ADVERTISEMENT
home / Care
Curly Hair In Monsoon 4

पावसाळ्यात कुरळ्या केसांना असे मॅनेज करा, राहतील मुलायम आणि सुंदर 

पावसाळा उन्हापासून दिलासा तर देतोच, पण सोबत अनेक आजार आणि समस्या घेऊन येतो. या ऋतूत त्वचेची आणि केसांची काळजी घेणे खूप कठीण असते. या ऋतूमध्ये केसांची चमक तर कमी होतेच शिवाय ते आणखी गळायला व तुटायला लागतात. या ऋतूमध्ये केसांची विशेष काळजी घेताना आपण काही चुका करतो, ज्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होते. पावसाळ्यात कुरळ्या केसांची आणखी काळजी घ्यावी लागते. कारण आर्द्रतेमुळे त्यांना मॅनेज करणे अधिक कठीण होऊन बसते. कुरळ्या केसांचे क्यूटिकल्स घट्ट नसतात, त्यामुळे ते रफ होतात. ते ओलावा टिकवून ठेवू शकत नाहीत आणि म्हणून ते अधिक तुटतात. कुरळ्या केसांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि त्यांना दुरुस्त करण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. म्हणूनच या ऋतूत आपल्या आहाराकडे अधिक लक्ष द्या. कुरळे केस सहज कोरडे पडतात कारण त्यांचे क्यूटिकल घट्ट नसतात. पावसाळ्यात हे वारंवार घडते कारण कुरळे केस मॅनेज व्हावे म्हणून तुम्ही ते वारंवार धुता. कुरळे केस निर्जलीकरणामुळे तुटतात, तसेच मुळाशी कमकुवत होतात. जाणून घेऊया या ऋतूत कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यायची आणि काय करू नये. 

केस रोज धुवू नयेत

आपल्याला असे वाटते की आपण दररोज आपले केस धुतले तर ते छान फ्रेश व बाऊन्सी दिसतील. पण असे करू नये. यामुळे केसांची आर्द्रता कमी होऊन केस तुटू लागतात. त्यामुळे आठवड्यातून केवळ 2 ते 3 वेळा केस धुवावेत. आपल्याला आपली टाळू स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. पावसाळ्यात शॅम्पू बदलण्याची गरज नसते. पण टाळूला खाज सुटत असेल तर केटोकोनाझोल असलेला शॅम्पू वापरा म्हणजे कोंडा किंवा फंग इन्फेक्शनचा त्रास होणार नाही. 

Taking Care Of Curly Hair In Monsoon
Taking Care Of Curly Hair In Monsoon

वारंवार तेल लावू नका

पावसाळ्यात केस कोरडे होतात आणि डल दिसतात. त्यामुळे आपण केसांना भरपूर तेल लावतो जेणे करून त्यांना पोषण मिळेल. पण ही चूक करू नका. यामुळे केसांमध्ये धूळ आणि घाण चिकटून बसते व त्यामुळे केस निर्जीव होऊन तुटतात. कोरड्या व रफ केसांना सारखे तेल लावण्याऐवजी जेल आधारित स्मुथनींग सीरम लावावे.

केसांना ब्लीच करणे टाळा

पावसाळ्यात केसांची कोणतीही ट्रिटमेंट करू नये. विशेषतः कुरळ्या केसांशी तर मुळीच खेळ करू नये.  यामुळे ते आणखी रफ आणि कोरडे होऊ शकतात. 

ADVERTISEMENT

कंडिशनर लावण्यास विसरू नका 

पावसाळ्यात अनेक लोक कंडिशनर लावायचा कंटाळा करतात. पण असे अजिबात करू नये. शॅम्पूने स्कॅल्प स्वच्छ केल्यानंतर केसांना कुरळेपणापासून दूर ठेवण्यासाठी कंडिशनर लावणे आवश्यक आहे.  

पावसाच्या पाण्यापासून केसांचे करा रक्षण 

Taking Care Of Curly Hair In Monsoon
Taking Care Of Curly Hair In Monsoon

तसेच घरातून बाहेर पडण्यापूर्वी केस भिजू नयेत म्हणून कॅप घाला किंवा छत्री घ्या. पावसाच्या पाण्यामुळे कुरळे केस आणखीनच रफ व कोरडे होतात. चुकून तुम्ही पावसात भिजलात तर घरी परतल्यावर टॉवेलने केस नुसते सुकवण्याऐवजी लगेच शॅम्पू करा. याने केस आणि टाळू स्वच्छ होतील आणि त्याचबरोबर खाज येण्याची समस्याही कमी होईल. केस स्वच्छ ठेवल्याने ते निरोगी होतील आणि केस गळण्याची समस्याही कमी होईल. कुरळ्या केसांना अतिरिक्त पोषणाची आवश्यकता असू शकते, म्हणून, त्यांना मऊ ठेवण्यासाठी हायड्रेटिंग शॅम्पू आणि रिच कंडिशनर वापरावे. 

बर्‍याच मुली, ऑफिस किंवा कॉलेजमध्ये पोहोचण्याच्या घाईत, शॅम्पू केल्यानंतर केसांचा अंबाडा बांधतात आणि नंतर ते सुकण्यासाठी उघडतात. पण, असे केल्याने केसांना वास येऊ लागतो आणि ते नीट सुकत नाहीत. म्हणूनच केस पूर्णपणे कोरडे केल्यानंतरच घराबाहेर पडा.

अशा प्रकारे तुम्ही पावसाळ्यात कुरळ्या केसांची निगा राखू शकता. 

ADVERTISEMENT

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

20 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT