ADVERTISEMENT
home / Women's Safety
यीस्ट इन्फेक्शनशिवाय ‘या’ ५ कारणांनीही येऊ शकते व्हजायनामध्ये खाज

यीस्ट इन्फेक्शनशिवाय ‘या’ ५ कारणांनीही येऊ शकते व्हजायनामध्ये खाज

मुली असो वा महिला, बऱ्याचदा व्हजायनच्या बाह्य वा अंतर्गत भागामध्ये इचिंग अर्थात खाज येण्याच्या समस्येला प्रत्येकालाच सामोरं जावं लागतं. मात्र ही खाज अतिशय बेचैन करणारी असते. जोपर्यंत ही खाज थांबत नाही तोपर्यंत खूप त्रास होत राहतो. मुली याबाबत बोलण्यासही संकोचतात आणि सर्वांसमोर असं खाजवणं अतिशय वाईट दिसतं आणि खाज आल्यानंतर न खाजवता राहणंही अशक्य आहे. त्यामुळे हे यीस्ट इन्फेक्शन आहे? कसं झालं? हे कसं बरं होईल? असे प्रश्न मनात येणंही साहजिक आहे. मात्र महिलांनाही ही गोष्ट माहीत असायला हवी की, व्हजायनामध्ये येणारी खाज ही प्रत्येकवेळी यीस्ट इन्फेक्शनमुळेच असेल असे नाही. याची दुसरीही कारणं असतात. या खाजेची नक्की कारणं काय आहेत हे जाणून घेणंही योग्य आहे. व्हजायनामध्ये येणारी खाज ही रेझरच्या इरिटेशनप्रमाणे हार्मलेसही असू शकते. वास्तविक एसटीडी (सेक्युअली ट्रान्सिमिटेड डिसीझ) प्रमाणे ही गंभीरदेखील असून शकते. त्यामुळे त्यामागचं नक्की कारण काय आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

1. लाइफस्टाईल हेदेखील खाजेमागील मुख्य कारण
तुम्हाला जर व्हजायनच्या बाह्य भागामध्ये खाज येत असेल अथवा लालसर होत असेल तर ते एक प्रकाराने स्किन इन्फेक्शन असू शकते आणि त्याचं कारण म्हणजे रेझर किंवा घट्ट चड्डी अथवा तुम्हाला येत असलेला घाम हे असू शकतं. हे कोणतंही गंभीर इन्फेक्शन तर नाही ना हे समजून घ्यायचं असल्यास, तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. यापासून वाचण्यासाठी पाच वेळा वापर केल्यानंतर तुम्हाला रेझर बदली करण्याची गरज आहे. रात्री झोपताना घट्ट चड्डीऐवजी अतिशय ढगळ कपडे घालावेत आणि घामाने भिजलेले असल्यास, आंघोळ करून आपले कपडे बदलावेत. त्याशिवाय आपल्या व्हजायनाचा कोणताही भाग ओला न ठेवता सुका ठेवावा. तरीही खाज येत असल्यास, त्यावर व्हॅसलिन वा नारळ तेल रोज लावावं त्यामुळे नक्की आराम मिळेल. व्हजायनल हेअर स्वच्छ करण्याचे घरगुती उपाय आपल्याला माहीत असतात. त्यामुळे तुम्ही त्याकडेही लक्ष द्यावे. 

2. सेक्समुळे येणारी खाज
तुम्ही जर मागच्यावेळी सेक्स करताना कोणतंही नवं ल्युब्रिकंट वापरलं असेल तर हेदेखील खाज येण्याचं एक कारण असू शकतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बऱ्याचशी ल्युब्रिकंट्समध्ये असलेल्या अल्कोहोल अथवा लेटेक्स हे व्हजायनामध्ये होणाऱ्या अॅलर्जीचं कारण ठरतात. त्याशिवाय बऱ्याचदा तुम्ही ल्युब्रिकेशनशिवाय सेक्स करत असता तेव्हा सतत रगडलं गेल्यामुळं तुम्हाला इरिटेशन वा खाज येत राहते. यासाठी डॉक्टर आर्टिफिशियल ल्युब्रिकंट्सऐवजी नारळ तेलाचा वापर करण्याचा सल्ला देतात. मात्र जेव्हा तुम्ही कंडोम वापरत असाल, तेव्हा नारळाच्या तेलाचा वापर करू नका. कारण, नारळाच्या तेलामुळं कंडोम तुटण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही विनासुंगधाचा वॉटर बेस्ड कंडोम वापरावा.

खाज आल्यावर त्वचेवर काय होतो परिणाम आणि वाचण्यासाठी खास टीप्स

ADVERTISEMENT

3. मेनोपॉज दरम्यान येणारी खाज
अशीही वेळ येते जेव्हा तुमच्या अॅस्ट्रॉजनची पातळी अतिशय कमी होते अर्थात ती वेळ म्हणजे मेनोपॉज. तेव्हा तुमच्या व्हजायनाचा पीएच समतोलही बदलतो. अशावेळी व्हजायनाची भिंत ही पातळ आणि कोरडी होते. त्यामुळे खाज येते. याला व्हजायनल अट्रॉफी संबोधलं जातं. खाज, इरिटेशन आणि सेक्समध्ये दुखणं ही याची प्रमुख लक्षणं आहेत. याच्या उपायासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या औषधांनीच तुम्हाला आराम मिळेल.

4. साबणामुळे येणारी खाज
कदाचित तुम्हाला माहीत नसेल की, व्हजायना साफ करण्यासाठी साबणाचा वापर अजिबात करू नये. यामुळं व्हजायनाचा नैसर्गिक बॅक्टेरियल समतोल बिघडू शकतो किंवा बऱ्याचदा ड्रश (सफाईसाठी पाण्याच्या जेटचा वापर) मुळेदेखील व्हजायनमध्ये खाज येऊ शकते. यामध्ये डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोणताही सुगंध नसलेल्या उत्पादनांचाच वापर व्हयाजनच्या भागासाठी उपयोगात आणावा. या उत्पादनांमुळे व्हजायनामधील बॅक्टेरिया समतोल बिघडतो. त्याशिवाय व्हजायनाच्या आता सफाईची गरज नसते कारण व्हजायन स्वतःच स्वतःची सफाई करून घेत असते. व्हजायनाचा स्वतःचा एक सुगंध असतो, त्याऐवजी कोणताही दुसरा वास येत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

युरिन इन्फेक्शन घरगुती उपाय

5. बॅक्टेरियल व्हजिनोसिसमुळे खाज
बक्टेरियल व्हजिनोसिस व्हजायना हे खूपच कॉमन इन्फेक्शन आहे आणि बॅक्टेरियाच्या इन्फ्लेमेशनमुळे होतं. कोणत्याही वयाच्या महिलेला हे होतं मात्र, रिप्रॉडक्टिव्ह एज अर्थात २५ ते ३५ वर्षाच्या महिलांमध्ये हे जास्त आढळून येतं. अशावेळी डूश वा प्रोटेक्शनशिवाय करण्यात आलेला सेक्स ही खाज वाढवतं. यामध्ये खाजेबरोबरच करड्या रंगाचा डिस्चार्जदेखील येतो. याला माशाप्रमाणे घाण येत असते. तुम्हाला जर अशी लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे. बक्टेरियल व्हजिनोसिसचे इन्फेक्शन हे अँटिबायोटिक वा प्रोबायोटिक औषधांनी बरं होतं.

ADVERTISEMENT

6. यीस्ट इन्फेक्शनच असेल तर…?
तुम्हाला पहिल्यांदाच इस्ट इन्फेक्शन असल्याचं वाटत असेल तशी लक्षणं दिसत असल्यास, लगेच आपल्या डॉक्टरांना भेटावं. कोणतंही भयानक इन्फेक्शन होण्याआधी हे करावं. यीस्ट इन्फेक्शन आहे हे कळल्यानंतर डॉक्टर्स तुम्हाला औषधं लिहून देतात. यीस्ट इन्फेक्शनच्या लक्षणांमध्ये व्हजायनामध्ये जळजळ आणि खाज (सेक्स आणि लघ्वी करताना), व्हजायनामध्ये रॅश आणि विनावासाचा पनीरप्रमाणे डिस्चार्ज अथवा पाणी येणं समाविष्ट आहे.

सूचना – व्हजायनामध्ये कोणत्याही प्रकारची खाज येत असल्यास, सर्वात पहिल्यांदा डॉक्टरांना भेटून इन्फेक्शनबद्दल जाणून घ्यावं. जेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला खाज येण्याचं कारण सांगतील तेव्हाच त्यांच्या सल्ल्यानुसार, आपला घरगुती उपाय करावा.

You Might Like This:

जाणून घ्या व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनची कारणं आणि घरगुती उपचार

ADVERTISEMENT

White Discharge Meaning in Hindi

26 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT