ADVERTISEMENT
home / Friends
जीवनात प्रत्येकाकडे हे ‘5’ प्रकारचे friends असायलाच हवेत

जीवनात प्रत्येकाकडे हे ‘5’ प्रकारचे friends असायलाच हवेत

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील रविवार हा फ्रेन्डशीप डे म्हणून साजरा केला जातो. तुमच्या प्रत्येकाचा या दिवसासाठी काहीतरी खास प्लॅन असेलच. शाळेत जाणारा एखादा चिमुरडा असो अथवा साठ वर्षांच्या निवृत्त आजीबाई प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रमैत्रिणींसाठी एक खास जागा असते. कारण मैत्री जीवनात फार महत्त्वाची आहे. हे एक असं नातं आहे जे आयुष्यभर कोणत्याही अपेक्षेशिवाय टिकतं. मित्र आणि मैत्रिणी आपल्याला सुख आणि दुःखात समान साथ देतात. त्यांचं  आणि आपलं नातं नकळत एका भावनिक बंधांनी बांधलेलं असतं. जीवनातील कोणत्याही प्रसंगी पाठीशी उभे राहणारे तुमचे मित्रच असतात. आपल्या आयुष्यात विविध प्रकारचे मित्रमैत्रिणी असतात. मात्र काही खास मित्रमैत्रीणी नेहमी लक्षात राहतात. जर तुमच्या आयुष्यात अशा प्रकारचे फ्रेन्डस असतील तर या फ्रेंडशीपडेला त्यांना Thanks म्हणायला मुळीच विसरू नका.

या पाच प्रकारचे मित्र अथवा मैत्रीण तुमच्याकडे आहेत का

Shutterstock

1.प्रामाणिक स्वभावाचे

मैत्रीत सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रामाणिकपणा. कारण मैत्रीत तुम्ही जेव्हा तुम्ही एकमेकांच्या जवळ येता. तेव्हा नकळत तुमच्या कडून तुमच्या मनात खोल दडलेल्या भावना अचानक वर येऊ लागतात. भावनेच्या आहारी जाऊन आपण आपल्या मनातील सिक्रेट्स मित्रमैत्रीणींना सांगून टाकतो. त्यामुळे तुमच्या जीवनातील ही गूढ रहस्य तुमच्या मित्रमैत्रीणींनी तशीच ठेवायला हवीत.नाहीतर तुमच्या जीवनातील गोंधळ अधिकच वाढू शकतो. यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी सिक्रेट्स शेअर करण्यासाठी एखाद्या प्रामाणिक मित्र अथवा मैत्रीण असायलाच हवी.

ADVERTISEMENT

2. मार्गदर्शन करणारे

तुम्ही नेहमी मित्रमैत्रीणींच्या गराड्यात राहत असाल अथवा तुमची सर्वांशीच चांगली मैत्री होत असेल तर ती एक चांगली गोष्ट आहे. मात्र तुमच्या मित्रमैत्रिणींमधले कितीजण तुम्हाला योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात हे नीट पहा. कारण बऱ्याचदा मैत्री तुटू नये अथवा तुम्हाला वाईट वाटू नये यासाठी तुमच्या हो ला हो म्हणणारेच अधिक असतात. शिवाय तुमची मर्जी राखल्यामुळे तुम्हाला ते फार आवडतात. मात्र जर तुम्हाला जीवनात खऱ्या अर्थांने यशस्वी व्हायचं असेल तर टीका करणाऱ्या अथवा योग्य वेळी योग्य तेच सांगणाऱ्या मित्रमैत्रीणींना दूर करू नका. कारण तुमच्या चुका सुधारण्यासाठी ते तुम्हाला असं सांगत असतात.

3. सकारात्मक विचारसरणी असलेले

जर तुमचा एखादा मित्र अथवा मैत्रीण तुम्हाला सतत नकारात्मक प्रतिसाद देत असतील तर त्यांच्यापासून दूर राहीलेलंच बरं. कारण तुम्ही ज्या लोकांच्या संगतीमध्ये राहता त्यांच्याप्रमाणे हळूहळू तुमची विचारसरणी तयार होत असते. निगेटिव्ह विचारसरणीचा तुमच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनावर नकळत परिणाम होत असतो. त्यामुळे सतत चांगल्या विचारांच्या आणि सकारात्मक विचारसरणीला प्रोत्साहन देणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा.

वाचा – वाढदिवसाचे प्रेमळ शुभेच्छा संदेश मित्रमैत्रिणींसाठी

4. तुमच्या करिअरविषयी माहिती असलेले

शाळा, कॉलेज संपल्यावर तुम्ही तुमच्या करिअरची वाट धरता. अशा वेळी तुमच्या करिअरविषयी चांगली माहिती असणारे मित्रमैत्रिण तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला  त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण तुम्हाला प्रोफेशनल लाईफमध्ये येणारे अडथळे, अडचणी, समस्या दूर करण्यासाठी ते तुमच्या पाठीशी सदैव उभे असतात.

ADVERTISEMENT

5. काळजी घेणारे

काही लोकांचा स्वभाव मुळातच नम्र आणि प्रेमळ असतो. अशा माणसं सर्वांनाच हवीहवीशी वाटत असतात. प्रेमळ स्वभावाची माणसं नेहमी इतरांची काळजी घेतात. त्यामुळे अशा स्वभावाचे मित्रमैत्रिणी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला नेहमीच त्यांची भावनिक साथ मिळू शकते. आपल्यावर प्रेम करणारे, आपली काळजी घेणारे मित्र आपल्याजवळ आहेत ही भावनाच सुखद असते.

#happyfriendshipday…यंदाचा फ्रेंडशीप डे मजेत आणि आनंदाचा जाण्यासाठी तुम्हा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा…मस्तपैकी मित्रांसाठी फ्रेंडशिप स्टेटस ठेवा आणि तुम्हाला ही माहीती कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा. तुमच्या जवळदेखील असे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना टॅग जरूर करा.

अधिक वाचा

मित्रमैत्रिणींना काय द्यायचे स्पेशल गिफ्ट्स

ADVERTISEMENT

राखीपौर्णिमेला बहीण आणि भावाला द्या ‘या’ भेटवस्तू

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम  आणि शटरस्टॉक

31 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT