ADVERTISEMENT
home / आरोग्य
Soil Eating Habit in Children

मुलांना लागली असेल माती खाण्याची सवय तर ती घालवण्यासाठी हे करा 

घरात लहान मूल असेल तर सगळे घरदार त्याच्यामागे असते. लहान मुलांवर अगदी डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागते. चुकून कधी आपलं लक्ष नसताना हमखास मुले काहीतरी उद्योग करून ठेवतात आणि मग ते निस्तरताना सगळ्या घरादाराची भंबेरी उडते. लहान मुले खूप निरागस असल्याने त्यांना त्यांचे चांगले वाईट कळत नाही. अनेकदा असे घडते की ते अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचते. यापैकी एक म्हणजे माती खाण्याची सवय होय. बहुतांश लहान मुलांना माती खाण्याची सवय असते. माती खाण्याची सवय ही सामान्य मानली जाते, परंतु जर मुले दररोज आणि जास्त प्रमाणात माती खात असतील तर ते त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. लहान मुलांची माती खाण्याची सवय हा एक आजार आहे. त्यामुळे मुलांच्या पोटात जंत होतात, त्यामुळे बाळाला भूक लागत नाही. यामुळे मुले जेवायला त्रास देतात. बालवयात मुलांच्या शारीरिक विकासासाठी त्यांना अधिक पोषकतत्वांची गरज असते, जेव्हा मुलांना आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत, तेव्हा हा आजार होतो. मात्र, काही घरगुती उपायांनी मुलांची माती खाण्याची सवय मोडता येते. 

माती खाण्याच्या सवयीमागे लोहाची कमतरता असू शकते 

Soil Eating Habit In Children
Soil Eating Habit In Children

अनेकदा लहान मुले अशक्त असतात. त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता असते. लोह आपल्या शरीरात अनेक महत्त्वपूर्ण कार्ये करते आणि त्याच्या कमतरतेमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. जर तुमचे मूल सतत चिकणमाती खात असेल तर तुमच्या मुलाची हिमोग्लोबिन आणि लोहाची पातळी तपासून घ्या. लोहाच्या कमतरतेमुळे मुलांना माती खायची इच्छा होते. माती खाण्याच्या या सवयीपासून मुक्त होण्यासाठी मुलांच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा. खाण्यातून लोह मिळवण्यासाठी मुलांच्या आहारात बीटरूट, हिरव्या भाज्या आणि डाळिंबाचा समावेश केला जाऊ शकतो. 

मुलांना नियमितपणे केळी खाऊ घाला 

मुलांची माती खाण्याची सवय सोडवण्यासाठी केळी प्रभावी ठरतात. केळी हे पोटॅशियमयुक्त फळ आहे, जे लहान मुलांसाठी अत्यंत आवश्यक मानले जाते. त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यातील पोषक तत्त्वांमुळे मुलाचा शारीरिक विकास होण्यास मदत होते. जर तुमचे मूल चिकणमाती खात असेल तर केळी मॅश करा आणि त्यात मध व दूध मिसळा आणि मुलाला खाऊ घाला. याने त्यांची माती खाण्याची तल्लफ शांत होते. तसेच मुलाचे पोट नेहमी भरलेले असेल तर त्यांची माती खाण्याची सवय मोडते. 

मुलांना लवंग दिल्यास मोडेल माती खाण्याची सवय 

Soil Eating Habit In Children
Soil Eating Habit In Children

माती खाण्याची सवय सोडवण्यासाठी लवंग देखील खूप फायदेशीर आहे. लवंगीचे पाणी प्यायल्याने मुलांची माती खाण्याची सवय लवकर कमी होते. हे पाणी तयार करण्यासाठी प्रथम काही लवंगा बारीक करून त्या पाण्यात घाला व ते पाणी उकळून घ्या.  हे पाणी थंड करून गाळून घ्या. हे पाणी मुलाला दिवसातून तीन वेळा द्यावे. जर लहान मूल हे पाणी पीत नसेल तर त्यात मध मिसळून त्यांना प्यायला द्या.  लवंगीच्या पाण्याचे सतत सेवन केल्याने मुलाची माती खाण्याची सवय सुटते.

ADVERTISEMENT

आहारात झिंकचा समावेश करा 

ज्या मुलांना माती खाण्याची सवय लागते, त्यांच्या शरीरात अनेकदा झिंकची कमतरता असते. म्हणूनच मुलांच्या आहारात झिंकचा समावेश केल्यास त्यांची ही सवय मोडण्यास मदत होईल. मुलाच्या आहारात झिंक समाविष्ट करण्यासाठी काही नैसर्गिक पदार्थ किंवा सप्लिमेंट्स आणि मल्टीविटामिन्स घेतले जाऊ शकतात.

ओव्याचे पाणी पाजा 

मुलांची माती खाण्याची सवय मोडण्यासाठी त्यांना  तर रोज रात्री झोपताना भाजलेला ओवा खायला घाला. याने त्यांची माती खाण्याची सवय तर सुटतेच आणि पचनासंबंधी काही तक्रारी असतील तर त्यापासूनही आराम मिळतो. 

तसेच बाळाला कॅल्शियमयुक्त आहार द्या. यामुळे मुलांची माती खाण्याची सवय मोडेल. 

Photo Credit- istockphoto

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

19 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT