'प्रेम पॉयजन पंगा'मुळे सुरू झालाय प्रेक्षकांच्या मनात दंगा

'प्रेम पॉयजन पंगा'मुळे सुरू झालाय प्रेक्षकांच्या मनात दंगा

मराठी टेलिव्हिजनवर सतत निरनिराळ्या धाटणीच्या मालिका येत असतात. शिवाय प्रेक्षकांचं मालिकांवर विशेष प्रेम असतं. एखादी मालिका लोकप्रिय झाली की त्यामधील भूमिका करणारे कलाकार त्यांना त्यांच्या घरातील एक व्यक्ती वाटू लागतात. सहाजिकच मालिका सादर करणाऱ्या वाहिन्यांमध्ये यासाठी स्पर्धा सुरू असते. आपल्या वाहिनीवरील मालिकांना सर्वात जास्त टी. आर. पी. मिळावा यासाठी चढाओढ होते. ज्यातून काही नाविण्यपूर्ण मालिकांचा जन्म होतो. अशीच एक अशीच एक खुमासदार आणि भन्नाट प्रेमकहाणी लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. 'प्रेम पॉयजन पंगा' या नव्या मालिकेचा प्रोमो, झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. या मालिकेतून नेमकी कोणती नवीन मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

कधी सुरू होणार ‘प्रेम पॉयजन पंगा’

ऑक्टोबरमध्ये सुरु होणार असलेल्या या मालिकेची जोरदार चर्चा वाहिनीवर सुरू असलेल्या  निरनिराळ्या प्रोमोमुळे सुरु झालेली आहे. घरातील एसी बंद असल्याने, फ्रिजमध्ये बसून असलेली एक तरुण मुलगी या प्रोमोमध्ये पाहायला मिळते आहे. तिचं तिच्या बॉयफ्रेंड बद्दलच स्वगत ऐकून, या नव्या मालिकेविषयीचे औत्सुक्य लगेच वाढते आहे. निळ्या रंगात चमकणारे, त्या तरुणीचे डोळे पाहून, या मालिकेविषयी आणखी जाणून घेण्याची इच्छा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. म्हणूनच, पुढील प्रोमोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'चमकणाऱ्या निळ्या डोळ्यांचं कोडं, यापुढील प्रोमोमधून सुटणार का?', हा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडलेला आहे. शिवाय या मालिकेचं नावदेखील तितकंच गुढ आहे. प्रेम पॉयजन आणि पंगा या नावात अनेक प्रश्न दडले आहेत. या आधी झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी अथवा झी युवावरील लव्ह लग्न आणि लोचासारखी ही मालिका असेल असं या शीर्षकावरून सध्या तरी वाटत आहे. 

इतर मालिकांपेक्षा काय असेल वेगळं

प्रेम पॉयजन पंगा ही मालिका आजवरच्या इतर मराठी मालिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. या मालिकेची संकल्पना संपूर्णपणे नवीन आणि आकर्षक असल्याचं या प्रोमोमधून लक्षात येत आहे. अशा प्रकारची एक निराळी प्रेमकहाणी, पहिल्यांदाच मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रोमो पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असल्याने, ही नवीकोरी, जबरदस्त मालिका रसिकांसाठी पेश करण्याची आतुरता आता वाहिनीच्या टीमला सुद्धा वाटत आहे. लवकरच या मालिकेचा दुसरा प्रोमो सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. हा प्रोमो या मालिकेविषयीचे प्रेम आणि उत्सुकता आणखी वाढवणार आहे, यात शंकाच नाही. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा - 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

Good news: अॅमी जॅक्सनला झाला मुलगा, फोटो व्हायरल

अमिताभ बच्चन यांना यंदाचा दादासाबहेब फाळके पुरस्कार जाहीर

सातारचा सलमान चित्रपटाचं जबराट 'टायटल सॉंग'