निस्तेज आणि कुरळ्या केसांसाठी आर्गन ऑईल हे एक अमृतच आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या त्वचेसाठीही याचा खूपच चांगला उपयोग करून घेता येतो. अनेक सौंदर्य उत्पादन घटकामध्ये आर्गन ऑईल (Argan Oil) चा उपयोग करण्यात येतो. बाजारामध्ये अनेक प्रकारचे फेशियल ऑईल (Facial Oil) उपलब्ध आहेत त्यापैकी ऑलिव्ह ऑईल, अव्हाकॅडो ऑईल आणि जोजोबा ऑईल याची नावंही तुम्हाला माहीत असतील. यापैकी काही तेलकट त्वचेसाठी उपयुक्त ठरतात तर काही तेल हे कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. पण आर्गन ऑईल हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. कारण हे तेल अत्यंत जडही नसते आणि अत्यंत हलकेही नसते. विटामिन ई आणि फॅटी अॅसिडने युक्त असणारे हे तेल त्वचेसाठी उपयुक्त ठरते. याचा नक्की कसा फायदा होतो ते जाणून घेऊया.
सूर्याच्या किरणांपासून वाचवते (tanning)
Freepik
उन्हाळ्याच्या दिवसात अधिकांश महिलांना सनटॅन आणि सूर्याच्या किरणांमुळे त्वचेची हानी होण्याचा त्रास होतो. आर्गन ऑईलमधील अँटिऑक्सिडंट्समुळे तुमची त्वचा टॅन होण्यापासून वाचवता येते. तसंच तुमच्या त्वचेला रिपेअर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामध्ये असणारे घटक सूर्याच्या किरणांपासून होणाऱ्या टॅनिंग आणि अन्य त्वचेच्या समस्यांना कमी करते आणि प्रभावित त्वचेवर याचा चांगला परिणाम दिसून येतो.
स्किन एजिंगपासून वाचवते (skin aging)
Shutterstock
आर्गन ऑईलमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि विटामिन ई चे प्रमाण जास्त असते. हे तुम्हाला स्किन एजिंग अर्थात वयाच्या आधी त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यांच्या समस्यांपासून दूर राखण्यास मदत करते. तसंच चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आणि फाईन लाईन्सच्या समस्यांपासूनही सुटका मिळवून देण्यास या तेलाचा उपयोग होतो. तुमच्या त्वचेला अधिक कोमल बनविण्याचे काम आणि स्किन इलास्टिसिटी दुरुस्त करण्याचे काम आर्गन ऑईल चांगल्या पद्धतीने करते. याचा चेहऱ्यावर तुम्ही नियमित स्वरूपात वापर केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत मिळते.
उत्तम मॉईस्चराईजर (use it as moisturizer)
Shutterstock
हो हे खरं आहे. आर्गन ऑईल तुमच्या त्वचेसाठी उत्तम मॉईस्चराईजर आहे. हे अत्यंत हलके असते त्यामुळे त्वचेवर याचा वापर करता येतो. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि अधिक काळापर्यंत त्वचा मॉईस्चराईज्ड राहते. विटामिन ई आणि फॅटी अॅसिड असल्यामुळे त्वचेला नैसर्गिक बूस्ट मिळण्यास मदत मिळते. कोरड्या त्वचेवर हे अत्यंत चांगले काम करते आणि त्वचा तेलकट होऊ देत नाही.
स्ट्रेचमार्क्स घालवते (to remove Stretch Marks)
गरोदरपणात अनेक महिलांना स्ट्रेचमार्क्स येतात. आर्गन ऑईल हे शरीरावर स्ट्रेचमार्क्स कमी करण्यास उपयुक्त ठरते. हे त्वचेची इलास्टिसिटी चांगली ठेवण्यास मदत करते. यामध्ये असलेले विटामिन ई आणि ए त्वचा चमकदार आणि चांगली राखण्यास मदत करते. त्वचेवर डेड स्किन येऊ देत नाही. तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा स्ट्रेचमार्क्सवर हे तेल लावावे. तुम्हाला लवकरच याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील.
त्वचेच्या इन्फेक्शनवर परिणामकारक (use for skin infection)
त्वचेवर येणारा लालपणा, रॅशेस, खाजेमुळे येणारे पॅच हे सर्व उन्हाळा आणि पावसाळ्यात अत्यंत कॉमन आहे. बऱ्याचदा त्वचेच्या कोरडेपणामुळे असं होतं. त्यावेळी आर्गन ऑईलचा वापर करणे अत्यंत उत्तम ठरते. यामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात. जे त्वचेला होणारी जळजळ, खाज, रॅशेस इत्यादीपासून सुटका मिळवून देते. यामध्ये असणारे पोषक तत्व हे त्वचेला पोषण पोहचवते आणि कोरडेपणामुळे येणाऱ्या समस्या दूर करण्यास मदत करते.
त्वचेला हील करण्यास फायदेशीर (To heal skin)
freepik
आर्गन ऑईल त्वचेला बाहेरून हिलिंग आणि सिलिंग मिळवून देते. हे केवळ स्किन टोन सुधारण्यासाठी मदत करत नाही तर ज्यांची त्वचा अधिक तेलकट आहे त्यांच्यासाठी आर्गन ऑईल हे एक वरदान आहे. हे सीबम तयार होण्यापासून रोखते. त्यासाठी तुम्ही आर्गन ऑईल असणारे क्रिम वापरावे. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला याचा फायदा मिळतो. तसंच तुम्हाला अॅक्नेची समस्या असेल तर तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता.
सूचना – तुम्ही आर्गन ऑईलचा पहिल्यांदाच उपयोग करणार असाल तर तुम्ही डायरेक्ट उपयोग न करता, पॅच टेस्ट करून घ्या. तुम्हाला त्वचेशी संबधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही याचा उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक