ADVERTISEMENT
home / आरोग्य
heat stroke in children

या उन्हाळ्यात असे करा लहान मुलांचे हिट स्ट्रोकपासून संरक्षण

आपले शरीर नैसर्गिकरीत्याच खूप उष्णता निर्माण करते. पण सामान्यतः घाम आला की शरीराचे तापमान कमी होते.किंबहुना शरीराचे तापमान कमी होण्यासाठीच घाम येतो. परंतु अतिशय उष्ण हवामान, उच्च आर्द्रता आणि इतर परिस्थितींमध्ये, ही नैसर्गिक शीतकरण प्रणाली निकामी होऊ शकते, ज्यामुळे शरीरातील उष्णता धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते. यामुळे हिट स्ट्रोक किंवा उष्माघात होऊ शकतो. कधी कधी उष्णतेमुळे शरीरात क्रॅम्प्स देखील येऊ शकतात किंवा उष्णतेमुळे आपल्याला प्रचंड थकवा येतो. हा त्रास लहान मुलांना सहन होत नाही. लहान मुले नाजूक असतात, त्यांच्या शरीराला जास्त प्रमाणात उष्णता सहन होत नाही म्हणूनच उन्हाळ्यात आपल्या लहानग्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. जेव्हा उन्हाळ्यात लहान मुले पुरेसे द्रव पीत नाहीत तेव्हा त्यांना उष्णतेच्या क्रॅम्पचा धोका असतो. जरी हे वेदनादायक क्रॅम्प्स जास्त गंभीर नसले तरीही ते गंभीर उष्णतेच्या आजाराचे पहिले लक्षण असू शकते  त्यामुळे कोणत्याही समस्या टाळण्यासाठी त्यांच्यावर त्वरित उपचार केले पाहिजेत.

उष्णतेमुळे येणाऱ्या थकव्याची लक्षणे 

उष्णतेचा थकवा हा अधिक तीव्र उष्णतेचा आजार आहे. हा त्रास उष्ण हवामानात किंवा गरम वातावरणात जेव्हा व्यक्ती पुरेसे द्रव पित नाही तेव्हा होऊ शकतो. वाढलेली तहान, अशक्तपणा, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, क्रॅम्प्स, मळमळ आणि/किंवा उलट्या, चिडचिड, डोकेदुखी. खूप घाम येणे, थंड पडलेली चिकट त्वचा किंवा 104°F (40°C) इतका किंवा यापेक्षा कमी ताप येणे ही या थकव्याची लक्षणे आहेत. जर तुमच्या घरातील लहान मुलांना हा त्रास होत असेल तर अशा वेळी मुलांना घरातील थंड ठिकाणी, वातानुकूलित कार किंवा सावलीच्या ठिकाणी आणा आणि त्याचे जास्तीचे कपडे काढून टाका. त्यांना पाणी किंवा मीठ आणि साखर असलेले थंड द्रव, जसे की इलेक्ट्रोलाइट्स असलेले पेय पाजा, मुलांचे थंड आणि ओल्या कापडाने स्पंजिंग करा किंवा त्यांना सहन होईल इतपत थंड पाण्याने आंघोळ घाला. मुलाचा त्रास कमी होत नसल्यास लगेच डॉक्टरांकडे जा. जे लहान मूल खूप थकले आहे किंवा त्याच्या पोटात पाणी टिकत नसल्यास त्याला सलाईन लावायची वेळ येऊ शकते. कारण यावर वेळेत उपचार न केल्यास, मुलाला हीटस्ट्रोक किंवा उष्माघात होऊ शकतो जो अधिक गंभीर आजार आहे.

ऊन लागणे । Protecting Children From Heat Stroke
ऊन लागणे

उष्माघात म्हणजे काय?

ऊन लागणे किंवा उष्णतेच्या आजारांपैकी सर्वात गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात होय. उष्माघात ही जीवघेणी वैद्यकीय आणीबाणी आहे. उष्माघातात शरीर स्वतःचे तापमान नियंत्रित करू शकत नाही. शरीराचे तापमान 106°F (41.1°C) किंवा त्याहूनही जास्त वाढू शकते, त्वरीत उपचार न केल्यास मेंदूला इजा किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. शरीराचे तापमान नियंत्रणात आणण्यासाठी त्वरीत वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. जर मुलांनी जास्त कपडे घातले किंवा पुरेसे द्रव न पिता गरम हवामानात तीव्र शारीरिक हालचाली केल्या तर त्यांना उष्माघाताचा धोका असतो. जेव्हा एखादे लहान मूल गरम हवामानात बंद कारमध्ये असले किंवा त्यात अडकते तेव्हाही मुलांना जबरदस्त उष्माघात होऊ शकतो.

ऊन लागणे । Protecting Children From Heat Stroke
ऊन लागणे

जेव्हा बाहेरचे तापमान 93°F (33.9°C) असते, तेव्हा कारमधील तापमान फक्त 20 मिनिटांत 125°F (51.7°C) पर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे शरीराचे तापमान त्वरीत धोकादायक पातळीवर वाढते. जर तुमचे मूल अति गरम तापमानात किंवा उष्ण वातावरणात बाहेर गेले असेल आणि उष्माघाताची यापैकी एक किंवा अधिक लक्षणे दर्शवत असतील तर आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी त्वरित डॉक्टरांकडे जा. तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे, मळमळ,  श्वासांची गती व हृदयगती वाढणे, शुद्ध हरपणे, घाम न येणे , लालसर, गरम, कोरडी त्वचा, 104°F (40°C) किंवा जास्त तापमान ही उष्माघाताची लक्षणे आहेत. मुलांना उन्हाळ्यात शक्यतोवर हलक्या रंगाचे, सैल कपडे घालावे आणि घराबाहेर पडताना सनस्क्रीन वापरावे. उन्हाळ्यात मुलांना आवर्जून तुळशीचे बी किंवा सब्जा खाण्यास द्यावा. सब्जा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

ADVERTISEMENT

उष्ण किंवा दमट दिवसांमध्ये लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका. सुट्टी असली तरी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत मुलांना घराबाहेर पडू देऊ नका आणि त्यांना भरपूर द्रव पदार्थ पिण्याची सवय लावा. अशा प्रकारे या उन्हाळ्यात लहान मुलांची काळजी घ्या.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

05 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT