ऑगस्ट महिना जसा जवळ येतो तसे वेध लागतात ते फ्रेंडशिप डे चे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी सगळीकडे जगभरात फ्रेंडशिप डे (Friendship Day In Marathi) साजरा केला जातो. वास्तविक हल्ली शाळा, कॉलेज सगळ्यांनाच फ्रेंडशिप डे म्हणजे नक्की काय हे माहीत असतं. पण खरी मैत्री मात्र फार कमी मित्रांकडून अनुभवायला मिळते. आपल्या आयुष्यात एक मित्र अथवा मैत्रीण नेहमीच असा असतो ज्याला आपण आपल्या सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि त्याच्याबरोबर आपली सुख आणि दु:ख वाटून घेत असतो. त्या आपल्या मित्र अथवा मैत्रीणीचं आपल्या आयुष्यात स्थानच वेगळं असतं. त्यांच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. मित्रमैत्रिणींना काय द्यायचे स्पेशल गिफ्ट्स हेदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. मैत्रिणीला भेटवस्तू देताना तर किती विचार करावा लागतो. त्यामुळे जाणून घेऊया मैत्रिणीला भेटवस्तू काय द्यायच्या किंवा मित्रमैत्रिणींसाठी काय भेटवस्तू घ्यायच्या या खास दिवशी.
प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचा एक वेगळा अर्थ असतो. काही जण ही मैत्री सगळ्यांबरोबर साजरी करतात तर काही जणांसाठी अगदी शांत राहून फक्त समोरच्याला मदत करणं ही मैत्री असू शकते. कोणीही कोणत्याही नात्यात परफेक्ट नसतं. पण मैत्रीच्या बाबतीत काहीच परफेक्ट नसतं. काही ठिकाणी अपेक्षा असतात तर काही ठिकाणी अजिबातच अपेक्षा नसतात. काहीही न सांगता एकमेकांना समजून घेणं म्हणजे मैत्री. हीच मैत्री साजरी करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो त्याला फ्रेंडशिप डे असं म्हटलं जातं. यादिवशी सगळेच आपल्या मित्र आणि मैत्रीणींबरोबर हा दिवस साजरा करत असतात. आजकाल तर या दिवसाला एका सणाचं स्वरूप आलं आहे.
आपण नेहमीच फ्रेंडशिप डे साजरा करत असतो. पण हा नक्की कसा सुरु झाला याची तुम्हाला माहिती आहे का? 1935 साली अमेरिकेतील एका घटनेनंतर या दिवसाला सुरुवात झाली. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्रासाठी जीव दिला होता. याची आठवण म्हणूनच हा दिवस साजरा करण्यात येतो. असंही म्हटलं जातं की, 1935 साली अमेरिकेच्या सरकारने एका निर्दोष व्यक्तीची हत्येची शिक्षा दिली होती. त्यानंतर त्याच्या मित्रानेदेखील आत्महत्या केली होती. तेव्हापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात येतो. दक्षिण अमेरिकेतील काही लोकांनी या घटनेवर राग व्यक्त केला. पण त्याचा निर्णय लागण्यासाठी एकवीस वर्ष जावी लागली. 1958 मध्ये अमेरिकेने हा प्रस्ताव मंजूर केला आणि त्यानंतर हा फ्रेंडशिप डे सर्व स्तरावर साजरा करण्यात येऊ लागला. तर भारतात याला एक वेगळं महत्त्व आहे. अगदी अनादी काळापासून मैत्रीची उदाहरणं भारतात दिसून येत आहेत. कृष्ण-सुदामा, राम-हनुमान, दुर्योधन-कर्ण यांच्या मैत्रीच्या गोष्टी आजही सांगितल्या जातात.
आजकाल वरचेवर आपल्याला BFF असा शब्द ऐकू येत असतो. आपले आईवडील म्हणतात म्हणजे नक्की काय? अर्थात ही संकल्पना आधीपासूनच आहे. पण आता शॉर्टकटचा जमाना असल्यामुळे बरेचदा लोकांना याचा अर्थ लागत नाही. तर BFF म्हणजे Best Friend Forever. आयुष्यभरासाठी आपला मित्र अथवा मैत्रीणीचं नातं जपून ठेवणारे दोघंजण असतात. ज्यांना एकमेकांबद्दल सर्व काही माहीत असतं. एकमेकांवाचून ज्यांचं काहीच होऊ शकत नाहीत अशी घट्ट मैत्री. अर्थात ही सध्याची भाषा असली तरीही याचा अर्थ अनादी काळापासून लोकांना समजलेला आहे. अशा या घट्ट मित्र आणि मैत्रीणींसाठी या फ्रेंडशिप डे ला नक्की काय गिफ्ट (Gift) घ्यायचं असा प्रश्न आता आपल्याला सगळ्यांनाच पडलेला असतो. तर आम्ही खास तुमच्यासाठी यावेळी तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रीणींना काय द्यायचं हा प्रश्न सोडवलेला आहे.
आपल्या मित्र आणि मैत्रिणींच्या आवडीप्रमाणे गिफ्ट निवडू शकता आणि त्यांना देऊन नक्की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा. तुमच्यासाठी काही खास असे पर्याय आम्ही सांगत आहोत.
भावाला काय द्याल भेटवस्तू (Raksha Bandhan Gift Ideas For Brother)
तुमच्या मैत्रिणीला जर काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आवडत असतील आणि तिला कॉफीची आवड असेल तर POPxo Shop वरील हे पिकाचू कॉफी मग तुम्ही नक्कीच तिच्यासाठी खरेदी करायला हवेत. दिसायला अप्रतिम आणि क्यूट असणारे हे मग तिला या फ्रेंडशिपला नक्कीच आवडतील. शिवाय इतर मग्जपेक्षा याचा आकार वेगळा असून दिसायलादेखील हा अधिक आकर्षक असल्यामुळे तिला हे गिफ्ट नक्कीच वेगळं वाटेल
आजकाल टोट बॅगची फॅशन अर्थात नवा ट्रेंड चालू आहे. प्रत्येकाला अशी विशिष्ट मेसेज लिहिलेली बॅग आपल्याकडे असावी असं वाटत असतं. तुमच्या जवळच्या मैत्रिणीला जर अशी बॅग हवी असेल तर तुम्हाला POPxo Shop वरील टोट बॅगेचा पर्याय चांगला आहे. तुम्हाला हव्या त्या रंगात आणि अगदी कॉलेजला जाण्यासाठी अशी फॅशनेबल टोट बॅग तुम्हाला इथून विकत घेता येऊन आपल्या बेस्ट फ्रेंडला देता येईल.
आपल्या फोनला फॅन्सी आणि ट्रेंडी फोन कव्हर असायला हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं. आपल्या मैत्रिणीच्या फोनला एक सुंदर कव्हर गिफ्ट करणं म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या मैत्रिणीला हे गिफ्ट देऊ शकता. तुम्हाला जास्त शोधत बसायची यासाठी गरज नाही. आमच्या POPxo Shop मध्ये Tech Accessories मध्ये जाऊन तुम्हाला अनेक पर्याय यामध्ये मिळतील.
कानातले हा असा प्रकार आहे जो प्रत्येक मुलीला आणि महिलेला आवडत असतो. फ्रेंडशिप डे च्या दिवशी आपल्या जीवलग मैत्रिणीला आवडतील असे ट्रेंडी कानातले तुम्ही गिफ्ट करू शकता. तिला नक्की काय आवडतं याचा अंदाज तुम्हाला असतोच. शिवाय तिला कोणता रंग चांगला दिसेल याचीही तुम्हाला पूर्ण कल्पना असते. त्यामुळे तिच्यासाठी असे सुंदर कानातले निवडणं नक्कीच तुमच्यासाठी कठीण नाही.
तुम्ही आणि तुमची मैत्रीण जर नेहमी प्रवास करत असाल आणि तुम्हाला एकमेकांबरोबर फिरायला आवडत असेल तर तुम्ही तिला एक ट्रेंडी कॅनव्हास पाऊच गिफ्ट करू शकता. ज्यावर वेगवेगळ्या प्रकारचे फनी मेसेज लिहिलेले असतील. अनेक अनेक ट्रेंडी पाऊच तुम्हाला POPxo Shop मध्ये पाहायला मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आपल्या प्रिय मैत्रिणीला फ्रेंडशिप डे चं गिफ्ट द्या.
बऱ्याच जणींना मेकअपची खूप आवड असते आणि तुमची जवळची मैत्रीणही त्यापैकीच एक असेल तर तिला तुम्ही आय मेकअप किट गिफ्ट म्हणून या फ्रेंडशिप डे ला देऊ शकता. तिला नेहमी बाहेर जाताना परफेक्ट लुकमध्येच जायंच असेल आणि मेकअपची आवड असेल तर तिला हे मेकअप किट नक्कीच उपयोगी ठरेल.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना परफ्युम वापरणं खूपच आवडत असतं. तुमची मैत्रीदेखील या परफ्युमप्रमाणे दरवळावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही परफ्युम गिफ्ट म्हणून देऊ शकता. तिच्या आवडीचा विचार करून मग तुम्ही परफ्युम निवडा. पण बऱ्याच महिलांना या गेस परफ्युमचा सुगंध आवडत असल्यामुळे आम्ही तुम्हाला हे परफ्युम सुचवत आहोत.
आपल्या जवळच्या मैत्रिणीला जर वेगवेगळ्या इनरवेअर्सची आवड असेल आणि जर ती आवड आपल्याला माहीत असेल तर तुम्ही या फ्रेंडशिप डे ला तिला नक्की हे सरप्राईज द्या. तिला तिच्या आवडीच्या वेगवेगळ्या इनरवेअर्स गिफ्ट म्हणून द्या. तिच्या ही गोष्ट ध्यानीमनीही येणार नाही त्यामुळे तिला नक्कीच तुमची आयडिया आवडेल आणि ती आनंदी होईल.
ब्रेसलेट हे प्रत्येक मुलीला आवडत असतं. हेच ब्रेसलेट जर सिल्व्हर कोटेड फ्रेंडशिप डे ला तुम्ही आपल्या जवळच्या मैत्रिणीला दिलं तर ते तिच्यासाठी नक्कीच खास असेल आणि सरप्राईज असेल. तिच्या आवडीप्रमाणे तुम्ही आधीच डिझाईन निवडून हे गिफ्ट घेऊन ठेवा.
काही जणांना खूप काही गोष्टी नोटबुकमध्ये लिहून ठेवायची सवय असते तर काही जणांना नोटबुक जमवून ठेवायची सवय असते. काहींना आपल्या राशीच्या गोष्टी जमवण्याची सवय असते. तुमच्या जवळच्या मैत्रिणीलादेखील यापैकी कोणत्याही गोष्टीची आवड असेल तर तुम्ही तिला स्पेशल नोटबुक गिफ्ट करू शकता. POPxo Shop मध्ये Stationery सेक्शनमध्ये तुम्हाला खूपच चांगले पर्याय उपलब्ध आहेत.
मैत्रिणींप्रमाणेच तुमच्या खास मित्रांसाठीदेखील गिफ्ट्स आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत. या फ्रेंडशिप डे ला तुम्ही तुमच्या मित्रांना हे गिफ्ट्स देऊन करा आनंदी.
आपल्या बेस्ट फ्रेंडसाठी त्याला आवडणाऱ्या गोष्टी पर्सनलाईज्ड करून मस्तपैकी एक मग गिफ्ट करू शकता. त्यावर मग तुम्ही तुमचे अप्रतिम क्षण ठेवा अथवा त्याचं तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे ते सांगणारा एखादा कोट लिहा. तुमच्या बेस्ट फ्रेंडला हे गिफ्ट नक्कीच आवडेल यात शंका नाही.
बऱ्याच मुलांना आपली दाढी खूपच आवडत असते. ती दाढी तेल लावून व्यवस्थित वाढवणारेही बरेच असतात. तुमचा मित्रही त्यापैकीच एक असेल तर त्याला यापेक्षा चांगलं आणि उत्तम गिफ्ट ते काय असणार? त्यामुळे या फ्रेंडशिप डे ला तुम्ही त्याला आवडेल असं एक बिअर्ड ऑईल भेट देऊ शकता.
कार्ड होल्डर हादेखील एक चांगला पर्याय आहे. सध्या पैशांपेक्षा आपण कार्ड्सचा वापर जास्त करत असतो. विविध बँकांची कार्ड्स आपल्याकडे असतात. पण ते ठेवण्यासाठी कार्ड होल्डर हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या मित्राला असं एक ट्रेंडी कार्ड होल्डर नक्कीच भेट देऊ शकता.
आपल्या जवळच्या मित्रांंच्या सवयी आपल्यालाच माहीत असतात. आपल्या बऱ्याच मित्रांना उशीरा येण्याची सवय असते. तुमच्याजवळचा मित्रही असाच असेल तर तुम्ही त्याला असं घड्याळ गिफ्ट करू शकता. जेणेकरून नेहमी त्याच्या लक्षात राहील की, तुम्हाला भेटायला येताना वेळेवरच जायला हवं, उशीर करून चालणार नाही.
आपल्याला आपल्या मित्रांच्या आरोग्याची काळजीदेखील ठेवायला हवी. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपणच एकमेकांची काळजी घेणं गरजेचं आहे. तो योग्य वेळी व्यायाम करतो की नाही हे पाहा अथवा तो जर फिटनेस फ्रिक असेल तर हे गिफ्ट त्याच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. शिवाय बरीच मुलं ही टेक्नोसॅव्ही असतात त्यामुळे त्यांना अशी गिफ्ट्स नक्कीच आवडतात.
सगळ्याच मुलांना टेक्निकल वस्तूंची आवड असते. त्यातही जर ते ब्लूटूथ हेडफोन्स असतील तर सोने पे सुहागा. त्यामुळे या फ्रेंडशिप डे ला तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला असं गिफ्ट दिल्यास तो नक्कीच आनंदी होईल. शिवाय त्याच्यासाठी जर हे सरप्राईज असेल तर हा फ्रेंडशिप डे तुमच्या दोघांसाठीही खूपच आनंदी ठरेल.
मुलांना घड्याळ घालायला खूपच आवडतं. तुम्ही ते कस्टमाईज करूनही त्यांना फ्रेंडशिप डे ला देऊ शकता किंवा त्यांच्या आवडत्या कंपनीचं घड्याळ तुम्ही त्यांना यादिवशी गिफ्ट द्या. घड्याळांमध्येही अनेक व्हरायटी असतात. त्यांच्या आवडीनुसार रंग आणि इतर गोष्टी निवडून तुम्ही गिफ्ट करू शकता.
प्रत्येक मुलाकडे ग्रुमिंग कीट तर नक्कीच असतं. पण ते थोडं फॅशनेबल आणि त्याला आवडेल असं मिळालं तर त्याचा आनंद काही वेगळाच. आपल्या बेस्ट फ्रेंडला या फ्रेंडशिप डे ला असंच एखादं ग्रुमिंग कीट घेऊन दिलंत तर त्याला नक्की आनंद होईल. शिवाय त्याला व्यवस्थित आपल्या दाढी आणि मिशीची काळजीही घेता येईल.
तुमच्या मित्राकडे बाईक अथवा गाडी असेल आणि त्याला ड्रायव्हिंगची आवड असेल तर किचैन हादेखील फ्रेंडशिप डे ला देण्यासाठी चांगला पर्याय आहे. Drive Safe आणि त्यावर त्याला आवडेल असा मेसेज लिहून कस्टमाईज करून तुम्ही ही किचैन त्याला भेट म्हणून देऊ शकता.
वॉलेट कोणाला नको असतं? कितीही वॉलेट दिले तरी कमीच पडतात. तुमच्या बेस्ट फ्रेंडला लेदरचं हे सुंदर वॉलेट तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. अशी वॉलेट्स तुम्हाला कमी किमतीत आणि चांगली मिळतात. त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्राला खूश करण्यासाठी हे गिफ्ट चांगला पर्याय आहे
फ्रेंडशिप डे ला आपल्या खास मित्रांसाठी आपल्याला काही खास मेसेज द्यायचे असतात. ग्रिटींग कार्ड्स यासाठी खूपच चांगला पर्याय आहे. हल्ली हे प्रमाण कमी झालं असलं तरी काही खास मेसेजसह ग्रिटींग कार्ड देणं अथवा आपल्याला असं ग्रिटींग कार्ड मिळणं हा एक अभूतपूर्व आनंद असतो. पाहूया अशी खास ग्रिटींग कार्ड्स आणि मेसेज जे तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवू शकता
1. माझं माझ्या फोनइतकंच तुझ्यावर प्रेम आहे.
2. सगळ्या वेडेपणाच्या गोष्टी मी फक्त तुझ्याचबरोबर करू शकते. कारण मला माहीत आहे तू कधीच मला वेगळं समजणार नाहीस.
3. बेस्ट फ्रेंड शोधून सापडणंही कठीण आहे, कारण जगातील सर्वात बेस्ट तर माझ्याजवळ आहे
4. आयुष्यात अनेकजण येतात आणि जातात पण BFF कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात राहतात
5. तू माझ्या आयुष्यात असल्यामुळे मी भाग्यशाली समजते
6. चांगल्या मित्रांना तुमच्या गोष्टी माहीत असतात, पण तेच खरे मित्र असतात जे तुम्हाला तुमची गोष्ट लिहायला आणि ती पूर्ण करायला मदत करतात.
7. तू जगातला सर्वात भारी मित्र वा मैत्रीण आहेस
8. मित्र फक्त तो नाही जो तुमच्यासाठी कायम बाजूला उभा राहातो, खरा मित्र तो असतो जो तुम्ही काहीही न सांगता तुम्हाला समजून घेतो
9. तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून मी आनंदी आहे
10. तुम्ही कायम सोबत असण्यासारखं दुसरं सुख नाही.
11. आपल्या मैत्रीच्या आठवणी मला जगायला बळ देतात
12. मैत्री म्हणजे आपल्याइतकेच वेडे आणि मजेशीर लोक आपल्याबरोबर आयुष्यभरासाठी जपणं
13. दिवस येतील आणि सरतील पण आपली मैत्री कधीच तुटणार नाही
14. वेळ आणि मैत्री या जगातल्या मौल्यवान गोष्टी आहेत
15. तुम्ही कितीही काही करा पण खरे मित्र तुम्हाला योग्य ती समज देतातच, ते तुम्हाला कधीच वेगळं होऊ देत नाहीत.