नथ हा असा दागिना आहे जो महिलांच्या सौंदर्यात अधिक भर घालतो. प्रत्येक स्त्रीकडे कोणताही दागिना नसला तरी देखील नख हा दागिना असावाच लागतो. काहीही म्हणा नथीचा नखरा हा वेगळाच असतो. हल्ली नथीचे इतके प्रकार आले आहेत की, त्या सगळ्या नथी या सुंदर आणि आकर्षक दिसतात. हल्ली नखीचा आकार आणि त्यांचे प्रकार इतके आकर्षक आहेत की, तुम्ही हा नथीचा प्रकार जर पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्कीच पाहायला हवा आणि वापरुनही पाहायला हव्यात.
सोयराबाई नथ
सोयराबाई नथ हा सध्याचा चांगलाच प्रचलित असा प्रकार आहे. सोयराबाई नथ ही थोडी मोठी नथ आहे. त्याचे मोती हे मोठे असतात. नथीचा वरचा आकार हा रोजच्या ट्रेडिशनला आकारातीलच आहे. पण त्याचा आकार एवढा मोठा आहे की त्यामुळे ही नथ चांगली ठसठशीत दिसते. या नथीच्या खालच्या बाजूला हिरवे, लाल मणी नसतात तर त्या जागी भरपूर लहान लहान मोत्यांची गुंफण केलेली असते. त्यामुळे नाकाकडे एक छान गुच्छा येतो. नऊवारीवर मोठी नथ घालायची असेल तर तुम्ही ही मस्त सोयराबाई नथ घालू शकता. ही नथ हल्ली अनेक ठिकाणी बनवून देखील दिली जाते.
मंजिरी नथ
अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिच्या नावाने एक नथ चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. मंजिरी नथ ही खूप वेगळी नथ आहे बरं का! ही नथ गोलाकार आकाराची असून ती छान ओठांवर येईल इतकी मोठी आहे. पूर्वीच्या काळी महिला जशा नथ घालत होत्या अगदी तशाच मोठ्या प्रकारातील ही नथ आहेत. यामध्ये मोत्याची आणि रंगीत मण्यांची जी गुंफण केली आहे त्यामुळे ही नथ खूपच जास्त सुंदर दिसते. ही नथ तुम्हाला साडी आणि ड्रेस कशावरही स्टाईल करता येते
शकुंतला नथ
नथीमधला चांगलाच ट्रेंडमध्ये असलेला आणखी एक प्रकार म्हणजे शकुंतला नथ. शकुंतला नथ ही दिसायला ही साधारण ट्रेडिशनल नथीसारखी असते. याचा आकार हा गोल असतो. शकुंतला नथ ही गोलाकार असल्यामुळे ती दिसायला चांगली दिसते. तिचा बाक चांगला दिसतो. तुम्हाला ट्रेडिशनल किंवा तुमच्या कोणत्याही पैठणीच्या अटायरवर ही नथ चांगली दिसते. त्यामुळे तुम्हाला ही नथ मिळाली तर तुम्ही ही नथ नक्की ट्राय करायला हवी.
मोर नथ
मोर नथ हा प्रकार देखील खूप जणांच्या आवडीचा प्रकार आहे. मोर नथ ही दिसायला खूपच सुंदर असते. मोर नथीमध्ये सोन्याचा भाग हा जरा जास्त असतो. या नथीमध्ये खडे आणि मोती अशा दोघांची गुंफण केलेली असते. त्यामुळे ही नथ नेहमीच चांगली आणि वेगळी दिसते. या नथीच्या वरच्या भागामध्ये मोती असतात. नथीच्या खालच्या बाजूला स्टोन्स किंवा रंगाचे मणी असतात. त्यामुळे तुम्ही ही नथ देखील ट्राय करु शकता.
आता नथीचे हे प्रकार तुम्ही नक्की ट्राय करायला हरकत नाही.