वाढत्या मुलांचा आहार पोषक तत्वांनी युक्त असावा. ही पोषकतत्त्वे मेंदूचा विकास आणि काम करण्याची क्षमता चांगली ठेवण्यास मदत करतात. मुलांचा मेंदूचा विकास चांगला व्हावा यासाठी त्यांच्या आहारात प्रथिने, जस्त आणि लोह योग्य प्रमाणात असायला हवे. मुलांच्या मेंदूचा विकास व्यवस्थित झाला तरच त्यांची शारीरिक वाढ व मानसिक वाढ व्यवस्थित होईल. मेंदू निरोगी असल्यास मुलांची बुद्धी व स्मरणशक्ती देखील तीक्ष्ण होईल. सकस आहार दिल्यास मुलांची वाढ झपाट्याने होते. पौष्टिक आहाराचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे मुलाचे शिकणे, लक्षात ठेवणे, लक्ष देण्याची क्षमता आणि वागणूक निकोप राहण्यास मदत होते. मुलांच्या मानसिक वाढीसाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणूनच तुमच्या वाढत्या वयाच्या मुलांच्या आहारात पुढील गोष्टींचा आवर्जून समावेश करा.
अंडी
मुलांना दररोज किमान एक अंडे द्या. अंड्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात, जे मेंदूच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. तज्ज्ञांच्या संशोधनानुसार, अंड्यातील पिवळ बलकामध्ये मॅन्कोलिन नावाचे तत्व आढळते. जे शरीरातील न्यूरोट्रान्समीटर्ससाठी खूप आवश्यक असते. प्रथिने आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या अंड्यांमध्ये मुलांची एकाग्रता आणि लक्ष वाढवण्याची शक्ती असते. अंडी हॅपी हॉर्मोन ‘सेरोटोनिन’ तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे मुलांचे मूड आनंदी राहण्यास मदत होते.
सुका मेवा
मुलांच्या आहारात नट्स आणि बियांचा समावेश केल्याने त्यांचा मेंदू निरोगी राहतो आणि मूल अनेक आजारांपासून दूर राहते. सुक्या मेव्यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. याशिवाय त्यात भरपूर प्रथिने, आवश्यक फॅटी ऍसिडस् , लोह आणि जस्त देखील असते..यामुळे मुलांची सर्वांगीण वाढ चांगली होते.
जांभूळ
काहीसे गोड व तुरट चवीचे जांभूळ हे फक्त डायबिटीस असलेल्या लोकांनीच खावे असे नाही. तर लहान मुलांसाठी देखील जांभळं खूप फायदेशीर आहेत. त्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. याव्यतिरिक्त, त्यात अँथोसायनिन्स आणि फ्लेव्होनॉइड्स देखील चांगल्या प्रमाणात असतात. जे त्यांना नकारात्मकतेपासून दूर ठेवण्यास मदत करतात. जांभळांच्या सेवनाने मेंदूला रक्त प्रवाह वाढतो, ते दाह-विरोधी आहे आणि नवीन चेतापेशींच्या निर्मितीसही मदत करते.
दही
प्रथिनांनी समृद्ध असलेले दही मेंदूच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. दह्यामध्ये आयोडीन असते जे मेंदूला प्रभावीपणे कार्य करण्यास मदत करते. दह्यामध्ये प्रथिने, झिंक, बी12 आणि सेलेनियम देखील असते, जे मेंदूच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावतात.
मासे
तुमची मुले जर मांसाहार करत असतील तर त्यांना मासे खायला घाला. माशांमध्ये ओमेगा-३ फॅट्स, आयोडीन आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. हे घटक मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असतात. मासे मेंदूतील ग्रे मॅटरला चालना देते आणि वयानुसार होणारी मेंदूची झीज देखील कमी करते. माशांमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे मुलांचा मूड नियंत्रित होतो आणि त्यांची स्मरणशक्ती देखील सुधारते. जी मुले दर आठवड्याला मासे खातात त्यांना नैराश्य येण्याची शक्यता कमी असते कारण त्यात भरपूर ओमेगा-3 फॅट्स असतात. खास करून सॅल्मन मासा खाणे जास्त फायदेशीर आहे कारण त्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते. जे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मेंदूचे काम जलद होते. माशांमध्ये ट्यूना देखील प्रथिनांनी समृद्ध आहे तसेच यामध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल खूप कमी असते.
संत्री
जर तुम्हाला तुमच्या मुलाचा मेंदू निरोगी आणि सक्रिय ठेवायचा असेल तर त्यांना व्हिटॅमिन सीने समृद्ध संत्री खायला घाला. संशोधनानुसार, व्हिटॅमिन सी समृद्ध फळे मुलांच्या मेंदूच्या विकासात मदत करतात.संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे निरोगी मेंदूसाठी महत्त्वाचे असते. संत्र्याचे सेवन केल्याने चांगली कार्यक्षमता, सुधारित लक्ष, धारणा शक्ती, एकाग्रता यासारखे फायदे मिळतात.
वरील पदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करा.
Photo Credit – istock
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक