home / लाईफस्टाईल
‘टोटल धमाल’ ची बॉक्स ऑफिसवर धूम

‘टोटल धमाल’ ची बॉक्स ऑफिसवर धूम

अजय देवगन, माधुरी दिक्षित-नेने आणि अनिल कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘टोटल धमाल’ सध्या बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 61 कोटीच्या वर कमाई केली आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित टोटल धमाल हा कॉमेडी चित्रपट 100 कोटींच्या वर कमाई करणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 16.50 कोटी, दुसऱ्या दिवशी 20.40 तर  तिसऱ्या दिवशी 25 करोडची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाची सुरूवात चांगली झाली आहे. असं असलं तरी सध्या तरी चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

टोटल धमाल हा धमाल सिरीजचा तिसरा चित्रपट

टोटल धमाल हा धमाल सिरीजचा तिसरा चित्रपट आहे. या तिन्ही धमाल सिरीजनां प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या धमाल सिरीज चा पहिला चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये संजय दत्त अर्शद वासरी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, अशिष चौधरी हे कलाकार होते. धमाल चित्रपटाला देखील चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या सिरीजचा दुसरा चित्रपट डबल धमाल 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता तिसऱ्या सिरीजमध्ये माधुरी दिक्षित, अजय देवगन आणि अनिल कपूर हे दिग्गज कलाकार असल्यामुळे या सिरीजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय या चित्रपटात माधुरी आणि अनिल कपूर बऱ्याच वर्षांनी एकत्र या चित्रपटात काम केलं आहे. दिग्दर्शक इंदर कुमारबरोबरही बऱ्याच वर्षांनी या  दोघांसोबत एकत्र काम करत आहेत. त्यामुळे चित्रपटाला चाहते गर्दी करत आहेत. या कॉमेडी चित्रपटामध्ये अगदी वाघ, सापापासून ते माकडापर्यंत बऱ्याच प्राण्यांचीही महत्त्वाची भूमिका आहेत.

हॉलीवूड सेन्सेशन क्रिस्टलदेखील करणार टोटल धमाल

यावेळी ‘टोटल धमाल’मध्ये अजय, अनिल, माधुरी, रितेश, अर्शद, जावेद यांच्याबरोबरच हॉलीवूड सेन्सेशन क्रिस्टलदेखील प्रेक्षकांना दिसणार आहे. क्रिस्टलचा पहिल्यांदाच बॉलीवूडमध्ये प्रवेश होणार आहे. गेल्या तेवीस वर्षांपासून क्रिस्टल हॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये काम करत आहे. क्रिस्टल ही कॅपुचिन जातीची माकडीण आहे. हॉलीवूडमध्ये ती खूपच प्रसिद्ध असून तिने अनेक चित्रपट गाजवले आहेत. मात्र पहिल्यांदाच ‘टोटल धमाल’मधून तीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिस्टल ही ट्रेंड माकडीण आहे. ती माणसांप्रमाणेच वावरते. तिला सर्वसामान्य माणसांप्रमाणे वावरता येतं. इतकंच नाही तर आपण रोज जी कामे करतो ती कामंदेखील ती सराईतपणे करू शकते. आश्चर्याची बाब म्हणजे माणसांनी बोललेलं तिला सर्व काही कळतं आणि ती त्यावर आपल्या प्रतिक्रियादेखील देते.

total dhamal 1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘ह.म.बने तु.म.बने’ समजवणार ‘गुड टच आणि बॅड टच’

चांदनीच्या साडीचा लिलाव सुरु, किंमत ऐकाल तर थक्क व्हाल

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

25 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this