ADVERTISEMENT
home / सौंदर्य
घरी केस कर्ल करण्याआधी या ‘8’ टीप्स अवश्य वाचा

घरी केस कर्ल करण्याआधी या ‘8’ टीप्स अवश्य वाचा

बॉलीवूड सेलिब्रेटीजचा अनेकजणींवर प्रभाव पडत असतो. त्यामुळे सेलिब्रेटी लुकसाठी बऱ्याचणी बॉलीवूड स्टार्संना फॉलो करत असतात.  तुम्हालाही नेहमीचा बोरींग लुक सोडून काहीतरी एखादा हटके लुक हवा असेल तर केस कर्ल करण्यास काहीच हरकत नाही. पण केस कर्ल करण्यासाठी त्याबाबत योग्य ज्ञान मात्र नक्कीच असायला हवं. पूर्वी कुरळे अथवा कर्ली हेअर सौंदर्यांत बाधा आणणारी हेअर स्टाईल समजली जायची. मात्र आता अनेकजणी बिनधास्तपणे ही हेअरस्टाईल कॅरी करतात.पार्लरमध्ये योग्य पद्धतीने केस कर्ल केले जातात. मात्र पार्लरमध्ये सतत केस कर्ल करण्यासाठी जाणं थोडं खर्चिक पडू शकतं. यासाठी अनेक जणी घरीच एखादं स्ट्रेटनर आणि कर्लर आणून ठेवतात आणि त्याच्या मदतीने घरीच केसांची हेअर स्टाईल करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही देखील एखाद्या फंक्शनसाठी घरीच केल कर्ल करण्याचा विचार करत असाल तर आम्ही दिलेल्या या माहितीचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. लक्षात ठेवा घरीच कर्लरने केस कर्ल करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. स्ट्रेटनिंगपेक्षा केस कर्ल करतानाअधिक ज्ञान व जास्त मेहनत घ्यावी लागते. आजकाल बाजारात कर्लर सहज उपलब्ध असल्याने तुम्हाला घरीच केस कर्ल करणं सोपं जाऊ शकेल. मात्र एखाद्या नामांकित कंपनीचं कर्लर विकत घ्या. सिरॅमिक कर्लींग आर्यनचा तुम्हाला फायदाच होईल.

curler 1

केस कर्ल करताना कोणती काळजी घ्याल

1. कर्लरचे तापमान योग्य प्रमाणात ठेवा –

ADVERTISEMENT

केस कर्ल करताना कर्लरचे तापमान प्रमाणात असणं फार गरजेचं आहे. केस कर्ल करताना कर्लर 300 ते 350 डिग्रीपेक्षा जास्त तापवू नका. कारण तापमान वाढविल्यास तुमच्या केसांचे कायमचे नुकसान होऊ शकते.

2. कर्लिंग टूल तपासा –

केस कर्ल करताना तुम्ही कर्लरचा टूलदेखील योग्य निवडणे गरजेचे आहे. जर तुम्हाला केस राऊंड बाऊंसी कर्ल करायचे असतील तर चुकूनही थीन कर्लिंग आर्यन वापरू नका

3. तुमच्या केसांचा प्रकार ओळखा –

ADVERTISEMENT

केस विविध प्रकारे कर्ल केले जातात त्यामुळे तुम्हाला नेमके कोणत्या प्रकारचे कर्ली केस हवे आहेत ते ठरवा. लूज कर्ल्स, राऊंड बाऊंसी कर्ल्स, रिबन लुक कर्ल्स, स्ट्रेट अॅंड टॉंग अशा विविध प्रकारे कर्लींग तुम्ही करू शकता.

कुरळ्या केसांची स्टाईल करण्यासाठी वापरा 10 सोप्या टीप्स

4. केसांना कर्ल करण्याची पद्धत-

केस कर्ल करताना खालून वरपर्यंत, वरून खालपर्यंत, अर्धापासून खालच्या टोकांपर्यंत असे विविध प्रकारे केस कर्ल करता येतात. त्यामुळे तुम्हाला कसा लुक हवा आहे त्यानूसार तुम्ही केस कोणत्या डायरेक्शनमध्ये कर्ल करणार ते निवडा.

ADVERTISEMENT

5. केस कर्ल केल्यावर ते थंड करा-

केस कर्ल करताना जर ते एकमेकांत गुंतले तर आधी त्यांना सामान्य तापमानापर्यंत थंड करा आणि मगच पुढील प्रक्रीया करा. केस गरम असताना एकमेकांमध्ये गुंतलेले केस सोडविण्याचा प्रयत्न केल्यास ते लगेच तुटू शकतात.

6. हेअर स्प्रेचा वापर टाळा-

curly hair

ADVERTISEMENT

केस स्ट्रेट अथवा कर्ल केल्यावर ते  बराच काळ तसेच दिसावेत यासाठी केसांवर भरपूर हेअर स्प्रे मारण्यात येतो. मात्र हे चुकीचे आहे कारण असे केल्यामुळे केस लवकर खराब होऊ शकतात. हेअर स्प्रेमधील केमिकल्समुळे तुमच्या केसांचे अधिक नुकसान होऊ शकते.

7. चांगल्या दर्जाचे हेअर सिरम लावा-

केसांवर कोणतीही हेअरस्टाईल करण्यापूर्वी चांगल्या दर्जाचे हेअर सिरम लावा. ज्यामुळे तुमच्या केसांवर एकप्रकारचे सुरक्षा कवच निर्माण होईल.

8. केस पूर्ववत करण्यासाठी हेअर वॉश घ्या-

ADVERTISEMENT

hair spa at home 1

केसांना कोणतीही हेअर स्टाईल केल्यावर ते पूर्ववत करण्यासाठी केस धुणे फार गरजेचे आहे. कार्यक्रम झाल्यावर केस पुन्हा पूर्ववत करण्यासाठी केसांना नारळाच्या तेलाने मसाज करा. जाड टॉवेल गरम पाण्यात बूडवून तो केसांना पंधरा ते वीस मिनीटे गुंडाळून ठेवा. केसांना स्टीम दिल्यानंतर एक ते दोन तासांनी केस थंड पाण्याने धुवून टाका. केस धुतल्यावर त्यावर एखादे चांगले हेअर सिरम लावा. केस स्वच्छ करण्यासाठी महिन्यातून दोनदा हेअर स्पा करा. घरीच हेअर स्पा करण्यासाठी ही माहिती अवश्य वाचा. आम्ही दिलेल्या या टीप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला जरूर कळवा.

केस कर्ल करण्याआधी POPxo चा व्हिडीओ अवश्य पहा

विविध प्रकारच्या कर्ली हेअरस्टाईलसाठी POPxo चा हा व्हिडीओदेखील पहा

ADVERTISEMENT

आणखी वाचा

Hair Spa: घरीच पार्लरप्रमाणे ‘हेअर स्पा’ कसा कराल

Latest Hair Cut : जाणून घ्या तुमच्या चेहऱ्याच्या आकारावरून कोणता ‘हेअरकट’ तुम्हाला सुट करेल

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

ADVERTISEMENT

 

15 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT