‘अशी ही आशिकी’ हा सचिन पिळगावकर यांचा आगामी चित्रपटात झळकणार आहे अभिनय आणि हेमल ही फ्रेश जोडी.
हा चित्रपट एक कॉलेज लाईफची सिंपल लव्हस्टोरी असून अभिनय बेर्डे या चित्रपटात स्वयम तर हेमल इंगळे अमरजाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच टी – सिरीजदेखील मराठीत पदार्पण करत आहे. दिग्दर्शनासोबत सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर कथा-पटकथा-संवाद देखील सचिन यांनीच लिहिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट सर्वस्वी सचिन पिळगावकर यांचा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यापूर्वीदेखील असे बरेच मराठी चित्रपट सचिन पिळगावकर यांनी केले आहेत. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये पुन्हा काय धमाल असणार आहे हे लवकरच कळेल.
याच चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही अभिनय आणि हेमल या फ्रेश जोडीच्या केमिस्ट्री आणि आवडीनिवडीबद्दल विचारले काही झटपट प्रश्न.
काय वाटतं या ‘अशी ही आशिकी’ कपलला व्हॅलेंटाईनबद्दल
या युवा जोडीने व्हॅलेंटाईन डे चं नामकरण ‘AHA’ डे म्हणजेच ‘अशी ही आशिकी’ दिवस असं केलं होतं. दोघांच्या ही व्हॅलेंटाईन डे च्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. अभिनय कॉलेजमध्ये असताना चक्क व्हॅलेंटाईन्स डे ला घरीच थांबायचा आणि चक्क टीव्ही बघायचा. तर कोल्हापूरमध्ये व्हॅलेंटाईन डे चं जास्त फॅड नसल्याने हेमलने कधी खास असा सेलिब्रेट केला नाही पण यंदा मात्र अशी ही आशिकी या तिच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटामुळे तिचा यंदाचा व्हॅलेंटाईन डे खास आहे.
भविष्यात ‘या’ क्यूट कपलला कोणत्या भूमिका करायच्या आहेत?
चॉकलेट बॉय म्हणून मुलींमध्ये क्रेझ असलेल्या अभिनयचा पहिला सिनेमा ‘ती सध्या काय करते’ हा एक रोमँटीक चित्रपट होता. त्यानंतर आता दुसरा चित्रपट ‘अशी ही आशिकी’ हा सुद्धा लव्हस्टोरी आहे. मग अभिनयला आता कोणत्या प्रकारची भूमिका करायला आवडेल.
असं विचारलं असता तो म्हणाला की, ‘ मला भरपूर अॅक्शन असलेला किंवा ड्रामा ओरिएंटेड असे सगळ्या प्रकारचे चित्रपट करायला आवडतील.
तर या चित्रपटातून मराठीमध्ये डेब्यू करणाऱ्या हेमलची चॉईस मात्र थोडी वेगळी आहे. हेमल म्हणाली की, ‘मला कंटेट ऑरिएंटेड फिल्म्स करायच्या आहेत. ज्यामध्ये अभिनेता किंवा अभिनेत्रीपेक्षा कथेला जास्त महत्त्व असेल. अभिनेत्री राधिका आपटेसारख्या भूमिका करायच्या आहेत किंवा जशी भूमिका आलिया भट्टने हायवेमध्ये केली होती.’
अभिनय आणि हेमलचा सेलिब्रिटी क्रश
या दोघांच्याही सेलिब्रिटी क्रशमध्ये थोडी समानता होती. कारण दोघांनीही आपल्या जनरेशननुसार बॉलीवूडमधल्या यंग सेलेब्सची नाव घेतली. अभिनयची सेलिब्रिटी क्रश एक नाहीतर दोन आहेत. पहिली आहे आलिया भट्ट तर दुसरी आहे सारा अली खान. तर हेमलचा सेलिब्रिटी क्रश आहे धडक फेम ईशान खट्टर.
‘अशी ही आशिकी’ची निर्मिती टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. तसेच मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या चित्रपटाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे सुद्धा या चित्रपटाचे निर्माते आहेत.
हेही वाचा –
तरूणाईसाठी नवीन लव्ह साँग ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’
सोनू निगमच्या ‘रकम्मा’ गाण्यावर अभिनय करणार हटके डान्स