ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
दर आठवड्यात का घ्यावी चेहऱ्यावर वाफ, काय आहेत फायदे

दर आठवड्यात का घ्यावी चेहऱ्यावर वाफ, काय आहेत फायदे

चेहऱ्यावर वाफ घेण्याचे अनेक फायदे होतात. अनादी काळापासून चेहऱ्यावर वाफ घेतली जाते. अनेक आजारांवरही वाफ हा पर्याय वापरला जातो. दर आठवड्यामध्ये तुम्ही चेहऱ्यावर वाफ घेण्याचा फायदा मिळतो. फेशियल स्टीम (Facial steam) अर्थात चेहऱ्यावर वाफ घेण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये साधारणतः इसेन्शियल ऑईल्स, हर्ब्स अथवा मीठ मिक्स करून वाफ घेण्यात येते. नक्की आठवड्यातून एकदा वाफ का घ्यावी आणि त्याचे नक्की काय फायदे आहेत हे आम्ही तुम्हाला लेखातून सांगणार आहोत. सध्या कोरोना काळात (Coronavirus) तुम्ही याचा उपयोग नक्कीच केला असेल. याचे नक्की काय फायदे होतात पाहूया. 

एक्सफोलिएशन

तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरून डेड स्किन काढून टाकायची असेल आणि तुम्हाला चेहऱ्याला कोणत्याही उत्पादनचा वापर करून एक्सफोलिएशन करायचे नसल्यास, तुम्ही आठवड्यातून एकदा वाफ घ्या. वाफ घेतल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत मिळते. तसंच ही वाफ घेताना तुम्ही पाण्यात इसेन्शियल ऑईल (essential oil) उदा. कॅमोमाईल तेल, क्लॅरी सेज, रोझ ऑईल अथवा लव्हेंडर ऑईल मिक्स केले तर याचा अधिक उपयोग होतो. तुमचा चेहरा अधिक चमकदार होण्यास मदत मिळते. तसंच तुम्हाला सर्दी अथवा घसादुखी असा त्रास असेल तर तुम्हाला त्यातूनही सुटका मिळते. 

त्वचेमध्ये उत्पादन व्यवस्थित शोषून घेतले जाते

त्वचेमध्ये उत्पादन व्यवस्थित शोषून घेतले जाते

freepik

ADVERTISEMENT

चेहऱ्यावर वाफ घेणे, माईल्ड एक्सफोलिएशनशिवाय त्वचेवरील वरचा स्तर हायड्रेट करण्यासाठी आणि मऊ करण्यसााठीही वाफेचा फायदा होतो. तुम्ही त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार दिसण्यासाठी जी उत्पादने वापरता ती तुमच्या त्वचेमध्ये व्यवस्थित शोषून घेतली जातील यासाठी वाफेचा उपयोग होतो. वाफ घेतल्यामुळे चेहऱ्यावरील पोर्स उघडले जातात. त्यामुळे त्वचेसाठी वापरण्यात येणारे उत्पादन अगदी आतपर्यंत पोहचून त्याचा योग्य परिणाम होतो. 

आतमधून ऑक्सिजिनेट करते

वाफ घेतल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला जी उष्णता मिळते त्यामुळे त्वचेच्या आतील ब्लड वेसल्स अर्थात नसा पसरतात आणि त्यामुळे ताजा ऑक्सिजन मिळतो. यामुळेच वाफ घेतल्यानंतर तुमचा चेहरा अधिक तजेलदार आणि चमकदार दिसतो. या पसरलेल्या नसा तुमच्या त्वचेला पोषण देतात आणि त्वचा अगदी आतपासून ताजी होते आणि त्याचा योग्य परिणाम बाहेर चेहऱ्यावर दिसतो. 

ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास मदत

ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास मदत

Shutterstock

ADVERTISEMENT

तुम्ही घरी स्वतःच ब्लॅकहेड्स कसेतरी काढा असा सल्ला कोणीच देणार नाही. पण तुम्ही वाफेची मदत घेऊन ब्लॅकहेड्स काढू शकता. गरम वाफ घेतल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पोअर्स उघडतात. तसंच हेअर फॉलिकल्समुळे क्लॉग्ड सीबम बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते. यामुळे ब्लॅकहेड्स काढून टाकणे सहज सोपे होते. यासाठी तुम्ही एखादे फेशियल स्क्रबदेखील वापरू शकता. यामुळे चेहऱ्यावरील दिसणारे काळे डागही निघून जातात. इन्फेक्शनमुक्त त्वचा मिळविण्यासाठी वाफ ठरते उपयुक्त

त्वचेला विषारी पदार्थांपासून देतात सुटका

चेहऱ्यावर वाफ घेण्याचा तोच परिणाम होतो जो तुमच्या चेहऱ्यावर घामामुळे होत असतो. घाम आल्यावर तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स अर्थात विषारी पदार्थ बाहेर निघून जाण्यास मदत मिळते. वाफ घेतल्यानेही त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर निघून जाण्यास मदत मिळते. पण वाफ घेतल्यानंतर तुम्ही त्वचा खसाखस चोळू नका. वाफ घेतल्यानंतर त्वचा व्यवस्थित स्वच्छ करण्यास, स्क्रब करणे आणि पाण्याने स्वच्छ धुण्यास विसरू नका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

20 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT