ADVERTISEMENT
home / Festive
paithani saree history in marathi

महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी | History Of Paithani Saree In Marathi

पदरावरती जरतारीचा नाचरा मोर सगळ्यांनाच आवडतो. तुम्हाला कळलं असेलच की, आम्ही कशाबद्दल सांगत आहोत. समस्त महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पैठणीबाबत. आपल्या प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये एक तरी पैठणी नक्कीच असते. लग्नसराई असो वा एखादं फॅमिली फंक्शन असो पैठणीला पर्याय नाही. कारण पैठणीची सर इतर कोणत्याही साडीच्या प्रकाराला नाही. हे तुम्ही नक्कीच मान्य कराल. त्यामुळे आपल्या प्रत्येकीकडे एकतरी पैठणी असतेच. आजकाल बऱ्याचश्या नववधू लग्नविधी किंवा अगदी रिसेप्शनलाही पारंपारिक किंवा डिझायनर पैठणीला पसंती देत असल्याचं चित्र आहे.  

paithani saree history in marathi

महाराष्ट्रातील भरजरी पारंपारिक वस्त्र असलेल्या पैठणीची गणती ही शाही साड्यांच्या प्रकारात होते. कारण साड्यांची महाराणी असलेल्या पैठणी वस्त्राला अनेक राजघराण्यांनी आणि भारतातील हुकूमशहांनी आपली पसंती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून पैठणी ओळखली जाते. याच कारणामुळे प्रत्येक मराठी स्त्रीच्या साड्यांच्या खजिन्यात पैठणी साडी असतेच असते. चला तर मग आपल्या सर्वांनाच भुरळ पाडणाऱ्या या महावस्त्रांबाबत अजून जाणून घेऊया.

महावस्त्र पैठणीचा इतिहास – History Of Marathi Paithani Saree

पैठणीचा इतिहासाला 2000 वर्षांची परंपरा आहे. सातवाहन राजवंशाच्या काळात पैठणीच्या निर्मितीला सुरूवात झाली. या पारंपारिक भरजरी सिल्क साडीचा शोध लागला तो गोदावरीच्या तीरावरील औरंगाबादमधल्या पैठण शहरात. त्यावरूनच या महावस्त्राला पैठणी असं नाव मिळालं.

Paithani Saree History In Marathi
marathi paithani saree

पूर्णतः हातमागावर विणलेल्या पैठणीवर प्राचीन शैलीचं नक्षीकाम केलं जात असे. असं म्हणतात की, त्याकाळी पैठणी फक्त मोरपंखी रंगात मिळत असते. जिच्या पदरावर सोन्याच्या धाग्यांचं विणकाम केलं जात असे. एवढंच नाहीतर प्रत्येक पैठणी साडी विणायला तब्बल 18 ते 24 महीने एवढा काळ लागत असे. या साडीची किर्ती त्याकाळातही दूरवर पोचली होती. राजघराण्यातील प्रत्येक लग्न समारंभात सर्व महिला याच साड्यांना पसंती देत असत.

ADVERTISEMENT

नऊवारी साडी कशी नेसावी वाचा खास टिप्स

paithani-7

भारत सरकारच्या कापड मंत्रालयानुसार, सातवाहन वंशाचे राजा हे पहिले शासक होते ज्यांनी या साड्या विदेशात विकून लाभ घेण्याचा विचार केला. यासाठी या राजांनी आपल्या दूतांना पाश्चिमात्य देशातील लोकांच्या आवडनिवडी जाणून घेण्यासाठी पाठवले होते. मुघल काळातही औरंगजेबाने या वस्त्रउद्योगाला राजाश्रय दिला. पण मुघल शासनाच्या पतनानंतर पैठणी साडीच्या कलेले पुन्हा एकदा संरक्षण दिलं ते पेशवांनी. पेशव्यांनी पैठणी साडीच्या कारागिरांना शिर्डी जवळच्या शहरात स्थायिक होण्यास जागा दिली. ते शहर म्हणजेच आत्ताच येवला शहर. मग पुन्हा एकदा या भरजरी वस्त्राला पुनर्जन्म मिळाला. एका आख्यायिकेनुसार, पेशवाईच्या काळात एका सावकाराने पेशव्यांच्या स्वागतासाठी पैठणीच्या पायघड्या घातल्या होत्या. अगदी निजाम राजाच्या मुलीलाही पैठणीच्या विणकाम कलेमध्ये रस होता. निजामाची मुलगी विणकरांना स्वतः पैठणी साडीवरील नक्षीकाम सांगत असे.

सुंदर मंगळसूत्र डिझाईन्स

विणकामाची पद्धत (Method Of Weaving)

आजकाल जी पैठणी मिळते ती बऱ्याचदा मशीन मेड असते. पण खरी पैठणी मात्र पूर्णतः ताग्यावर विणली जात असे. एकेकाळी पैठणीसाठी चीनहून सिल्कचे धागे येत असत. तसंच पैठणीच्या पदरावरील जरीकामात खऱ्या सोन्याचे आणि चांदीचे धागे वापरून विणकाम केले जात असते. आज मात्र या साडीसाठी बंगळूरचे मलबेरी सिल्क किंवा सुरतहून आलेली जर विणकामसाठी वापरली जाते. एक सहावारी पैठणी विणण्यासाठी तब्बल 500 ग्रॅम सिल्क धागे आणि 250 ग्रॅम जर लागते तर नऊवारी विणण्यासाठी जास्त कच्चा माल लागतो.

ADVERTISEMENT
paithani-4

खऱ्या पैठणीसाठी सर्वात आधी रॉ सिल्कचे धागे हे डाय केले जातात. नंतर त्यांची रिळ करून ते ताग्यावर जुळवले जातात. हे धागे ताग्यावर जुळवण्यालाच तब्बल एक दिवस लागतो. पण फारच महत्त्वाचं काम आहे. कारण या धाग्यांच्या जुळवळवणीतूनच पैठणीचं सुंदर नक्षीकाम घडणारं असतं. ताग्यावरच्या एका पैठणीला बनण्यासाठी तब्बल एक महिना ते वर्ष एवढा काळ लागतो.  

तसेच साडी परिधान करणारे टिप्स वाचा

पैठणी साडीची वैशिष्ट्यं – Features Of Real Marathi Paithani Saree

Features Of Paithani Saree

पैठणी साडी सहावारी आणि नऊवारी अशा दोन्ही प्रकारात मिळते. खरी पैठणीचं वैशिष्ट्य म्हणजे ती दोन्ही बाजूंनी अगदी सारखी दिसते. हो अगदी बॉर्डर आणि पदरही. खऱ्या ताग्यावर विणलेल्या पैठणीची हीच ओळख आहे. तसंच खऱ्या पैठणीची जर कधीही काळी पडत नाही.

रंग (Colour)

Colour

पारंपारिक पैठणी साडी ही डाय केलेल्या धाग्यांनी विणली जात असे त्यामुळे यामध्ये तुम्हाला काही ठराविकच रंग आढळतील. जसं लाल, पिवळा, निळा, मजंटा, हिरवा, गुलाबी आणि जांभळा. या साडीवर मुख्यतः दोन रंगांचं कॉम्बिनेशन असतं एक म्हणजे साडीवरचा रंग आणि दुसरा पदर आणि बॉर्डरवरचा रंग. पण आता पैठणीमध्ये अनेक रंग मिळतात.  

ADVERTISEMENT

नक्षीकाम (Carving)

Carving

साधारणतः पैठणीच्या संपूर्ण साडीवर बुट्टी असते आणि मुख्य असतो तो पदर आणि बॉर्डर. पैठणीवरील प्रसिद्ध नक्षीकामात मोर, बांगडी मोर (चार मोर आणि कमळ), मुनिया म्हणजेच पोपट मैना असलेली, अजंता कमळ, आसवली (फुलं पानांची), कुयरी (आंबाच्या आकार) आणि अक्रोटी (बदामाचा आकार) असतो. तसंच तुम्हाला या नक्षीकामात संगीत वाद्य जसं तबला, शहनाई, संबळ आणि तानपुराही आढळेल. काहीवेळा तुम्हाला कस्टमाईज्ड डिझाईनची पैठणीही करून मिळते. पण मुख्यतः पारंपारिक नक्षीकामाच्या पैठणीलाच जास्त पसंती असते.

जुन्या साड्यांपासून सुंदर डिझाईनर ड्रेसेस

पैठणीतील विविधता (Diversification Of Paithani Saree)

Diversification Of Paithani Saree

मूळ पैठणीमध्ये एकपदरी (सिंगल पल्लू), दुपदरी (डबल पल्लू), टिश्यू, ब्रोकेड असे प्रकार आढळतात. एकेकाळी पैठणीसाठी कॉटनचा वापर केला जात असे. आजही कॉटन पैठणी उपलब्ध आहेत मात्र आता जास्तकरून सिल्कचा वापर केला जातो. हँडलूम सिल्क पैठणी आता दोन प्रकारात आढळते ती म्हणजे पारंपारिक पैठणी आणि ब्रोकेड पैठणी. पारंपारिक पैठणीवर फक्त पदरावरच नक्षीकाम असते तर ब्रोकेड पैठणीवर संपूर्ण साडीवर नक्षीकाम केलेले आढळते. आजकाल मॉर्डन पैठणीही बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसंच कमी किंमत असल्यामुळे सेमी पैठण्यांनाही भरपूर मागणी आहे. पैठणी साडीतील पेशवाई, गंधर्व ही नावं अलीकडे प्रचारात आली असून हे प्रकार पारंपरिक पैठणीत मोडत नाहीत. तर कडीयाल पैठणी हा प्रकार कर्नाटकातील मराठी पैठणीचा अवतार आहे. तसंच आजकाल जास्तकरून धूपछाव रंगांच्या पैठणीला आणि मॉर्डन डिझाईन बॉर्डर पैठण्यांना जास्त मागणी असल्याचं चित्र आहे.

खरी पैठणी कशी ओळखावी – How To Check Real Marathi Paithani Saree

Paithani Saree che prakar

खऱ्या रेशीम धाग्यांपासून आणि जरीपासून बनवलेली पैठणीही वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी अगदी हूबेहूब दिसते. त्यामुळे जर तुम्हाला दुसऱ्या बाजूला धागे निघालेले दिसल्यास ती पैठणी खरी नाही हे तुम्हाला लगेच कळेल. पैठणीवरच्या पारंपारिक नक्षीकामात मोर, कमळ, फुल आणि बुट्टी यांचा समावेश होतो. पैठणीमध्ये फक्त लाल, पिवळा, निळा, जांभळा, गुलाबी, हिरवा आणि मजंटा हेच रंग आढळतात.

ADVERTISEMENT

’61’ सुंदर आणि स्टाईलिश ब्लाऊज डिझाईन्स 

पैठणीची किंमत (Cost Of Shipping)

Cost Of Shipping

ताग्यावर मेहनतीने विणलेली पैठणी ही एखाद्या मौल्यवान दागिन्यासारखी असल्याने त्याची किंमत ही तशीच आहे. ताग्यावर विणलेली खरी पैठणी ही तब्बल.7,000 पासून ते अगदी 2,50,000 एवढ्या किंमतीपर्यंत उपलब्ध आहे. प्युअर सिल्कचे धागे आणि सोने किंवा चांदीच्या जरीकामामुळे या साडीची किंमत आपोआपच जास्त होते. आजकाला ब्राईडल पैठणीवर मोती आणि हिऱ्यांचे कामही केले जाते. तर साध्या मशीनमेड पैठण्या आणि सेमी पैठण्याच्या किंमती 2 हजारांपासून सुरू होतात.

कॉटन आणि हॅंडलूम ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स

कशी घ्याल पैठणीची काळजी (Care Guide Of Paithani In Marathi)

Marathi Paithani Saree Care
Marathi Paithani Saree Care

पैठणीची काळजी घेताना एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे…

ADVERTISEMENT
  • पैठणी साडी एखाद्या मऊ किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवा.
  • या साडीवर थेट सूर्यप्रकाश पडता कामा नये.
  • प्रत्येक वापरानंतर ही साडी धुवू नका. गरज असेल तरच ड्रायक्लीनला द्या.
  • वर्षातून किमान एकदा साडीला ऊन दाखवा. पण लक्षात ठेवा हे ऊन थेट साडीवर पडणार नाही, याची काळजी घ्या.

महाराष्ट्राची शान नऊवारी नेसण्याचे प्रकार

पैठणीची खरेदी (Purchase Of Paithani)

Purchase Of Paithani

आजही पैठणी खरेदी करायची म्हटल्यावर तोंडात पहिल्यांदा नाव येतं ते येवला पैठणीचं. त्यामुळे येवल्याला जाऊन आजही लग्नाचा बस्ता बांधला जातो आणि बस्त्यात पैठणी तर असतेच. नाशिकजवळील येवल्यात तुम्हाला पैठणीचे भरपूर प्रकार आणि रंग पहायला मिळतील. या ठिकाणी मुंबईपेक्षा पैठणीची अधिक व्हरायटी तुम्हाला मिळते. तेही काहीश्या कमी किमतीत. कारण येवल्यात तुम्हाला बहुतेक साड्या या होलसेल किंमतीप्रमाणे मिळतात. तसंच तुम्ही औरंगाबादमधल्या पैठणमध्येही पैठणीची खरेदी करू शकता. जर तुम्हाला साडी नेसण्याची जास्त आवड नसेल तर आजकाल पैठणीचे ड्रेस, पैठणी कुर्ते, दुप्पटे, पर्स आणि कुशन कव्हर्सनाही मागणी आहे. पैठणीच्या पदराचं टीपिकल डिझाईन आजच्या पिढीलाही भुरळ पाडतच आहे. असं हे महाराष्ट्राचं महावस्त्र कायम श्रीमंत आणि भरजरी राहो.

पैठणीबद्दलचे काही (FAQ’s)

1. सेमी पैठणी म्हणजे काय?

सेमी पैठणीमध्ये एक धागा जरीचा आणि दुसरा धागा पॉलिस्टरचा वापरला जातो. तसंच मशिनमेड पैठण्यांनाही सेमी पैठणी असं म्हटलं जातं.

2. पैठणीचे किती प्रकार आहेत?

हँडलूम सिल्क पैठणी साड्या या मुख्यतः दोन प्रकारात आढळतात. पारंपारिक भरजरी पैठणी आणि ब्रोकेड पैठणी.

ADVERTISEMENT

3. पेशवाई पैठणी हा पैठणीचाच प्रकार आहे का?

पेशव्यांच्या काळात विकसित करण्यात आलेल्या ब्राम्हणी किंवा पेशवाई नऊवारी पैठणी साड्यांना पेशवाई पैठणी असं म्हटलं जातं. पेशव्यांनी आपल्या राज्यकाळात पैठणीच्या विणकरांना राजाश्रय दिला होता.

22 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT