यू ईअर सेलिब्रेशन केल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थचे नाव तारा सुतारियासोबत जोडले गेले होते.

(वाचा : ‘हिरकणी’नंतर प्रसाद ओक करणार विश्वास पाटलांच्या ‘चंद्रमुखी’चं दिग्दर्शन)

आलियाबरोबरच्या नात्यात खूप चढउतार होते- सिद्धार्थ

कोणत्याही नात्यामध्ये चढ-उतार येत असतात आणि बॉलिवूडमधील कपल्स देखील याला अपवाद नाहीत. सिद्धार्थच्या म्हणण्यानुसार, आलियासोबतचं नातं संपलं असलं तरीही त्या दोघांमध्ये कोणताही कडवटपणा नाही. आलिया आणि त्याच्या नात्यामध्ये बरेच चढ-उतार आल्याचं त्यानं मान्य केले. आलियाला डेट करण्याआधीपासूनच आपण ओळखत असल्याचेही सिद्धार्थनं सांगितलं होतं. या नात्यातून बाहेर पडणं आपल्यासाठी खूप कठीण गेले असंही यावेळी सिद्धार्थने सांगितले. नात्यामध्ये अतिशय गुंतल्यामुळे त्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा व्यावसायिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणंही बरंच कठीण होतं. कोणत्याही नात्यामध्ये एकत्र राहायचं नाही हे ठरवण्यामागे दोन माणसांची काही महत्त्वाची कारणं असू शकतात, असं सिद्धार्थनं करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण'मध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं.

(वाचा : मलायकासारखी फिगर हवीय, पाहा तिच्या फिटनेसचं रहस्य सांगणारा VIDEO)

स्टुडंट ऑफ द ईअरमध्ये पहिल्यांदा एकत्र

आलिया, वरूण आणि सिद्धार्थने 'स्टुडंट ऑफ द ईअर' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर दोघांनाही धर्मा प्रॉडक्शनच्या कपूर अँड सन्समधून पुन्हा एकदा एकत्र काम केले. यानंतर आलिया आणि सिद्धार्थचं नाव एकमेकांबरोबर जोडले गेले. 2016मध्ये दोघांचं अफेअर सुरू झालं पण हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही.

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.