अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय (How To Get Rid Of Itching In Marathi)

 अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय

बऱ्याचदा आपल्या अंगाला खाज येत असते. पण त्याची नक्की कारणं काय असतात याची आपल्याला कल्पना नसते. बऱ्याचदा आपल्या अंगाला येणारी खाज ही अलर्जीमुळे अथवा त्वचेवर आलेल्या रॅशेसमुळे उद्भवते. तर काही लोकांना डर्माटायटिस अर्थात त्वचारोगामुळेही उद्भवते. पण खाज येत आहे म्हणून अगदी घरगुती उपाय करून दुर्लक्ष करण्यात अर्थ नाही. ही समस्या संपूर्ण शरीराला अथवा शरीराच्या विशिष्ट भागालाही असू शकते. बऱ्याच जणांना धुळीची अलर्जी असते. त्यामुळेदेखील सर्व अंगाला खाज येण्याची समस्या असू शकते. पण जर खाज तुम्हाला वारंवार येत असेल तर तुम्हाला मूत्रपिंड अथवा यकृताचं दुखणं असण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कधीही याकडे दुर्लक्ष करू नका. सूक्ष्म विषाणू मायक्रोबमुळे खाज येते असं अलोपथीमध्ये सांगण्यात आलं आहे. अनेकदा खाज आल्यानंतर आपण हळूहळू त्वचा खाजवायला लागतो. पण मग इचिंग सुरु झाल्यानंतर अगदी आपली त्वचा ओरबाडण्यापर्यंत मजल जाते आणि त्यामुळे त्वचेला आपण हानी पोहचवत असतो. खाज हा खरं तर आजार नाही. पण तरीही आपल्याला झालेल्या अन्य आजारांमुळे त्वचा कोरडी पडून खाजेची समस्या उद्भवते.


Table of content


1. खाज म्हणजे नेमकं काय? (What Is Itching In Marathi)


2. खाज आल्यावर त्वचेवर काय होतो परिणाम (Causes Of Itching In Marathi)


3. अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय (Home Remedies For Itching In Marathi)


4. कसे बनवावे चर्मरोगनाशक तेल? (How To Make Oil For Skin Diseases)


itching 1


खाज म्हणजे नेमकं काय? (What Is Itching In Marathi)


वेळेवर आंघोळ न करणे, त्वचेवर धूळ - माती जमणं अशा कारणांमुळे खाज येत असते. पण नेमकं खाज म्हणजे काय? तर वैद्यकीय भाषेत खाजेला प्रूरिटस असं म्हटलं जातं. सूक्ष्म विषाणांमुळे ही समस्या उद्भवते. रक्तसंक्रमणामुळे फोड आणि पुरळ येतात आणि त्यानंतर शरीरावर खाज येऊ लागते. खाजेचे खरं तर चार प्रकार असतात. याची साधारणतः प्रत्येक माणसाला कल्पना नसते. काही वेळा खाज आली तर पुरळ येतंच असं नाही. शिवाय खाज संपूर्ण त्वचेवर अर्थात पाय, चेहरा, बोटं, नाक, हात अथवा आपल्या गुप्तांगामध्ये येत असते. खाज ओली अथवा कोरडी असते. त्यामुळे जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला खाजेचा त्रास जास्त प्रमाणात असल्याची शक्यता असते. काही व्यक्तींना तापमानात उष्णतेची वाढ झाल्यास खाज यायला सुरुवात होते. उन्हाळ्यामध्ये अधिक तापमान असल्यामुळे प्रचंड घाम येत असतो. काही लोकांना तर अधिक घाम येण्याचा त्रासही असतो. त्यामुळे घाम तसाच घेऊन आपण पंखा, कुलर अथवा एसीमध्ये बसतो आणि घाम अंगावरच वाळतो. त्यामुळे घामाने अंगावर घामुळं येऊन तुम्हाला खाज येते तर थंडीमध्ये त्वचा कोरडी होऊन खाज येते.


खाज आल्यावर त्वचेवर काय होतो परिणाम (Causes Of Itching In Marathi)


बऱ्याचदा काही आजारांमुळे अंगावर खाज येत असते. बऱ्याच जणांना खाज का येते याची कारणं माहीत असतात पण त्याचा परिणाम काय होतो याची कल्पना नसते. डर्माटायटिसमध्ये त्वजेला सूज येऊन खाज येत असते. तर सोरियासिसमध्ये रोगप्रतिकारशक्ती झाल्यामुळे त्वचेचा दाह होऊन त्वचा लाल होते आणि खाज येते. याशिवाय तुम्हाला कांजिण्या, खसरा या आजारांमध्येही अंगावर खाज येत असते. शिवाय जर तुमच्या केसांमध्ये उवा झाल्या असतील तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो आणि खाज येऊन तुम्हाला अंगावर अगदी दादीदेखील उठतात. त्यामुळे जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. गुप्तांगामध्ये खाज येण्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे तुम्ही लघ्वीला गेल्यानंतर जर तुमची व्हजायन साफ केली नाहीत तर जीवाणूंचे संक्रमण होऊन खाज येते. खाजेमुळे संपूर्ण शरीरावर पुरळ उठते. शिवाय तुम्हाला ज्या ठिकाणी घाम येतो तिथे तुम्हाला जास्त खाज येते. शरीरावरील कंबर, छाती, खाक, मांडया आणि बेंबीच्या आसपास खाजेची समस्या जास्त निर्माण होते.


Causes Of Itching In Marathi


अंगावर खाज येणे उपाय (Home Remedies For Itching In Marathi)


- त्वचा मुलायम आणि आर्द्र राखण्यासाठी मॉईस्चराईझरचा वापर केल्यास, खाजेपासून सुटका होते
- अँटी इचिंग आणि ओटीसी क्रीमचा वापर खाजेसाठी करावा. शिवाय घरच्या घरी उपाय म्हणजे तुम्ही खाजेची समस्या कमी करण्यासाठी खाण्याच्या सोड्याचाही वापर करू शकता
- सर्वात सोपा उपाय म्हणजे कडिलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळवून तुम्ही त्या पाण्याने आंघोळ केल्यास, अंगावरील खाज कमी होते. बहुतांशी वेळा निघून जाते. अंगावर पुरळ आल्यास, हा चांगला पर्याय आहे
- कापूरचे अनेक फायदे आहेत. जसं खोबरेल तेलामध्ये कापूर मिसळून तुम्ही हे तेल अंगाला लावून मालिश केल्यास, नक्कीच चांगला फरक पडतो
- तुम्हाला जर अंगावर खाजेचा त्रास असेल तर तुम्ही सकाळ - संध्याकाळ टॉमेटोच्या रसाचे सेवन केल्यास, तुमची खाज नक्की कमी होईल
- तुमच्या रोजच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचा समावेश करून घ्यावा
- खाज येत असल्यास, तुम्ही साबण, परफ्यूम अशा गोष्टींपासून दूर राहणंच योग्य आहे
- चर्मरोगनाशक तेलाचा वापर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता. शिवाय हिवाळ्यामध्ये तुम्हाला खाजेची समस्या असल्यास, आंघोळ करण्यापूर्वी तिळाच्या तेलाने मालिश करा
- अशुद्ध रक्तामुळे खाज येत असल्यास, मीठ पूर्ण बंद करा. तसंच आंबट पदार्थ अर्थात लोणचं, लिंबू, टॉमेटो हे वर्ज्य करा. चहादेखील पिऊ नये
- रात्री तांब्याच्या भांड्यात थोडं दही ठेवावं. ते सकाळी निळसर दिसू लागेल. नंतर ते दही फेटून खाज येत असलेल्या ठिकाणी लावल्यास खाज नाहीशी होते
- दोन चमचे तुळशीचा रस आणि दोन चमचे लिंबाचा रस एकत्र करून कापसाने खाजेच्या ठिकाणी लावल्यासही खाज बरी होते


कसे बनवावे चर्मरोगनाशक तेल? (How To Make Oil For Skin Diseases In Marathi)


हे खाजेवर अतिशय उपयुक्त तेल आहे आणि हे तेल तुम्ही घरच्याघरी बनवू शकता. हे खाजेवर अतिशय फायदेशीर आहे. या तेलाने झोपण्यापूर्वी आणि आंघोळीपूर्वी मालिश केल्यास, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.यासाठी तुम्ही कडुलिंबाची साल, रक्तचंदन, हळद, हिरडा, बेहडा, आवळा आणि अडुळशाची पानं समप्रमाणामध्ये घेऊन साधारतः पाण्यामध्ये पाच ते सहा तास भिजवून ठेवा. त्यानंतर मिक्सरमधून हे मिश्रण वाटून घ्या. यामध्ये असलेल्या मिश्रणाच्या चार पट तिळाचं तेल घाला. हे मिश्रण मंद आचेवर बराच वेळ उकळून घ्या. पाण्याची वाफ जाऊन त्यामध्ये केवळ तेलाचा अंश उरायला हवा. हे तेल बाटलीत भरून ठेवावं. ज्या भागामध्ये अंगाला खाज सुटणे उपाय येत असेल तिथे हे तेल लावावं. याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसून येतो.


फोटो सौजन्य - Instagram