ADVERTISEMENT
home / Diet
bad cholesterol

शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हे करा

कोलेस्टेरॉल आणि हृदय यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. आजच्या काळात, बहुतेक लोकांच्या शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे हृदयरोग होण्याचा धोका असतो. असे दिसून येते की ज्या लोकांच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे ते कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी औषधे घेतात. हे नक्कीच तुमचे जीवन व्यवस्थापित करण्यात मदत करते. परंतु औषधांव्यतिरिक्त जीवनशैलीत काही बदल करणे आणि योग्य आहार घेणे हा नेहमीच चांगला पर्याय मानला जातो. यामुळे तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. जाणून घ्या असे नैसर्गिक उपाय ज्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी नैसर्गिकरित्या कमी केली जाऊ शकते. 

योग्य आहार 

तुमचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात आहार महत्वाची भूमिका बजावतो. योग्य प्रमाणात असलेले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक आहे, परंतु चुकीच्या ठिकाणी जास्त कोलेस्ट्रॉल चिंतेचा विषय बनू शकतो. कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडीकरण झाले तरीही ते हानिकारक ठरते. त्यामुळे तुम्ही आहारात काय घेत आहात याची काळजी घ्यायला हवी. 

खायच्या तेलाची काळजीपूर्वक निवड करा 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते कॉर्न ऑइल आणि सनफ्लॉवर ऑइल यांसारखे PUFA समृद्ध तेल वापरणे टाळावे. त्याऐवजी ऑलिव्ह ऑईल, फ्लॅक्ससीड ऑइल आणि कॅनोला ऑइल यांसारख्या MUFA समृद्ध तेलांचा वापर करा. यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.

सॅच्युरेटेड फॅटची काळजी घ्या

कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही चीज, लाल मांस, तूप या आणि इतर अशा सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाणात सेवन केले पाहिजे. हे खरे आहे की तुमच्या शरीराला ऊर्जेसाठी आणि इतर हेतूंसाठी याची आवश्यकता असते, परंतु ते जास्त प्रमाणात खाणे हानिकारक असू शकते. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

ADVERTISEMENT
How To Reduce Bad Cholesterol
How To Reduce Bad Cholesterol

व्हिटॅमिन ई सप्लिमेंट्सकडे लक्ष द्या 

अनेक आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की व्हिटॅमिन ईचे सेवन केल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. असे मानले जाते की ई व्हिटॅमिनमध्ये काही संयुगे असतात ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अशा पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा, ज्यात व्हिटॅमिन ई भरपूर असेल. तुम्ही तुमच्या आहारात बदाम, शेंगदाणे, पालक, भोपळा इत्यादींचा समावेश करू शकता.

कर्बोदकांचे सेवन प्रमाणात करा  

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि कोलेस्टेरॉलची पातळी व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही कर्बोदकांचे सेवन कमी करा. बर्‍याच अभ्यासांमध्ये असे म्हटले आहे की कर्बोदकांचे सेवन कमी केल्याने आपल्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.

How To Reduce Bad Cholesterol
How To Reduce Bad Cholesterol

सोल्युबल फायबरयुक्त अन्न खा

तज्ज्ञांच्या मते तुमच्या आहारात ओट ब्रान आणि संपूर्ण कडधान्ये यांसारख्या सोल्युबल फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. या आणि तत्सम पदार्थांचा आहारात समावेश केल्याने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल. यासोबतच सोल्युबल फायबरमुळे तुम्हाला इतरही अनेक फायदे मिळतात.सोल्युबल आणि इन्सोल्युबल असे दोन्ही प्रकारचे फायबर आरोग्यासाठी आवश्यक आहेत. फायबरमुळे शरीरातून मल बाहेर टाकणे सोपे होते. फायबर कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते आणि उच्च रक्तदाब प्रतिबंधित आणि नियंत्रित करण्यात मदत करू शकते. फायबरच्या सेवनाने कोलोरेक्टल कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो असे अनेक अभ्यासांत आढळले आहे. तसेच फायबर हे रक्तातील साखर नियंत्रणास प्रोत्साहन देऊन मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करते. 

म्हणून शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा. 

ADVERTISEMENT

फोटो क्रेडिट – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

23 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT