आपल्यापैकी लहानपणी कार्टून्स न बघितलेली माणसे अगदी क्वचितच सापडतील. टीनएज म्यूटन्ट निन्जा टर्टल्स, टॉम अँड जेरी, स्कुबी डू , रोड रनर शो, बे ब्लेड, बग्स बनी असे अनेक कार्टून्स बघत आपण मोठे झालो. लिओनार्डो, टीनएज म्यूटन्ट निन्जा टर्टल मधील एक पात्र (निळ्या रंगाचा) हा क्रूरपणे मारहाण करतो आणि वाईट क्रॅंगच्या सैन्याचा नाश करतो. स्क्रीनवर सगळीकडे तुटलेले हात आणि पाय, मोडलेले चेहरे, उध्वस्त इमारती, संपूर्ण विनाश दिसतो. तेच टॉम आणि जेरीचे! ते सतत एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी एकमेकांशी सतत भांडतात. तेच Wile E. Coyote आणि रोड रनरच्याही बाबतीत! कुणालातरी नेहमीच मारहाण होते. पण हे सगळे बघू नये म्हणून घरात बसून फक्त टीव्ही बघण्यापेक्षा मुलांना गुंतवून ठेवण्याच्या आयडीयाज शोधणे पालकांसाठी अवघड जाते. घरात एकटे मूल खेळणार तरी किती?
लहान मुलांच्या मनावर होतात गंभीर परिणाम
एखाद्याच्या डोक्यावर भव्य पियानो फेकणे, बंदुकीच्या गोळ्या मारणे, कोणाच्या हातात किंवा तोंडात स्फोटके कोंबणे आणि त्यानंतर होणारा मोठा स्फोट, हे सर्व मुलांच्या कोमल मनावर हिंसेचे चित्रण करणारे अचेतन किंवा थेट संदेश असतात जे त्यांच्या मनात खोलवर कोरले जातात. लहान मुले ही दृश्ये स्पंजप्रमाणे शोषून घेतात आणि हिंसाचार अगदी सामान्य म्हणून स्वीकारतात. मेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (एएपी) च्या तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की जी मुले हिंसाचाराने भरलेली कार्टून पाहतात ते चिंताग्रस्त, अधीर, आक्रमक आणि अवज्ञाकारी असतात. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांपैकी 89% पालकांची तक्रार आहे की त्यांची मुले तासंतास इंटरनेटवर व्हिडीओ बघत असतात. 3-4 वर्षे वयोगटातील 81% आणि 2 वर्षांखालील 57% मुले देखील तासंतास टक लावून व्हिडीओ बघत बसतात. बहुतांश कार्टून्समध्ये विनोदाच्या नावाखाली हिंसाचार दाखवलेला असतो.
कार्टून्समधून दाखवली जाते हिंसा
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की एखादे सरासरी बालक त्याच्या वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत तब्बल 2 लाख हिंसक सीन्स बघते. यापैकी बरेचसे सीन्स हे अवास्तव कार्टून्समध्ये असू शकतात जे वरकरणी निरुपद्रवी दिसतात. अनेक लोकप्रिय कार्टून्स विनोदी किंवा स्वीकारार्ह पद्धतीने हिंसा दर्शवतात. व्यंगचित्रे हिंसेला सामान्य बनवतात आणि मुलांना ती सामान्य व स्वीकारार्ह वाटतात आणि वास्तववादी हिंसेची मुलांकडून नक्कल केली जाण्याची शक्यता असते. हिंसक व्यंगचित्रांमुळे मुलांमध्ये अवज्ञाकारी, चिंताग्रस्त आणि आक्रमक प्रवृत्ती निर्माण होऊ शकते.
कार्टून्समुळे मुले त्यांच्या आजूबाजूला होणाऱ्या दु:ख, वेदना आणि हिंसाचाराबद्दल असंवेदनशील होऊ शकतात. मुले कार्टून पात्रांना वास्तविक जीवनातील आदर्श म्हणून पाहण्यास सुरुवात करू शकतात आणि त्याचे अनुकरण करतात.(काही वर्षांपूर्वी एका जपानी कार्टूनमुळे मुले उद्धट व मग्रूर वागू लागली होती. अखेर ते कार्टून बॅन झाले.)तसेच भीतीदायक कार्टून शो पाहिल्यानंतर 78% मुलांना अंधारात किंवा एकाकी ठिकाणी जाण्याची भीती वाटते. हिंसक व्यंगचित्रांमुळे असामाजिक वर्तन होऊ शकते आणि मुलींपेक्षा मुले हिंसक व्यंगचित्रांचे जास्त अनुकरण करतात.
हिंसक कार्टून्समुळे होणारे नकारात्मक परिणाम
हिंसक कार्टून्समुळे मुले अयोग्य हिंसक आणि लैंगिक वर्तन शिकतात. तसेच त्यांच्यात सहानुभूतीचा अभाव असतो व त्यांचे वर्तन उद्धट व मग्रूर होते. मुले शिव्या देण्यास शिकतात. सततच्या स्क्रीन टाइममुळे शारीरिक ऍक्टिव्हिटीज कमी होतात व त्यामुळे लठ्ठपणा, दृष्टी आणि पोषण-संबंधित आरोग्य समस्या निर्माण होतात. मुलांना कार्टूनचे ,स्क्रीनचे व्यसन लागते.
म्हणूनच मुले टीव्हीवर, स्क्रीनवर काय बघतात यावर पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यांचा स्क्रीन टाइम मर्यादेत ठेवायला हवा व त्यांना हिंसक कार्टून्स बघू देऊ नये.
फोटो क्रेडिट- istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक