ADVERTISEMENT
home / Festival
जिजाऊंचा इतिहास ‘जिऊ’च्या स्वरुपात झळकणार मोठ्या पडद्यावर

जिजाऊंचा इतिहास ‘जिऊ’च्या स्वरुपात झळकणार मोठ्या पडद्यावर

 

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’… इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ या शब्दांत सामावलेला आहे असं म्हटलं तर अतिशययोक्ती ठरू नये. कुशाग्र बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, कुशल राजनीती, संघटनशक्ती आणि कुटुंबवत्सल जिजाऊ केवळ शिवरायांच्याच नाही तर संपूर्ण स्वराज्याच्या माता होत्या. प्रसंगी कठोर होऊन शत्रूस जेरीस आणणाऱ्या या स्वराज्य कनिकेच्या कर्तृत्वाला हजारो-लाखो तोफांची सलामी दिली तरी कमीच आहे. शिवरायांच्या संगोपनात तसूभरही कसर न सोडणाऱ्या ‘जिजाऊ’ कशा होत्या या बद्दलची माहिती तशी कमीच पण त्यांचं कार्य जगासमोर आलं पाहिजे, खरंतर ती काळाची गरजच आहे म्हणा ना. स्त्री अबला नसून सबला आहे हे दाखवून देणाऱ्या या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट नसता आला तरच नवल. नेमकी हीच बाब हेरत फायरफ्लाईज एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत अनुजा देशपांडे निर्मित आणि प्रितम एस.के. पाटील लिखित-दिगदर्शित ‘जिऊ’ हा मराठी चित्रपट लवकरच डोळ्यांचे पारणे फेडण्यास सज्ज होणार आहे. 

(वाचा : मुंबईची माफिया क्वीन ‘गंगूबाई काठियावाडी’, आलिया भटचा फर्स्ट लुक रिलीज)

 

अनुजा देशपांडे यांचा ‘जिऊ’ हा पहिलाच चित्रपट असून ह्या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तब्ब्ल चार वर्ष केवळ राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास अभ्यासत ‘जिऊ’ची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललं आहे. तर ‘खिचिक’, ‘डॉक्टर डॉक्टर’ या दोन चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर तिसरा ‘जिऊ’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शक प्रितम एस.के.पाटील उत्सुक आहेत.अनुजा देशपांडे सांगतात, “महिलांच्या हाती केवळ पाळण्याचीच नाही तर संपूर्ण राज्याच्या जडणघडणीची दोर देखील सक्षमपणे सांभाळण्याची ताकद आहे. स्वरज्य पर्वाची चाहूल देणारी ही आई आपल्या लेकींना सांगू पाहतेय उठा.. सज्ज व्हा.. स्वालंबी व्हा…प्रगतीची नवी दालनं शोधा.” लवकरच ‘जिऊ’ हा चित्रपट आपल्या भेटीस येईल तत्पूर्वी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. स्वराज्य पर्वाची चाहूल देणाऱ्या फडकणाऱ्या भगव्याने सारा आसमंत सोनेरी प्रकाशात उजळणारे ‘जिऊ’चं हे पोस्टर ही एका भव्य-दिव्य ऐतिहासिक मराठी चित्रपटाची नांदीच आहे.   

(वाचा : ‘हिरकणी’नंतर प्रसाद ओक करणार विश्वास पाटलांच्या ‘चंद्रमुखी’चं दिग्दर्शन)

ADVERTISEMENT
 

नवीन वर्षात हे सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच एकाच चित्रपटात काम करणार आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटात हा योग जुळून आला आहे. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे. ‘फटमार फिल्म्स एलएलपी’ या निर्मिती संस्थेकडून ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची निर्मिती करण्यात येत आहे. हा सिनेमा 3 एप्रिल 2020 ला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

(वाचा : भाईजान सलमानचा व्हिलनसोबत दोस्ताना, कोट्यवधींची कार केली गिफ्ट)

‘शहीद भाई कोतवाल’
‘एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग’ असं म्हणत ब्रिटिशांविरोधात निधड्या छातीनं लढणाऱ्या ‘शहीद भाई कोतवाल’ यांच्यावर आधारित चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात आशुतोष पत्की, ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर,अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, कमलेश सावंत, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव, प्राजक्ता दिघे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘इभ्रत’
एक अस्सल मराठमोळं प्रेमी युगुल आहे मल्हार मायडी. ही जोडी इभ्रत नावाच्या प्रेमकथेतून रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. डॉल्फिन सिनेक्राफ्ट या बॅनरखाली श्रुती वसंत दांडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रवीण रमेश क्षीरसागर यांनी इभ्रतच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा असे प्रमुख कलाकार दिसणार आहेत. तरल आणि प्रेमाची गोष्ट सांगणारा इभ्रत 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ADVERTISEMENT
21 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT