ऊर्मिला कोठारेची बकेट लिस्ट विश झाली पूर्ण

ऊर्मिला कोठारेची बकेट लिस्ट विश झाली पूर्ण

प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काहीतरी इच्छा, आकांशा असतात. या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं. कधी कोणाला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं असतं तर एखाद्याला आयुष्यात एकदातरी भेटायचं असतं. इंग्रजीमध्ये याला बकेट लिस्ट असं म्हणतात. या बकेट लिस्टमध्ये शक्य आणि अशक्य अशा अनेक गोष्टी असू शकतात. बकेट लिस्टमधील इच्छा पूर्ण होण्यासारखा दुसरा आनंद नसतो. याच कथानकावर आधारित अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा पहिला मराठी चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नावदेखील बकेट लिस्ट असंच होतं. माधुरी दीक्षितला प्रत्यक्ष भेटणं ही अनेकांची बकेट लिस्ट असू शकते. अशीच बकेट लिस्ट विश अभिनेत्री ऊर्मिला कोठारे हिचीदेखील होती. नुकतीच ऊर्मिलाची ही बकेट लिस्ट विश पूर्ण झाली आहे. ऊर्मिलाने तिच्या इंन्स्टा अकांऊटवरून माधुरी दीक्षितसोबत असलेला फोटो आणि एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने, ऊर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे दिसत आहेत. या फोटोसोबत ऊर्मिलाने, “ माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली. माधुरी दीक्षितला भेटण्याचा मला योग आला. मला माझ्या शालेय जीवनापासून  माधुरीला जवळून पाहण्याची इच्छा होती. आता तिला भेटण्याची, शेकहॅंड करण्याची आणि थोडावेळ बोलण्याची मला संधी मिळाली. ‘15 ऑगस्ट’ या चित्रपटामुळे हे शक्य झाले.” असं शेअर केलं आहे.

‘15 ऑगस्ट’ मध्ये आदिनाथची महत्त्वाची भूमिका


धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा 15 ऑगस्ट हा चित्रपट 29 मार्चला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून याची निर्मिती माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ.श्रीराम नेने यांनी केलेली आहे. फायरब्रॅंडनंतर नेटफ्लिक्सचा दुसरा ओरिजनल चित्रपट आहे. चाळीतील जीवन आणि चाळीत साजरा होणारा स्वातंत्र्यदिन यात दाखविण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे, वैभव मांगले, राहुल पेठे आणि स्वप्नील जयकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ऊर्मिला कोठारेला धकधक गर्ल माधुरी दीक्षितला भेटण्याची संधी मिळाली.आदिनाथची लवकरच बॉलीवूडमध्येदेखील एन्ट्री


भारतीय क्रिकेट टीमने 25 जून 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या विषयावर आधारित ‘83’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्यावेळच्या क्रिकेट टीमचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग साकारत आहे. यासोबत भारतीय माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची भूमिका मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे साकारत आहे. आदिनाथ कोठारेचे अनेक चाहते आहेत. ऊर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे हे दोघंही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. ऊर्मिला आणि आदिनाथच्या चाहत्यांना आता ‘83’ चित्रपटाचे वेध लागले आहेत. ‘83’ चित्रपट 10 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. आदिनाथने या चित्रपटाच्या शूटिंगचे  फोटो शेअर करण्यास सुरूवात केली आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

With The God himself ... What an honour to meet and interact with the living legend #KapilDev ! @83thefilm #feelingblessed😇


A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on
हिंदीमध्ये शाहीदने साकारलेला अर्जुन रेड्डी AKA कबीर सिंह पाहिलात का


कसौटी जिंदगी की : प्रेरणाचं हृदय जिंकण्यासाठी आता नवी एंट्री


करण जोहरला करायचंय कंगना रणौतसोबत काम


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम