ADVERTISEMENT
home / Styling
easy and quick open hairstyles for womens day

जागतिक महिला दिनासाठी असं व्हा तयार, करा मोकळ्या केसांची हेअर स्टाईल

मेकअप केल्यावर सर्वात महत्त्वाची असते हेअर स्टाईल. कारण केस तुमच्या सौंदर्याचा एक अविभाज्य भाग असतात. तुम्ही निरनिराळ्या प्रकारच्या हेअर स्टाईल करून तुमचे सौंदर्य अधिक खुलवू शकता. वेण्यांचे प्रकार, अंबाडा हेअर स्टाईल, छोट्या केसांच्या हेअर स्टाईल , मोठ्या केसांची हेअर स्टाईल, वेडिंग हेअर स्टाईल, पार्टी वेअर हेअर स्टाईल असे हेअर स्टाईलचे विविध प्रकार असतात. महिला दिनासाठी तुम्हाला एखादा खास लुक करायचा असेल तर केसांची हेअर स्टाईलदेखील तितकीच परफेक्ट हवी. या महिला दिनानिमित्त ट्राय करा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक खुलवणाऱ्या या मोकळ्या केसांच्या हेअर स्टाईल. परफेक्ट स्टाईल करा आणि तुमच्या आई, बहीण, बायको, मैत्रीण, सहकाऱ्यांना द्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…पण त्यासाठी जाणून घ्या जागतिक महिला दिन माहिती (Women’s Day Information In Marathi)

मिडल पार्टिंग 

केस मोकळे ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. कारण या हेअर स्टाईलमध्ये तुम्ही अधिक आकर्षक आणि एलीगंट दिसू शकता. जर तुमचे केस पातळ असतील तर असा लूक जास्त शोभून दिसतो. यासाठी फक्त तुमच्या केसांना मध्यभागी भांग पाडा आणि त्याचे दोन भाग करा. आवडीप्रमाणे केसांना स्ट्रेट अथवा कर्ली लुक द्या.

साईड पार्टिंग

केस मोकळे ठेवण्यासाठी तुम्ही मिडल पार्टिंग प्रमाणे साईड पार्टिंग करू शकता. यासाठी तुम्हाला सहज कॅरी करता येईल या दिशेने तुमचे केस फिरवून घ्यायचे आहेत. काहिजणींना लहानपणापासून साईड पार्टिंगची सवय असते. त्यामुळे त्यांना अशा प्रकारची हेअर स्टाईल जास्त आरामदायक वाटते. केसांच्या दोन्ही भागांवर तुम्ही कर्लर अथवा स्ट्रेटनरच्या मदतीने हवी तशी स्टाईल करू शकता. केस सेट होण्यासाठी शेवटी हेअर सीरम अथवा स्प्रे लावा. 

वेट ओपन हेअर लुक

आजकाल स्ट्रेट अथवा व्हेवीपेक्षा वेट लूक जास्त ट्रेंडमध्ये आहे. ज्यामुळे तुम्ही जास्त ग्लॅमरस आणि बोल्ड वाटाल. त्यामुळे तुम्हाला मिडल पार्टिंग अथवा साईड पार्टिंग कसे करायचे असेल तसे करा फक्त केस विंचरल्यावर केसांना हेअर जेल लावा. ज्यामुळे केस धुतल्याप्रमाणे ओलसर वाटतील. 

ADVERTISEMENT

मेसी ओपन हेअर लुक

केस नीट विंचरलेले दिसावेत अशी फॅशन करण्याचा आता ट्रेंड नाही. त्यामुळे केस थोडा शॅबी, मेसी लुक असेल तर जास्त छान वाटतात. कारण अशा लुकमध्ये केसांना नॅचरल वेव्ह्ज दिसतात. यासाठी केस कंगव्याने न विंचरता फक्त हाताच्या बोटांनी हवे तसे सेट करा. केसांना चमक येण्यासाठी हलक्या हाताने केसांवर सीरम लावा. 

बॅंग्स लुक ओपन हेअर

वयापेक्षा जास्त तरूण दिसण्यासाठी ही हेअर स्टाईल अगदी परफेक्ट आहे.  शिवाय जर तुमचं कपाळ मोठं असेल तर तुम्ही ही हेअर स्टाईल नक्की करू शकता. यासाठी हेअर कट करताना तुम्ही पुढच्या दिशेने बॅंग्स कट करू शकता किंवा आर्टिफिशिअल बॅंग्स वापरू शकता. मात्र अशा हेअर स्टाईलवर केसांमध्ये थोडा व्हॉल्युम असेल तर ते मोकळे ठेवल्यावर मस्त दिसतात.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

03 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT