ADVERTISEMENT
home / अॅक्सेसरीज
थंडीत या खास पद्धतीन कॅरी करा स्टोल, दिसा स्टायलिश

थंडीत या खास पद्धतीन कॅरी करा स्टोल, दिसा स्टायलिश

हिवाळ्यातील काही दिवस हे अती थंडीचे असतात. अशा गुलाबी थंडीत मस्त शेकोटी, वाफाळता चहा आणि प्रिय व्यक्तीसोबत गप्पा याची मजाच निराळी असते. हवेत थंडीचा गारवा वाढू लागला की मनात प्रेमाचा उबदारपणा अधिकच वाढतो. अशा काळात आपल्या प्रिय व्यक्तीसमोर थोडं स्टायलिश आणि आकर्षक दिसावं असं प्रत्येकाला वाटू शकतं. मात्र हवेतील गारव्यामुळे तुम्हाला फॅशनेबल दिसण्यात नेहमीच अडखळे येतात. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत हिवाळ्यात अंगावर पांघरलेला स्टोल अथवा स्कार्फ कसा निरनिराळ्या पद्धतीने कॅरी करावा याचा खास टिप्स शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्ही प्रंचड थंडीतही तुमचा लुक सतत बदलू शकता. यासोबतच जर तुमचीही ‘फॅशन’आहे जरा हटके… मग तुमच्यासाठी खास (Fashion Quotes In Marathi)

साडीसोबत कॅरी करा स्टोल

थंडीत गारव्यापासून वाचण्यासाठी तुम्ही अंगावर स्टोल अथवा शॉल लपेटून घेता. मात्र तुम्ही एखाद्या खास कार्यक्रम अथवा फंक्शनसाठी साडीसोबतही स्टोल कॅरी करू शकता. ज्यामुळे तुमचा लुक क्लासी आणि हटके दिसेल. एखादी पार्टी असो वा ऑफिस मिटींग हिवाळ्यात तुम्ही या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेऊ शकता. फक्त हा लुक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या साडीशी मिळता जुळता अथवा कॉम्बिनेशन मध्ये स्टोल अथवा शॉलचा रंग निवडा. शिवाय स्टोल जास्त हेव्ही निवडू नका. कारण साडीसोबत एका खांद्यावर स्टोल कॅरी करणं त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल.

ड्रेससोबत स्टोलने दिसा एलिगंट

साडीप्रमाणेच तुम्ही एखाद्या कुर्ती अथवा ड्रेससोबतही स्टोल कॅरी करू शकता. एखाद्या खास कार्यक्रमासाठी जाताना तुम्हाला क्लास लुक हवा असेल तर पंजाबी ड्रेससोबत ओढणी कॅरी करण्यापेक्षा स्टोल कॅरी करा. असं केल्यामुळे तुमचा थंडीपासून बचाव तर होईलच शिवाय तुम्हाला तुमचा आवडता पंजाबी ड्रेस हिवाळ्यात हवा तेव्हा वापरता येईल. मात्र अशा लुकसोबत तुम्ही काय अॅक्सेसरीज कॅरी करताय या कडे लक्ष द्या. कारण यासोबत हेव्ही ज्वैलरी, पेन्सिल हिल्स नक्कीच शोभणार नाहीत. 

हाय हिल्स आणि आणि जीन्ससोबत करा कॅरी

हिवाळ्यात स्टायलिश दिसण्याचा आणि गारव्यापासून वाचण्याचा हा एक मस्त पर्याय आहे. कारण जीन्ससोबत स्टोल कॅरी केल्यामुळे तुम्हाला मुळीच थंडी वाजणार नाही. शिवाय जर तुम्ही लांब उबदार आणि लोकरीचे स्टोल कॅरी केले तर तुमची उंचीही जास्त दिसेल. असं करताना एक लक्षात ठेवा तुमचा स्टोल आणि टॉप अथवा शर्ट विसंगत असता कामा नये. काळ्या, करड्या, ब्राऊन रंगाच्या स्टोलसोबत पांढरे अथवा हलक्या रंगाचे टॉप जास्त शोभून दिसतील. यासोबतच जर तुम्ही हाय हिल्सचे शूज घातले तर तुमचा लुक अगदीच भारी दिसेल. तुम्ही अशा वेळी स्टोल गळण्याभोवती गुंडाळून, मानेजवळ सैलसर गाठ बांधून अथवा गळ्याभोवती सोडून कॅरी करू शकता.

ADVERTISEMENT

स्किनी पॅंटने अशी करा हटके स्टाईल (How To Wear Skinny Pants In Marathi)

प्रिटेंड स्टोल्स आणि प्लेन कुर्ती

जर तुम्ही प्लेन ड्रेस अथवा कुर्ती घातली असेल तर अशा लांब कुर्ती, लेगिंग अथवा पायजम्यासोबत तुम्ही प्रिंटेड स्टोल कॅरी करू शकता. ज्यामुळे तु्मच्या पेहरावामध्ये सुसंगती दिसेल आणि तुमचा लुक नेहमीपेक्षा वेगळा आणि हटका दिसेल. आजकाल बाजारात विविध प्रकारचे स्टोल सहज मिळतात. त्यामुळे तु्म्हाला तुमचा असा लुक करणं नक्कीच शक्य होईल. 

उंची कमी असेल तर या फॅशन टिप्स ठेवा लक्षात (Fashion Hacks For Short Girls)

16 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT