ADVERTISEMENT
home / Dating
जोडीदार देत नसेल वेळ, तर वापरा या सोप्या ट्रिक्स

जोडीदार देत नसेल वेळ, तर वापरा या सोप्या ट्रिक्स

सध्या बरेचदा नाती तुटण्याच्या गोष्टी कानावर येत असतात. बरेच वर्ष एकमेकांसह असलेले आणि लवकरच लग्न करणार असणारी जोडपीही वेगळी झालेली दिसून येत आहे. याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे जोडीदाराने वेळ न देणे. जोडीदार वेळ देत नाही यावरून बरेचदा नात्यात वाद होतात आणि त्यामुळेच नाती टिकत नाहीत. तुमचाही जोडीदार नेहमी कामात व्यस्त असण्याची कारणं देत आहे का? तुम्ही बोलावता किंवा तुम्हाला भेटावं वाटतं तेव्हा जोडीदार येत नाही का? केलेल्या मेसेजना जर वेळेवर उत्तर येत नसेल अथवा फोन केल्यावरही त्याला बोलायला वेळ नसतो, तुमच्याशी बोलायला, तुमची काळजी घ्यायलाही वेळ नसेल तर अर्थातच लवकरच ब्रेकअप होऊ शकतं. त्याच्या अथवा तिच्या अशा वागण्याचा सर्वात जास्त प्रभाव पडतो तो नात्यावर. कारण एका मर्यादेपर्यंतच समोरचा माणूस समजून घेऊ शकतो. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहोत त्याच्याजवळ आपल्यासाठी वेळच नाही यापेक्षा जास्त मोठं दुःख ते काय असणार. कारण आपल्याला गरज असेल तेव्हा आपल्या माणसाने वेळ काढावा आणि आपल्याशी बोलावं इतकं प्रत्येकाला हवं असतं. यामध्ये मुलींना सर्वात जास्त मानसिक तणाव सहन करावा लागतो असं दिसून आलं आहे. मुली हे जास्त काळ सहन करू शकत नाहीत. बऱ्याच वेळा मुलींच्या मनात नकारात्मक विचार येतात आणि त्यामुळे त्यांच्या मनात संशयाचं भूतही बळावतं. पण तुम्हाला तरीही नातं वाचवायचं असेल तर त्यासाठी काही सोप्या टिप्स या लेखातून आम्ही तुम्हाला देत आहोत. या टिप्स वापरूनही जर तुमचं नातं सुधारत नसेल तर मग अशा जोडीदारापासून तुम्ही दूर झालेलं नक्कीच चांगलं. पण त्याआधी नक्की एकदा आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊन बघा. 

जोडीदाराशी बोला

Shutterstock

तुम्हाला जर तुमचा जोडीदार वेळ देत नसेल आणि यामुळे तुमच्या मनात उलट सुलट विचार येत असतील आणि तुम्ही स्वतःच त्या विचारात गुंतून त्रास करून घेत असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी एकदा बोलून पाहा. तो असा का वागत आहे, त्याला नक्की काय होत आहे अथवा त्याला नक्की काय हवंय या नात्यातून हे समोरासमोर बसून बोला. कदाचित त्याच्यावर कामाचा खूप ताण असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा. काही व्यक्तीगत कारण आहे का याची विचारपूस करा. त्याला या नात्यात राहायचं आहे की नाही याची खात्री करून घ्या. कारण कोणतंही असो पण तुम्हाला जाणून घ्यायचा अधिकार नक्की आहे. जितकं शांतपणे विचारू शकता तितकं शांत राहा. वाद घालू नका. त्याची बाजू समजून घेण्याचा आणि तुमची बाजू सांगण्याचा प्रयत्न करा. असं केल्यास दोघांनाही वेळ मिळेल आणि समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल. 

Valentines Day Plan For Your Partner In Marathi

ADVERTISEMENT

संधी शोधा

जर तुमचा जोडीदार खूप व्यस्त असेल आणि तुमच्याकडे थोडा वेळ असेल. त्याला मनात असूनही वेळ देता येत नसेल तर तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालविण्यासाठी तुम्ही संधी शोधा. उदाहरणार्थ त्याची ऑफिसमधून सुटण्याची वे माहीत असेल तर तुम्ही अचानक त्याला भेट द्या. त्याला अचानक आलेलं आवडत नसेल तर सकाळीच त्याला सांगा ही आज मी तुला घ्यायला येईन. त्यालाही बरं वाटेल. घरापर्यंतचा प्रवास त्याच्यासह करा. रोज भेटणं शक्य नाही हे सर्वांनाच माहीत आहे. पण एखाद्या दिवशी त्याच्यासाठी काहीतरी त्याला अथवा तिला आवडेल असं करा. जेणेकरून भेटही होईल आणि त्यांच्या मनावरचा ताणही कमी होईल. अशावेळी तुम्ही एकांतात वेळही घालवू शकता आणि तुमच्यातील भांडणं कमी होण्यासही याची मदत मिळेल.

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

जबरदस्ती करू नका

Freepik.com

बऱ्याचदा समजून न घेण्याने नाती खराब होतात. तुमचा जोडीदार जर सध्या व्यस्त असेल कामात तर त्याला कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करू नका. त्यामुळे तुम्ही त्यांना समजून घेत नाही असा त्यांचा समज होतो. त्यामुळे नात्यात अधिक दुरावा निर्माण होऊ लागतो. त्याला हवं तेवढं स्वातंत्र द्या आणि आठवड्यातून किमान एक दिवस विकेंडला तरी तुमचा जोडीदार अथवा तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढू शकाल याकडे मात्र लक्ष द्या. त्यामुळे तुम्ही अजिबात त्याच्याकडे दुर्लक्षही करू नका आणि खूप लक्षही देऊ नका. 

ADVERTISEMENT

तुमचा जोडीदार असेल रागीट तर कसे टिकवाल तुमचे नाते

तुमची आवड जपा

आनंदासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारावर अवलंबून राहू नका. जोडीदार सतत व्यस्त असण्याचे कारण देत असेल तर भांडण होऊन दुरावाच येणार. मग अशावेळी तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि आपल्या आवडीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. अधेमधे क्युट रिलेशनशिप स्टेट्स शेअर करा. स्वतःवर जास्त लक्ष केंद्रीत करा. जेव्हा तुम्ही स्वतः व्यस्त राहाल तेव्हा आपला जोडीदार काय करतोय याकडे लक्षच राहणार नाही. तुम्हीही त्याच्याप्रमाणे वागू लगालात तर त्याला कदाचित कळेल आणि तुम्ही इतरांना त्याच्यापेक्षा जास्त वेळ देत आहात हे जाणवल्यावर स्वतःच तो तुमच्याजवळ येईल. त्यामुळे उगीच त्याच्या मागे लागून स्वतःला आणि त्याला दोघांनाही त्रास देऊ नका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

21 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT