निसर्गाने प्रत्येकालाच सुंदर बनवले आहे. या जगात प्रत्येक जण सुंदर आहे.काहींचे डोळे सुंदर असतात, तर काहींचे सुहास्य, काहींचे केस सुंदर असतात तर काहींना नितळ त्वचेची देणगी मिळाली असते. त्यामुळे बॉडी शेमिंगकडे लक्ष न देता छान कॉन्फिडन्टली सुंदर तयार व्हा आणि छान दिसा! प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते. अशा परिस्थितीत जर तुमच्या पोटावर थोडी जास्त चरबी साठली असेल. आणि जर तुमच्या प्रत्येक कपड्यात ती ठळकपणे उठून दिसत असेल तरीही निराश होण्याची गरज नाही. फक्त काही स्टाइल टिप्सच्या मदतीने तुम्ही ही पोटाची चरबी सहज लपवू शकता. साडी असो वा कुर्ता, हे सर्व काही वेगळ्या पद्धतीने परिधान केल्यास पोट आणि कंबरेभोवती जमा झालेली चरबी सहज लपवता येते. तर मग जाणून घेऊया पोटाची चरबी कशी लपवायची.
शेपवेअर घालणे
हा पोटाची चरबी लपवण्याचा सोपा मार्ग आहे. जर तुम्ही एथनिक पोशाखात फिटेड सूट परिधान करत असाल, तर त्यासोबत शेपवेअर घालणे ही चांगली कल्पना आहे. शेपवेअरचे वैशिष्ट्य म्हणजे ते घातल्यानंतर तुम्ही झटपट दोन-तीन इंचाने बारीक दिसू शकता. तसेच, शेप वेअरमुळे तुमच्या शरीराला एक परिपूर्ण आकार मिळतो, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी दिसते.
योग्य रंग निवडा
योग्य रंग निवडणे ही देखील स्लिम दिसण्याची एक युक्ती आहे, जी तुम्हाला बारीक दिसण्यात मदत करू शकते. जर तुमच्या पोटावर चरबी जास्त असेल, परंतु तरीही तुम्हाला स्लिम इफेक्ट द्यायचा असेल, तर थोडे गडद रंगाचे खास करून काळ्या रंगाचे कपडे घाला. काळ्या रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्हाला स्लिमिंग इफेक्ट देते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी फारशी दिसत नाही.
सलवार सूटची स्टाईल
बहुतेक स्त्रिया एथनिक पोशाखांमध्ये पंजाबी ड्रेस किंवा सलवार सूट घालण्यास प्राधान्य देतात. जर तुम्ही पोटाच्या चरबीच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही सलवार सूटची स्टाईल निवडताना थोडा विचार करा. शॉर्ट कुर्तीऐवजी तुम्ही अनारकली सूट घालू शकता. ते तुमच्या पोटाच्या भागाला कव्हर करतात, ज्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी दिसत नाही. दुसरीकडे, जर तुम्ही कॅज्युअल सलवार सूट परिधान करत असाल, तर ए-लाइन सूट निवडणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.कुर्त्याबरोबर तुम्ही पँट स्टाइल लेगिंग्ज किंवा पायजमा घालण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही कुर्ती घातली असेल तर त्यात तुमचे पोट लपवण्यासाठी तुम्ही लेअरिंगची मदत घेऊ शकता. कुर्त्यासोबत श्रग मॅच करून पहा. यासोबतच तुम्ही डेनिम जॅकेट घालून पोटाची चरबी लपवू शकता.
साडीमध्ये पोटाची चरबी अशा प्रकारे लपवा
तुम्हाला तुमची पोटाची चरबी साडीत लपवायची असेल तर नेहमी पातळ फॅब्रिकची साडी निवडा. सिल्क, कॉटन किंवा ऑर्गेन्झा दिसायला सुंदर असते पण त्यामुळे तुमचे शरीर जाड दिसू शकते. नेहमी पातळ बॉर्डरची साडी निवडा. यासोबतच प्लीट्सवर आतून सेफ्टी पिन लावा. यामुळे ओटीपोटाचा भाग बारीक दिसेल. तसेच साडीसोबत तुम्ही लांब जॅकेट घालू शकता. यामुळे तुमच्या कंबरेचा घेर सहजासहजी लक्षात येणार नाही. याशिवाय ब्लाउजच्या स्टाईलमध्ये तुम्ही प्रयोग करू शकता. फुल स्लीव्ह्ज ब्लाउज किंवा लांब ब्लाउज घातल्याने तुमची पोटाची चरबी लपवता येऊ शकेल. तसेच कॉर्सेट ब्लाउज देखील एक स्लिमिंग इफेक्ट देते. एथनिक ड्रेसेस बरोबर तुम्ही स्टेटमेंट नेकपीस किंवा कानातले इत्यादी घालून तुम्ही तुमच्या ऍक्सेसरीजकडे लक्ष वेधून घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही साडी किंवा सुटबरोबर स्टायलिश बेल्ट घालून देखील स्लिमिंग इफेक्ट मिळवू शकता.
अशा प्रकारे तुम्ही एथनिक कपड्यांमध्ये छान स्लिम लूक मिळवू शकता.
Photo Credit – pinterest
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक